पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : रेकी करून ज्वेलरी शॉप व बँक फोडणाऱ्या टोळीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनीट-4 च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. या टोळक्याकडुन सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह एकुण 12 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गणेश विष्णु शाही (वय-33 वर्ष मुळगाव- भुरुआ, लम्की टिकापूर रोड, जि. कैलासी, नेपाळ), खगेंद्र दोदी कामी (वय- 27 वर्ष, मुळगाव – घाटगाऊ, चौगुने गाव पालिका, जि. सुरखेत, नेपाळ), प्रेम रामसिंग टमाटा (वय- 42 वर्ष मुळगाव- कालेकांडा, विनायक नगरपालिका, जि. अच्छाम, नेपाळ, सध्या रा. पद्मालय पार्क, लंडन ब्रीज जवळ, पुनावळे), रईस कादर खान ( वय – 52 वर्ष रा. तीन डोंगरी प्रेम नगर, उन्नत नगर रोड क्र. 2, साईबाबा मंदिर समोर, गोरेगाव (पश्चिम) मुंबई, जगत बम शाही ( वय- 28 वर्ष, सध्या रा. क्रिस्टल पॅलेस, कृष्णा कॉलनी, मारुंजी, पुणे, मुळगाव-गैटाडा, विनायक नगरपालिका, जि. उच्छद, नेपाळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर या गुन्ह्यातील दुसरा मुख्य आरोपी शंकर उर्फ कांचा लामा (रा. धनगढी, नेपाळ), बादल लामा (रा. धनगढी, नेपाळ) तसेच शंकर उर्फ कांचा लामा आणि त्यांचे झारखंड येथुन बोलाविलेले तीन साथीदार अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील बावधान येथील एका ज्वेलरी शॉप मध्ये शुक्रवार (ता.18) जून रोजी चोरी झाल्याची घटना घडली होती. चोरट्यांनी हि चोरी शेजारी असलेल्या चायनीज शॉप च्या पोटमाळ्याच्या भींतीला भगदाड पाडुन केली होती. दरम्यान, ज्वेलरी शॉप मधील चांदीचे दागिणे, लॅपटॉप, मोबाईल फोन व सी.सी.टि.व्ही डिव्हीआर असा एकुण 03 लाख 55 हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला होता.
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनीट-4 चे पथक करीत असताना सदर गुन्ह्यात स्थानिक परीसरात काम करणारे नेपाळी इसम सामिल असल्याची शक्यता निर्माण झाली. त्या अनुषंगाने पथकाने तपास केला असता एक वॉचमन जगत बम शाही हा घटना घडल्यापासुन कामावर येत नसुन तो अंबरनाथ, जि. ठाणे येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने त्याला अंबरनाथ येथुन ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने त्याचे वरील साथीदार मिळुन हा गुन्हा केला असल्याचे कबुल केले.
चोरीसाठी अनोखी पद्धत
हि टोळी चोरी करण्याकरीता सोन्याच्या दुकाना शेजारील गाळा भाडेतत्वावर घेत असत. शहारातील बावधान तसेच सांगवी येथे अशाच प्रकारे चोरी करण्याचा त्यांचा हेतु होता. या टोळीने मुरबाड (जि.ठाणे) येथे वॉचमनच्या मदतीने बॅकेचे शटर कापून चोरी केल्याचे देखील उघड झाले आहे. मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपी गणेश शाही, शंकर लामा, प्रेम टमाटा हे सराईत गुन्हेगार असुन अशा प्रकारच्या अनेक चोऱ्या केलेल्या असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट – 4 चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरीष देशमुख, सिद्धनाथ बाबर, सहायक पोलीस उप-निरीक्षक धर्मराज आवटे, दादा पवार, नारायण जाधव, पोलीस हवालदार प्रविण दळे, संजय गवारे, आदिनाथ मिसाळ, राहिदास आडे, संतोष असवले, तुषार शेटे, पोलीस नाईक लक्ष्मण आढारी, मो.गौस नदाफ, वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, पोलीस शिपाई प्रशांत सैद, तुषार काळे, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण, तांत्रिक विश्लेषन विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, सहायक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, राजेंद्र शेटे, नागेश माळी, विकास आवटे, पोपट हुलगे यांच्या पथकाने हि कामगिरी केली आहे.