मोठी बातमी

covid-19 : पिंपरी-चिंचवड शहर मध्यरात्रीपासून होणार सील
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

covid-19 : पिंपरी-चिंचवड शहर मध्यरात्रीपासून होणार सील

पिंपरी (लोकमराठी) : कोरोना विषाणूने जगभरात थैमान धालते असून देश, राज्याबरोबर शहरातही कोरोना बाधितांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा सामुदायिक प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हार्डिकर यांनी रविवारी (दि. 19 एप्रिल) मध्यरात्री बारापासून 27 एप्रिलपर्यंत संपूर्ण शहरच सील करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शहराच्या सर्व सीमा आणि प्रमुख रस्ते बंद करण्यात आले. महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, नागरिकांच्या हालचाली व बाहेर फिरण्यावर मर्यादा आणण्यासाठी संपूर्ण शहर सील केले आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार सोमवारपासून ( दि. 20) नागरिकांना काही सवलती देण्यात येणार होत्या. मात्र, त्या दिल्यास कोरोनाचा आणखी प्रसार होऊ शकतो. त्यात शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र असून पुणे शहरासह चाकण, हिंजवडी औद्योगिक क्षेत्र लागून आहे. त्यामुळे नोकरी आणि कामानिमित...
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 कोटी रुपयांची मदत
महाराष्ट्र, मोठी बातमी

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 कोटी रुपयांची मदत

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मुंबई, ता. 16 (लोकमराठी) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत आहे. या जागतिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले योगदान म्हणून सर्व विद्यापीठांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करावी असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले होते. https://youtu.be/OBATQJ5cZC0 याला सकारात्मक प्रतिसाद देऊन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून 10 कोटी रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी देण्याचे निश्चित केले आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच उर्वरित विद्यापीठांकडून देखिल आपत्कालीन निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी मदत म्हणून जाहीर केली जाईल असा विश्वासही श्री. सामंत यांनी व्यक्त केला....
Covid-19 : पिंपरी चिंचवडमधील कोरोना रुग्णांची क्षेत्रीय कार्यालयानिहाय माहिती
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

Covid-19 : पिंपरी चिंचवडमधील कोरोना रुग्णांची क्षेत्रीय कार्यालयानिहाय माहिती

पिंपरी (लोकमराठी) : पिंपरी चिंचवड महापालिकेने आठ क्षेत्रीय कार्यालयनिहाय कोरोनाचे किती रुग्ण आहेत. याची आकडेवारी असलेला नकाशा प्रसारित केला आहे. त्या नकाशावर बुधवारपर्यतची रूग्णांची आकडेवारी दिली आहे. ही आहेत आठ क्षेत्रीय कार्यालये अ प्रभाग (रूग्ण संख्या - ०१) प्रभाग क्रमांक १० (संभाजीनगर), प्रभाग क्रमांक १४ (मोहननगर, आकुर्डी), प्रभाग क्रमांक १५ (प्राधिकरण) आणि प्रभाग क्रमांक १९(आनंदनगर, भाटनगर). ब प्रभाग (रूग्ण संख्या - ०) प्रभागातील परिसर प्रभाग क्रमांक १६ (रावेत), प्रभाग क्रमांक १७ (बिजलीनगर, चिंचवडेनगर), प्रभाग क्रमांक १८ (चिंचवड) आणि प्रभाग क्रमांक २२(काळेवाडी). क प्रभाग (रूग्ण संख्या - ०८) प्रभाग क्रमांक २ (बोऱ्हाडेवाडी), प्रभाग क्रमांक ६ (धावडेवस्ती), प्रभाग क्रमांक ८ (इंद्रायणीनगर) आणि प्रभाग क्रमांक ९ (नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा). ड प्रभाग (रूग्ण संख्या - ०) प्रभाग...
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी न घेणाऱ्या मिडियावर कठोर कारवाई करा; एनयुजे महाराष्ट्रची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
महाराष्ट्र, मोठी बातमी

