मोठी बातमी

श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी तपास करण्याचे न्यायालयाचे आदेश
मोठी बातमी, पुणे

श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी तपास करण्याचे न्यायालयाचे आदेश

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, ता ८ जुलै : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आपल्या फेसबुक पेजवरुन आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी बदनामी केल्याप्रकरणी पुणे न्यायालयाने वाकड पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर (Shri Shri Ravi Shankar) यांच्या फेसबुक तथा युट्युब पेजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी एक व्हिडिओ प्रकाशित करण्यात आला होता. त्या व्हिडिओमध्ये समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचे दाखविण्यात आले होते. मात्र, अहमदनगरमधील एका खटल्याच्या निकालात न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे की, समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

मुंबई, ३० : महाराष्ट्राचे ३० वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज पद व गोपनीयतेची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी श्री. शिंदे आणि श्री. फडणवीस यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रगीतानंतर श्री. शिंदे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाचा उल्लेख करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सोहळ्यास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांच्यासह सर्वश्री प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, प्रसाद ला...
यंदा प्रथमच मिळणार महिला वारकऱ्यांना आरोग्यविषयक अत्याधुनिक सोयीसुविधा
पुणे, मोठी बातमी

यंदा प्रथमच मिळणार महिला वारकऱ्यांना आरोग्यविषयक अत्याधुनिक सोयीसुविधा

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा 'आरोग्यवारी' अभियानाचा पुण्यातून शुभारंभ यंदाची वारी ऐतिहासिक ठरणार .महिला वारकऱ्यांना विसावा कक्ष, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन यांची सुविधा मिळणार पुणे : महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. वारी ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक परंपरा आहे. धर्म, जाती, पंथ, लिंग या पलीकडे जाऊन सर्व समावेशक समाजमन तयार करण्याचे कार्य संतांनी केले आहे. आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून देहू, आळंदी, पंढरपूर येथे दाखल होत असतात. या वारकऱ्यांमध्ये सहभागी होणा-या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते हे लक्षात घेता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यां...
वीज पडण्याची इशारा देणारे ‘दामिनी ॲप’ आपल्या मोबाईलमध्ये आहे ना?
मोठी बातमी, राष्ट्रीय

वीज पडण्याची इशारा देणारे ‘दामिनी ॲप’ आपल्या मोबाईलमध्ये आहे ना?

लातूर, ता. २७ : लातूर जिल्हा मराठवाड्यात वीज पडून दुर्घटना होण्यात दुसऱ्या स्थानी आहे. यावर उपाय शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या सहकार्याने अभ्यासगट स्थापन केला होता. त्या अभ्यासगटाचे सादरीकरण झाले असून अभ्यासगटाने सुचवलेल्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी तात्काळ करणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी सांगितले. वीज पडण्याच्या घटनेतील जीवितहानी कमी करण्यासाठी किंबहुना टाळण्यासाठी काही ठोस उपाययोजना सुरु आहेतच तथापि यावरचा एक उपाय म्हणजे पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकार यांनी वादळी पाऊस, वीजांच्या कडकडाटाचा अचूक अंदाजाची पूर्वसूचना नागरिकांना मिळावी, याकरिता 'दामिनी' ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून वादळी पाऊस, वीजांच्...
पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महिला काँग्रेसचे बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरू
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महिला काँग्रेसचे बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरू

पिंपरी, ता. १९ मे : मागील सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने पिंपरी चिंचवड शहराला २४ तास पाणीपुरवठा करू असे जाहीर आश्वासन दिले होते. हे आश्वासन पूर्ण करण्याऐवजी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना मागील अडीच वर्षांपासून दिवसाआड व अनियमित कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. याला लोकप्रतिनिधी आणि भाजपचे पदाधिकारी जबाबदार आहेत. पाणीपुरवठा सुरळीत करू असे प्रशासनाने अनेकदा आश्वासन देऊन देखील अद्यापही पाणीपुरवठा पूर्णवेळ व सुरळीतपणे सुरू झालेला नाही याचा जाब विचारण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी सकाळपासून मनपाच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित महिला प्रशासनास जाब विचारीत आहेत की, पवना धरण १०० टक्के भरून देखील पाणीपुरवठा सुरळीत का केला जात नाही. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्र...
महापालिका रूग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचारी तीन महिन्यांपासून पगाराविना
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

महापालिका रूग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचारी तीन महिन्यांपासून पगाराविना

रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, ता. 26 : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जिजामाता, थेरगाव, सांगवी व यमुना नगर रूग्णालायातील कंत्राटी पद्धतीने नेमलेले वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स तसेच इतर पॅरीमेडीकल स्टाफ व कर्मचारी असे सुमारे 350 कर्मचारी मागील तीन महिन्यांपासून पगाराविना काम करत आहेत. ठेकेदार त्यांना वेळेवर पगार देत नसून फेब्रुवारीपासून त्यांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले असून आज जिजामाता रूग्णालयात या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून महापालिका प्रशासानाला जागे केले. दोन दिवसात वेतन देण्याचे ठेकेदाराने लेखी आश्वासन दिल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी काम सुरू केले. श्रीकृपा सर्व्हिसेस प्रा. लि. असे या ठेकेदाराचे नाव असून 1 ऑक्टोंबर 2021 पासून या ठेकेदाराला महापालिकेने वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स तसेच इतर पॅरीमेडीकल स्टाफ व कर्मचारी पुरविण्यासाठी नेमले आहे. त...
करोनामध्ये सरकारी तिजोरीतून मंत्र्यांच्या उपचारावर खासगी रूग्णालयात लाखोंचा खर्च ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचाही समावेश
महाराष्ट्र, मोठी बातमी

