मोठी बातमी

राज्यातील ३५ पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या
मोठी बातमी, महाराष्ट्र

राज्यातील ३५ पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या

मुंबई (लोक मराठी न्यूज) : राज्य गृह विभागाने राज्यातील तब्बल 35 पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे आदेश बुधवारी रात्री काढण्यात आले आहेत. बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे पुढीलप्रमाणे (कंसात कोठुन कोठे बदली झाली ते ठिकाण) : बांदेकर दामोदर वसंत (रत्नागिरी ते मुंबई शहर), पाटील सुधीर भिमराव (वाशिम ते मपोअ, नाशिक), मंडलवार जयदीश शिवाजी (लोहमार्ग, औरंगाबाद ते यवतमाळ), श्रीमती माने वंदना शिवराम (बृहन्मुंबई ते ठाणे शहर), भामरे अविनाश भगवान (बुलढाणा ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), खेडकर हरिष दत्‍तात्रय (औरंगाबाद, ग्रामीण ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), संपते प्रशांत पांडुरंग (पोप्रके, बाभळगाव, लातूर ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), जाधव विजय कृष्णराव (मओप, नाशिक ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), वाघमारे रूपचंद मधुकर (मओअ, नाशिक ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), पाटील ...
मोठी बातमी, विशेष लेख

जात हीच एक अंधश्रद्धा

Lok Marathi News Network सन १२ व्या शतकात महात्मा बसवण्णा यांनी चांभार समाजातील शीलवंत आणि ब्राम्हण समाजातील कल्याणी यांचा आंतरजातीय विवाह लावून दिला. ब्राम्हण असलेल्या गणेश आणि महार असलेल्या सारजा यांनी प्रेम केल्याबद्दल गावातील लोकांनी त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा सावित्रीबाई फुल्यांनी त्यांना वाचवून आश्रय दिला. ही घटना १८६८ सालातली. राजर्षि शाहू महाराजांनी तर आपली चुलत बहीण चंद्रप्रभाबाई यांचा विवाह धनगर असणाऱ्या यशवंतराव होळकर यांच्याशी निश्चित केला. एवढेच नाही तर असे १०० आंतरजातीय विवाह घडवून आणण्याचा त्यांनी संकल्प केला होता. त्यापैकी २५ विवाह त्यांनी पार पाडले. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनीही जात निर्मूलनासाठी आर्थिक स्वातंत्र्य, धर्म ग्रंथांची चिकित्सा आणि आंतरजातीय विवाह अशी त्रिसूत्री सांगितली होती. महात्मा गांधीजीही आपल्या उत्तर आयुष्यात फक्त आंतरजातीय विवाह असेल ...
कोणत्याच पीएमनं इतकी खालची पातळी गाठली नव्हती; दिल्ली विद्यापीठाच्या 200 शिक्षकांकडून मोदींचा निषेध
मोठी बातमी, राष्ट्रीय

कोणत्याच पीएमनं इतकी खालची पातळी गाठली नव्हती; दिल्ली विद्यापीठाच्या 200 शिक्षकांकडून मोदींचा निषेध

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका होत आहे. काँग्रेससह विरोधकांनी राजीव गांधींबद्दलच्या वक्तव्यावरुन मोदींचा समाचार घेतला. यानंतर आता शिक्षण क्षेत्रातल्या दिग्गजांनी देखील मोदींच्या विधानावर कडाडून टीका केली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या 200 शिक्षकांनी मोदींच्या विधानाबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कामगिरीची माहिती संपूर्ण देशाला आहे. देशानं त्यांच्या कामाचं अनेकदा कौतुक केलं आहे. जेव्हा कारगिलमध्ये भारतानं विजय मिळवला, तेव्हा आपल्या जवानांनी राजीव गांधींचं कौतुक करत घोषणा दिल्या होत्या, असं दिल्ली विद्यापीठाच्या शिक्षकांनी पत्रात म्हटलं आहे. 'मोदींनी राष्ट्राच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या राजीव गांधींचा अपमान केला आहे. मोदींचं विधान पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणा...
मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक
मोठी बातमी

मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक

रायगड : कामोठे येथे मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुध्द सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पनवेल यांनी गुन्हा दाखल केला आहे. भरारी पथक क्रमांक २ मधील प्रभाग अधिकारी व पथक प्रमुख प्रकाश गायकवाड यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. हीी कारवाई शनिवारी (दि. २७) सायंकाळी करण्यात आली. संदीप रामकृष्ण पराडकर (वय 31, रा. रूद्रराज बिल्डींग, कामोठे) आणि वैभव विठोबा पाटील (वय 34, रा. कामोठे गाव, ता. पनवेल, जि. रायगड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ११ हजार ९०० रुपये रोख, सत्यकुंज कॉम्प्लेक्स कामोठे येथे हाताने लिहिलेली मतदार यादी, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचे निवडणूक चिन्ह, फोटो व नावे असलेली यादी सापडली. चरणदीपसिंग बलदेव सिंग, विकास नारायण घरात (नगरसेवक पनवेल...