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी न घेणाऱ्या मिडियावर कठोर कारवाई करा; एनयुजे महाराष्ट्रची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकमराठी न्यूज नेटवर्क मुंबई : सध्या स्थितीत सर्व अत्यावश्यक सेवा कोरोनाविरोधात एखाद्या योद्याप्रमाणे लढत आहेत. इतर सर्वाना सुरक्षा कवच आहे. सरकार काळजी घेत आहे. मात्र, यातून लोकशाहीचा चौथा स्तंभ दुर्लक्षित राहिलाय. शासनाने कामगार हिसाठी अध्यादेश काढून निर्देश जारी केलेत. तरीही प्रसारमाध्यमकर्मी पुरेसे सुरक्षित नाहीत. काही पत्रकारांना या विषाणूची बाधा झाल्याच्या बातम्या पसरू लागताच उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सक्रीय पत्रकारांची कोविड-१९ चाचणी करण्याची मागणी केली आहे. पण ही तपासणी पुरेशी नाही. यासोबत सर्व प्रसारमाध्यम व्यवस्थापन मालकांना खडबडून जागे करण्याची आणि जे मालक व व्यवस्थापन, वरिष्ठ माध्यम कर्मचारींच्या सुरक्षेत हयगय करत असतील आणि बातम्यांसाठी चुकीचा आग्रह धरत असतील अशांवर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी एनयुजे महाराष्ट्रने केली आहे. याबाबत अध्यक्ष शीतल करदेकर यांनी मुख्य...
मुंबईतील नामवंत डॉक्टर्स ‘कोरोना’ लढाईत शासनाबरोबर; टास्क फोर्स, हॉटलाईनद्वारे मार्गदर्शन करणार; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद
महाराष्ट्र, मोठी बातमी

मुंबईतील नामवंत डॉक्टर्स ‘कोरोना’ लढाईत शासनाबरोबर; टास्क फोर्स, हॉटलाईनद्वारे मार्गदर्शन करणार; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

लोकमराठी न्यूज नेटवर्क मुंबई, ता. 13 : कोरोनाविरूद्धचा लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला मुंबईतील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला असून मुख्य सचिवांच्या पातळीवर या डॉक्टर्सचा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे डॉक्टर राज्यभरातील कोरोना उपचार करणाऱ्या डॉकटर्सना हॉट लाईनच्या माध्यमातूनही उपलब्ध असतील. आज या डॉक्टर्सशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला व टास्क फोर्सने करावयाच्याया कामांबाबत सूचना ऐकून त्याप्रमाणे कार्यवाहीचे प्रशासनाला निर्देश दिले. या टास्क फोर्समध्ये खालील डॉक्टर्स असतील महाराष्ट्रात आजपर्यंत 2 हजार पॉझिटिव्ह रुग्ण असून 150 मृत्यू आहेत. मृत्यू दर 6 ते 7 टक्के असून 80 टक्के अशा रुग्णांना किडनी, उच्च रक्तदाब, किंवा इतर दुर्धर आजार होते. राज्यातला वाढता मृत्य...
सोशल मिडीया वापरत आहात; तर जरा जपुन | गैरवापर केल्यास होणार कठोर कारवाई
मोठी बातमी, महाराष्ट्र

सोशल मिडीया वापरत आहात; तर जरा जपुन | गैरवापर केल्यास होणार कठोर कारवाई

गृहमंत्री देशमुख यांचा समाजकंटकांना इशारा लोकमराठी न्यूज नेटवर्क मुंबई, ता. 13 (Lokmarathi) : काही विघ्नसंतोषी लोक सोशल मिडीयाचा (समाज माध्यम) दुरुपयोग करून सामाजिक व धार्मिक तेढ, दुही निर्माण करण्याचा, समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र सायबर विभाग लक्ष ठेवून आहे. जर असे काही कराल तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समाजकंटकांना दिला आहे. कोरोना साथीमुळे असलेल्या लॉकडाऊन दरम्यान याचे प्रमाण वाढले आहे. अफवा व खोट्या बातम्या पेरुन भीती व द्वेष पसरविण्याच्या या प्रकारांवर महाराष्ट्र सायबर सेलने बारकाईने लक्ष ठेवून कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना श्री. देशमुख यांनी सायबर विभागाला दिल्या आहेत. पोलिसांनी अशा लोकांविरुद्ध लॉकडाऊनच्या कालावधीत 176 गुन्हे नोंदविले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये द्वेष...
Covid-19 : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना व्हायरसमुळे ४७ वर्षीय रुग्णाचा मृत्यू, शहरातील पहिला बळी
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

Covid-19 : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना व्हायरसमुळे ४७ वर्षीय रुग्णाचा मृत्यू, शहरातील पहिला बळी

