मोठी बातमी

राम, कृष्ण, भीष्म म्हणजे हिंदू संस्कृती असेल तर…
विशेष लेख, मोठी बातमी

राम, कृष्ण, भीष्म म्हणजे हिंदू संस्कृती असेल तर…

विश्वंभर चौधरी, ज्येष्ठ विचारवंत भीष्मांना एक त्रासदायक वर मिळालेला होता. त्यांना आधीचे जन्म आठवत असत. भीष्मांचे एकूण ७३ पूनर्जन्म महाभारतात आहेत. माझा स्वतःचा पुनर्जन्मावर विश्वास नाही पण तूर्त आपण महाभारताच्या दृष्टीनंच महाभारताकडे बघू. तर भीष्म शरपंजरी पडले, म्हणजे टोचणाऱ्या बाणांवर झोपले. महाभारतातलं युद्धं तर १८ दिवसात संपलं पण भीष्मांना तब्बल ५८ दिवस शरपंजरी पडावं लागलं. सक्ती कोणाचीच नव्हती. भीष्मांना इच्छामरणाचं वरदान होतं.वाट्टेल तेव्हा ते प्राण सोडू शकत होते. पण शरपंजरी पडून भीष्मांनी शिक्षा भोगली. भीष्मांनी स्वतः दिलेली कारणं दोन. एक तर ५८ दिवसांनी उत्तरायण लागणार होतं. उत्तरायणात मरणं धर्माच्या दृष्टीनं उचित. दुसरं कारण फार वेगळं होतं. भीष्मांना स्वतःच्या एका जन्मातल्या पापाची शिक्षा स्वतःहोऊन भोगायची होती. ७३ पैकी एका जन्मात भीष्म राजकुमार होते. एकदा ज...
स्वातंत्र्यदिनानिमित्ताने राष्ट्रध्वजाचा ‘मास्क’ विकणार्या ई-कॉमर्स संकेतस्थळे आणि दुकानांवर कायदेशीर कारवाई करा – सुराज्य अभियान
महाराष्ट्र, मोठी बातमी

स्वातंत्र्यदिनानिमित्ताने राष्ट्रध्वजाचा ‘मास्क’ विकणार्या ई-कॉमर्स संकेतस्थळे आणि दुकानांवर कायदेशीर कारवाई करा – सुराज्य अभियान

मुंबई : ‘भारतीय राष्ट्रध्वज’ हा कोट्यवधी भारतियांसाठी अस्मितेचा विषय आहे; काही अपवाद वगळता त्याचा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी वापर करणे कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. असे असले, तरी या संवेदनशील विषयी ‘रेड-बबल’सारख्या ‘ई-कॉमर्स’ संकेतस्थळांद्वारे, तसेच दुकानांत आणि रस्त्यावर स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय राष्ट्रध्वजाप्रमाणे बनवलेल्या ‘मास्क’ची मोठ्या प्रमाणावर विक्री चालू आहे. त्यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, तसेच अशा मास्कची विक्री, उत्पादन आणि वितरण होणार नाही, या दृष्टीने शासनाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’ उपक्रमाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. https://youtu.be/9oCLG_crkw4 राष्ट्र...
चित्रपटाचे आकर्षण! हरियाणा, राजस्थानहून मुलगा-मुलगी गायब | शोधण्यास मदत करण्याचे पालकाचे आवाहन
महाराष्ट्र, मोठी बातमी

चित्रपटाचे आकर्षण! हरियाणा, राजस्थानहून मुलगा-मुलगी गायब | शोधण्यास मदत करण्याचे पालकाचे आवाहन

मुंबई : हरियाणातील मुलगा व त्याची फेसबुकवरील राजस्थानातील मैत्रीण दोघेही जानेवारी महिन्यापासून गायब आहेत. अद्याप त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. मुलीला चित्रपट क्षेत्राचे आकर्षण असल्याने ते दोघेही मुंबईत असल्याची शक्यता आहे. या दोघांना शोधण्यास मदत करण्याचे पालकांनी आवाहन केले आहे. राजेश चुघ (रा. घर नंबर 512/ 21, गल्ली नंबर 1, नरेंद्रनगर, सोनीपत हरियाणा) यांचा मुलगा सौरभ चुघ (वय 18, उंची 5 फूट 11 इंच) हा घरातून 29 जानेवारी 2021 पासून गायब आहे. याप्रकरणी सोनीपत सिव्हिल लाईन पोलिसमध्ये फिर्याद दिली आहे. तर या मुलाची फेसबुकवर नंदिनी या एका मुलीशी मैत्री झाली. ती राजस्थानची राहणारी असून तीही त्याच दिवसापासून तिच्या घरातून गायब झाली आहे. नंदिनीला चित्रपट क्षेत्राचे आकर्षण असल्याचे तिच्या मेल्सवरून निश्चित होते आहे. ही दोन्ही मुले मुंबईत आहे असे समजते. सौरभचा मोबाईल नंबर 82...
अस्वस्थ रंगकर्मींचा ‘एल्गार’ | अस्वस्थतेला वाट मोकळी करून देत आंदोलनाचा पवित्रा
मोठी बातमी, मनोरंजन