करोनामध्ये सरकारी तिजोरीतून मंत्र्यांच्या उपचारावर खासगी रूग्णालयात लाखोंचा खर्च ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचाही समावेश

file photo सरकारी रूग्णालयांवर ठाकरे सरकारचा भरवसा नाही का? मुंबई : करोना काळात एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागलेली असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षात करोना काळात महाविकास आघाडी सरकारमधील १८ मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेत लाखोंचा खर्च केल्याचं वृत्त झी २४ तासने दिलं आहे. उपचाराचा सर्व खर्च सरकारी तिजोरीतून भरण्यात आला. ही माहिती समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. झी 24 तासच्या वृत्तानुसार, राज्य सरकारमधील एकूण १८ मंत्र्यांनी करोना काळात खासगी रुग्णालयात उपचार घेतले. या उपचारासाठी लागलेला लाखोंचा खर्च सरकारी तिजोरीतून भरण्यात आला. गेली दोन वर्ष करोना काळात सर्वसामान्य उपचारासाठी वणवण फिरत असताना आणि राज्याची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना या १८ मंत्र्यांनी खासगी रुग्णालयातील उपचारासाठी तब्बल १ कोटी ३९ लाख ख...
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हल्लेखोरांना शोधण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
महाराष्ट्र, मोठी बातमी

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हल्लेखोरांना शोधण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई ता. 8: राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी पावले उचलत आहे. मुंबई उच्च न्यायालयाला शासनाने काय काय निर्णय घेतले आहेत त्याची व्यवस्थित माहिती दिली आहे. न्यायालयदेखील या सर्व प्रकरणी लक्ष ठेवून असून यासंदर्भातील निर्णयदेखील त्यांनी दिला आहे, मात्र आज ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या घरावर झालेल्या या अचानक हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय असून याला जबाबदार असणाऱ्यांवर तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. नेत्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या घरांवर हल्ले करणे हा पायंडा महाराष्ट्राने कधीही पाडलेला नाही असेही ते म्हणतात. मुख्यमंत्री आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात की, एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसंदर्भात आंदोलन करीत असले तरी राज्य शासनाने कधीही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले नाही. मह...
पिंपरी चिंचवडची तहान भागविणाऱ्या पवना धरणातील पाण्यावर तेलाचे तवंग ; यंदा पाण्याचा प्रश्न भेडसावणार?
पुणे, मोठी बातमी

पिंपरी चिंचवडची तहान भागविणाऱ्या पवना धरणातील पाण्यावर तेलाचे तवंग ; यंदा पाण्याचा प्रश्न भेडसावणार?

File Photo पुणे : पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ तालुक्याची तहान भागविणाऱ्या पवना धरणातून निघालेल्या पाण्यावर तेलासारखा तवंग दिसून येत आहे. पाण्यावर तरंग दिसत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ब्राह्मणोली, कोथर्न, येळसे, कडधे या भागातुन जाणाऱ्या पवना नदीवर हा तेलाचा तवंग दिसून येत आहे. पाण्यावर तेलाचा तवंग दिसून आल्यानंतर संबंधित विभागाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर धरणातील पाणी सोडण्यासाठी सध्या हायड्रोलिक यंत्रांचा वापर केला जात असल्याने पाण्यात तेलाचा तवंग दिसत असल्याचे स्पष्ट केले गेले. पवना धरणातील (Pawana Dam) पाणी सोडण्यासाठी सध्या हायड्रोलिक यंत्रांचा वापर होतो. त्यामुळे पाणी सोडताना त्या हायड्रोलिक यंत्रे सुरु केल्यानंतर त्यातून पाण्याची गळती होऊन मोठ्या प्रमाणात तेल पाण्यात मिसळत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पाण्यात तेल मिसळले जात असल्याने ...
अजितदादांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवड महापालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका होती – युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

अजितदादांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवड महापालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका होती – युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख

पिंपरी : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांनी भाजपच्या भ्रष्टाचारावर हल्ला चढवत त्यांची खिल्ली उडवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता महापालिकेत असताना माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महापालिका आशिया खंडात सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून नावलौकिकास होती, आता या भाजपच्या भ्रष्ट कारभारामुळे महापालिका सत्तर नंबर वर येऊन पोचली आहे, याची आम्हाला लाज वाटते. अशी टिका मेहबूब शेख यांनी येथे केली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मुख्य समन्वयक योगेश बहल, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली “महागाईवर हल्ला चढवू या! मोदी सरकारला जाब विचारूया!” असे निषेध आंदोलन शनिवारी (ता. २) करण्यात आले. संत तुकाराम नगर प...