संग्रहित छायाचित्र लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी (पुणे), ता. १२ : पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात कोरोनाची लागण झालेल्या एका ४७ वर्षाच्या पुरूषाचा उपचारादरम्यान रविवारी (ता. 12) मृत्यू झाला. कोरोना विषाणूमुळे हा पहिलाच बळी असून मृत व्यक्ती सुरक्षारक्षकाचे काम करत होता. मृत्यू झालेल्या या व्यक्तीला त्रास होऊ लागल्यामुळे पाच दिवसांपूर्वी तो चिंचवड येथील महापालिकेच्या एका दवाखान्यात गेला होता. त्याला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्याच्या घशाचे द्रव्य घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ९ एप्रिल रोजी तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उपचारादरम्यान त्याची प्रकृती खालावल्याने अखेर रविवारी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, त्याच्या संपर्कात आलेल्या आठ जणांच्या घशाचे द्रव्य तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत...
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ४६ आरोपींना अटक, ८ वाहने जप्त | येथे करा तक्रार
महाराष्ट्र, मोठी बातमी

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ४६ आरोपींना अटक, ८ वाहने जप्त | येथे करा तक्रार

राज्यस्तरावर निरंतर धाडसत्र सुरूएका दिवसात १०२ गुन्ह्यांची नोंद१६ लाख ३४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त मुंबई ता, १२ (लोकमराठी) : राज्यातील ‌ सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद असून अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यस्तरावर निरंतर धाडसत्र सुरू आहे. काल एका दिवसात (११ एप्रिल २०२०) राज्यात १०२ गुन्हे नोंदविण्यात आले असून ४६ आरोपींना अटक करण्यात आली. ८ वाहने जप्त करण्यात आली असून १६ लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबरोबरच २४ मार्च ते ११ एप्रिलपर्यंत पूर्ण लॉकडाऊन कालावधीमध्ये राज्यात २ हजार ३८३ गुन्हे नोंदविण्यात आले असून ९३७ आरोपींना अटक, तर ११५ वाहने जप्त करण्यात आली असून ५ कोटी ७१ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. येथे करा तक्रार अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता रा...
PUNE : पुण्यात व्हॉट्सप हॅक झाल्याच्या तक्रारींनंतर पोलिसांकडून अर्लट जारी
पुणे, मोठी बातमी

PUNE : पुण्यात व्हॉट्सप हॅक झाल्याच्या तक्रारींनंतर पोलिसांकडून अर्लट जारी

पुणे (लोकमराठी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यापासून आतापर्यंत पुणे पोलिसांकडे व्हॉटस अ‍ॅप हॅक झाल्याच्या पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी या संदर्भात अर्लट जारी केले आहे. विशेष म्हणजे या पाचही तक्रारी महिलांकडूनच दाखल करण्यात आलेल्या आहेत. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सायबर सेलचे उपायुक्त संभाजी कदम यांनी शनिवारी या संदर्भात अर्लट जारी केले. तसेच, नागरिकांनी आपली वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तीस देऊ नये तसेच व्हॉट्स अ‍ॅप किंवा अन्य सोशल मीडियावर आलेल्या एखाद्या संशयीत लिंकवर क्लिक देखील करू नये, असे आवाहनही केले आहे. लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यापासून आमच्याकडे व्हॉटस अ‍ॅप हॅक झाल्याच्या पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारी दाखल करणाऱ्यांमध्ये विद्यार्थीनी, गृहिणी आणि आयटी क्षेत्रातील काम करणाऱ्यांचा समावेश आह...
नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांचे वर्षभरातील कामगिरीनुसार मूल्यमापन
महाराष्ट्र, मोठी बातमी

नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांचे वर्षभरातील कामगिरीनुसार मूल्यमापन

लोकमराठी : राज्यभरातील नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील कामगिरीचे मूल्यमापन करून शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांच्या स्तरावर निर्णय घेण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. राज्यभरातील काही लाख विद्यार्थ्यांशी संबंधित हा विषय असल्याने राज्य शासन याबाबतचा निर्णय कधी घेणार, असा प्रश्न आहे. करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा अडचणीत आल्या. त्यात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबतचा निर्णय अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण विभागाने नववी आणि अकरावीच्या परीक्षा पद्धतीबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे. विद...