अस्वस्थ रंगकर्मींचा ‘एल्गार’ | अस्वस्थतेला वाट मोकळी करून देत आंदोलनाचा पवित्रा

मुंबई (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : करोना महामारीची झळ आज सर्वांनाच बसली आहे. मनोरंजन क्षेत्र ही याला अपवाद नाही. गेले दीड वर्ष करोनाची लढाई संयमाने लढल्यानंतर आता रंगकर्मींचा धीर सुटत चालला आहे. हाताला काम नसल्याने सर्व रंगकर्मी अस्वस्थ आहेत. आपल्या या अस्वस्थतेला वाट मोकळी करून देत आंदोलनाचा पवित्रा सर्व रंगकर्मीनी घेतला असून शासन दरबारी आपल्या मागण्या ते सादर करणार आहेत. या आंदोलनाची दिशा कशी असेल? रंगकर्मीच्या नेमक्या मागण्या काय आहेत? यासाठी नुकत्याच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेते विजय पाटकर, विजय गोखले, दिग्दर्शक विजय राणे, संचित यादव, मेघा घाडगे, शीतल माने, चंद्रशेखर सांडवे, हरी पाटणकर, सुभाष जाधव, प्रमोद मोहिते आदि मान्यवर मंडळी तसेच संघटक व सहसंघटक यांच्या उपस्थितीत ही परिषद संपन्न झाली. यावेळी रंगकर्मींच्या मनातील अस्वस्थता व्यक्त झाली. व त्यांच्या मागण्यांचा...
‘झाडांचे शतक शतकांसाठीची झाडं’ | सुप्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या संवेदनेतून अभिनव उपक्रम
महाराष्ट्र, मोठी बातमी

‘झाडांचे शतक शतकांसाठीची झाडं’ | सुप्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या संवेदनेतून अभिनव उपक्रम

https://youtu.be/a6xglBW-B7E मुंबई : सहयाद्री देवराई व सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने, "झाडांचे शतक, शतकांसाठीची झाडं" हा एक अभिनव उपक्रम राज्यभरात राबविण्यात येत आहे. सुप्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या झाडं आणि निसर्गाबद्दल असलेल्या संवेदनेतून आणखी एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. राज्यभर सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र यांच्या कक्षेत बसणाऱ्या सर्व गावात लोकसहभागातून राबविला जात आहे. आणि या उपक्रमास महाराष्ट्र भरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सरपंच परिषदे व्यतिरिक्त स्थानिक लोकं आणि स्थानिक सामाजिक संस्था ही या उपक्रमात आपला सहभाग मोठ्या प्रमाणात नोंदवत आहेत. संकल्पना : १५ ऑगस्ट २०२१ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत आहेत, ह्या निमित्ताने आपण आपल्या गावातील ७५ वर्षीय आणि त्यावरील वयाच्या आजी आजोबांचा सत्...
ज्वेलरी शॉप व बँक फोडणाऱ्या टोळीचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला पर्दाफाश | गुन्हे शाखा युनीट चार पथकाची कामगिरी
मोठी बातमी, क्राईम

ज्वेलरी शॉप व बँक फोडणाऱ्या टोळीचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला पर्दाफाश | गुन्हे शाखा युनीट चार पथकाची कामगिरी

पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : रेकी करून ज्वेलरी शॉप व बँक फोडणाऱ्या टोळीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनीट-4 च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. या टोळक्याकडुन सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह एकुण 12 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. गणेश विष्णु शाही (वय-33 वर्ष मुळगाव- भुरुआ, लम्की टिकापूर रोड, जि. कैलासी, नेपाळ), खगेंद्र दोदी कामी (वय- 27 वर्ष, मुळगाव - घाटगाऊ, चौगुने गाव पालिका, जि. सुरखेत, नेपाळ), प्रेम रामसिंग टमाटा (वय- 42 वर्ष मुळगाव- कालेकांडा, विनायक नगरपालिका, जि. अच्छाम, नेपाळ, सध्या रा. पद्मालय पार्क, लंडन ब्रीज जवळ, पुनावळे), रईस कादर खान ( वय - 52 वर्ष रा. तीन डोंगरी प्रेम नगर, उन्नत नगर रोड क्र. 2, साईबाबा मंदिर समोर, गोरेगाव (पश्चिम) मुंबई, जगत बम शाही ( वय- 28 वर्ष, सध्या रा. क्रिस्टल पॅलेस, कृष्णा कॉलनी, मारुंजी, पुणे, मुळगाव-गैटाडा, विनायक नगरपालिका, जि...
बकरी ईद निमित्त पशूची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये कालानुरूप बदल व्हावा – अल्लाउद्दीन शेख
महाराष्ट्र, मोठी बातमी

बकरी ईद निमित्त पशूची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये कालानुरूप बदल व्हावा – अल्लाउद्दीन शेख

पनवेल (रायगड) : बकरी ईद निमित्त पशूची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये कालानुरूप बदल व्हावा व या प्रथेला पर्याय देत रक्तदान करुन साजरी करण्याचा मानवतावादी दृष्टिकोन आनंद देणारा आहे. असे प्रतिपादन राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्र कार्यवाह अल्लाउद्दीन शेख यांनी येथे केले. आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता, सर्व धर्मियांनी धार्मिक सण हे अधिकाधिक समाजाभिमुख व मानवतावादी करणे हे धर्माचेच उन्नयन आहे. म्हणूनच 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती', शाखा पनवेलच्या पुढाकाराने व 'राष्ट्र सेवा दल', 'हुसेनी फाउंडेशन' याच्या संयुक्त विद्यमाने बकरी ईद निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अल्लाउद्दीन शेख बोलत होते. रक्तदान हे सर्व जाती धर्मापलीकडे माणसाला माणसाशी जोडते. रक्तदान करुन बकरी ईद साजरी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले होते, त्या आवाहनाला प्रतिसाद देत भ...
करीना कपूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा | ख्रिश्चन एकता मंचाचे ठाम मत
महाराष्ट्र, मोठी बातमी

करीना कपूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा | ख्रिश्चन एकता मंचाचे ठाम मत

मुंबई : करीना कपुर यांनी त्यांच्या पुस्तकाच्या शीर्षकात 'बायबल' या शब्दाचा वापर केल्याप्रकरणी ख्रिस्ती समाजातुन त्यांचा निषेध केला जात आहे. याप्रकरणी 'ख्रिश्चन एकता मंच'च्या वतीने महाराष्ट्रातील अनेक भागातून जोरदार निषेध व्यक्त होत असून त्याला समाजाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच मंचाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जागोजागी संबंधित कार्यालयांमध्ये लेखी स्वरूपात निषेध नोंदवत आहेत. दरम्यान, करीना कपुर यांच्यावर गुन्हा नोंदवावा, अशी तीव्र मागणी सुध्दा करण्यात येत आहे. ख्रिश्चन एकता मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रभुदास दुप्ते यांनी मीडियाला माहिती दिली की, याप्रकरणी मंचाच्या वतीने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निषेध नोंदवण्यात आलेला आहे. तसेच करीना कपुर यांचे मुंबई येथील निवासा नजीकच्या वरळी पोलिस स्टेशनमध्ये सुध्दा आम्ही तक्रार नोंदविण्यास गेलो, असता पोलिसांनी पुराव्यांची मागणी केली. अद्याप पुरव्याभाव...
बेशिस्त नागरिकांमुळे पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक | शहरात सापडले २२७५ नवीन रूग्ण
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

बेशिस्त नागरिकांमुळे पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक | शहरात सापडले २२७५ नवीन रूग्ण

पिंपरी चिंचवड : कोरोना संदर्भातील नियम अनेक नागरिकांकडून पाळले जात नाहीत. त्यामुळे शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून आज शहरात २२७५ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. तसेच आज १२८६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला,तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, एक लाख ३४ हजार ५४१ एकूण करोना बाधित रूग्ण संख्या झाली आहे. तर आतापर्यंत एक लाख १६ हजार १७७ रूग्ण कोरोना मुक्त झालेत. शहरातील २८०३ जणांना मृत्यू झाला आहे. क्षेत्रीय कार्यालयानुसार आज आढळलेली रूग्ण संख्या खालीलप्रमाणे. अ प्रभाग (३१८ बाधित) निवडणूक प्रभाग क्रमांक 10, 14, 15, 19 शाहूनगर, संभाजीनगर, मोरवाडी, विठ्ठलवाडी, दत्तवाडी, आकुर्डी, गंगानगर, वाहतूकनगरी, उद्योगनगर, श्रीधरनगर, आनंदनगर, भाटनगर, भाजी मंडई, पिंपरी कॅम्प ब प्रभाग (३६० बाधित) निवडणूक प्रभाग क्रमांक 16, 17, 18, 22 वाल्हेकरवाडी, दळवीनगर...
दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार | शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मोठी बातमी, शैक्षणिक

दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार | शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत स्पष्ट केले. यासंदर्भात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री श्रीमती गायकवाड यांनी सांगितले की, दहावी व बारावीच्या परीक्षा हा महत्त्वाचा विषय असून शिक्षण विभागामार्फत याबाबत विविध मुद्यांवर चर्चा केली जात आहे. त्यानुसार या दोन्ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरविण्यात आले आहे. दहावीसाठी साधारणत: 16 लाख तर बारावीसाठी 15 लाख विद्यार्थी आहेत. कोरोनामुळे गेल्यावर्षीचे शैक्षणिक वर्ष अडचणीचे गेले आहे. अद्यापही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देताना परीक्षा कशा पद्धतीने आणि सुरक्षितपणे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या म...