शैक्षणिक

Eduacational: Schools, Colleges.
LokMarathi News

डॉ. दत्तात्रय लोखंडे यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् लंडनतर्फे जागतिक पुरस्कार
शैक्षणिक, पुणे

डॉ. दत्तात्रय लोखंडे यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् लंडनतर्फे जागतिक पुरस्कार

पुणे : गॅलॅक्सी ग्रुप आणि गॅलॅक्सी युथ फॉउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दत्तात्रय लोखंडे यांना लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् पुरस्काराने गौरविण्यात आले. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मेहबूब सय्यद, मराठी चित्रपट निर्माते सिकंदर सय्यद आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते येथे नुकताच त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. https://youtu.be/ViDKbEVKKnc वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् लंडन तर्फे जगभरातील देशांमध्ये ग्लोबल प्लेज कॅम्पेन हा उपक्रम सुरु आहे. या अंतर्गत कोरोनाच्या काळात आणि त्या अगोदर उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान जागतिक स्तरावर केला जात आहे. याच अनुशंगाने डॉ. दत्तात्रय लोखंडे यांच्या कोरोनाच्या काळात आणि त्या आधीपासूनच सेवाभावी कामाची दखल घेत जागतिक स्तरावरील पुरस्काराने त्यांना...
शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अरूण चाबुकस्वार यांचा सन्मान
शैक्षणिक, पिंपरी चिंचवड

शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अरूण चाबुकस्वार यांचा सन्मान

पिंपरी : स्वातंत्र्यदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल न्यु सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कुलचे संस्थापक अरूण चाबुकस्वार यांचाही सन्मान करण्यात आला. महापौर उषा (माई) ढोरे, उपमहापौर हिराबाई (नानी) घुले, नगरसेविका निर्मला कुटे, नगरसेविका सुनीता तापकीर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन चाबुकस्वार यांना सन्मानित करण्यात आले. ...
प्रा. धनाजी उर्फ धनंजय सोमनाथ भिसे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. जाहीर
पुणे, शैक्षणिक

प्रा. धनाजी उर्फ धनंजय सोमनाथ भिसे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. जाहीर

डॉ. धनाजी भिसे पुणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच.डी. ही संशोधनपदवी जाहिर केली. त्याबाबतच्या खुल्या परीक्षेचे आयोजन विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये मराठी विभागप्रमुख डॉ. प्रभाकर देसाई ह्यांच्या अध्यक्षतेखाली आणि बहि:स्थ परीक्षक डॉ.सतीश बडवे (औरंगाबाद) ह्यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. त्याला ८२ हून अधिक व्यक्तींनी ऑनलाईन उपस्थिती लावली होती. डॉ. भिसे ह्यांनी पीएचडीसाठी डॉ. बाबासाहेब शेंडगे (रयत शिक्षण संस्थेचे एस. एस. जी. एम. कॉलेज, कोपरगाव) ह्यांच्या मार्गदर्शनाखाली 'इ.स. २००० ते २०१० मधील दलित आत्मकथने : एक शोध' ह्या शीर्षकाचा प्रबंध विद्यापीठाला सादर केलेला होता. या खुल्या परिक्षेला माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, माजी कुलगुरु एस. एन. पठाण, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, प्राचार्य डॉ अविनाश सांगोलकर, प्र...
न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहावीचा निकाल 100 टक्के
शैक्षणिक

न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहावीचा निकाल 100 टक्के

पिंपरी चिंचवड : राहटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता दहावीचा 100 टक्के निकाल जाहीर झाला आहे. चौधरी निशा बाबूलाल हिने 97.20 टक्के गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक मिळवला. तर परमार साहिल जगदिश याने 90.80 टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळवला आहे. सोळंकी आरती महेंद्र हिने 87.80 टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक तर चौधरी कमलेश मांगीलाल याने 87.20 टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक मिळविला आहे. तसेच चौधरी पूजा सखाराम हिने 85.60 टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला आहे. संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, नगरसेविका निर्मलाताई कुटे, संदीप चाबुकस्वार, संजय कुटे, राम शिंदे, वसंत निवगुणें, सचिन आवटे, मुख्याध्यापिका आसावरी घोडके यांच्या वतीने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फुल आणि...
पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु | दहावीच्या गुणपत्रिकेशिवाय भरता येणार प्रवेश अर्ज
शैक्षणिक, पिंपरी चिंचवड

पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु | दहावीच्या गुणपत्रिकेशिवाय भरता येणार प्रवेश अर्ज

पिंपरी चिंचवड : काळेवाडीतील मराठवाडा मित्र मंडळाचे पॉलिटेक्निक येथे शैक्षणिक सत्र 2021-22 करिता प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेशसाठी सुविधा केंद्र (FC 6449) कार्यान्वित करण्यात आले आहे. पॉलिटेक्निकला प्रवेश अर्ज भरण्याकरिता विद्यार्थ्यांना आता दहावीच्या गुणपत्रिकेची वाट पाहावी लागणार नाही. प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया दि. 30 जून 2021 पासून संस्थेत सुरुवात करण्यात आली आहे. पॉलीटेक्नीकच्या प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छीणाऱ्या इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी संस्थेत कार्यान्वित करण्यात आलेल्या सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्या गीता जोशी यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्याकरिता केवळ दहावीच्या परीक्षेचा आसन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. वर्ष 2021 च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल घोषित झाल्यानंतर सदर विद...
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी संपन्न
पुणे, शैक्षणिक

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी संपन्न

औंध : येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महानगरपालिकेतील विधी विभागाच्या कायदेशीर सल्लागार मा. अँड. मंजुषा इधाटे मॅडम उपस्थित होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या महिलांना रोजच्या दिवशी सन्मानाची वागणूक मिळायला पाहिजे. महिलांनी स्वतःच्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यामध्ये स्वयंप्रेरणेने नावलौकिक मिळवावा. आईने केलेल्या संस्कारांवर मुलांच्या विकासाचा व विचारांचा पाया रचला जातो. शिक्षणामुळे महिलांना आर्थिक अधिकार व स्वातंत्र्य मिळाले आहे. समाजाने स्त्रियांना सन्मानपूर्वक वागणूक द्यायला पाहिजे. महिलांनी समाजाप्रती बांधिलकीची भावना जोपासत सामाजिक कार्य करावे. असे आवाहन मा. अँड. मंजुषा इधाटे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्र...
दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार | शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मोठी बातमी, शैक्षणिक

दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार | शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत स्पष्ट केले. यासंदर्भात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री श्रीमती गायकवाड यांनी सांगितले की, दहावी व बारावीच्या परीक्षा हा महत्त्वाचा विषय असून शिक्षण विभागामार्फत याबाबत विविध मुद्यांवर चर्चा केली जात आहे. त्यानुसार या दोन्ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरविण्यात आले आहे. दहावीसाठी साधारणत: 16 लाख तर बारावीसाठी 15 लाख विद्यार्थी आहेत. कोरोनामुळे गेल्यावर्षीचे शैक्षणिक वर्ष अडचणीचे गेले आहे. अद्यापही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देताना परीक्षा कशा पद्धतीने आणि सुरक्षितपणे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या म...
डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने बाणेर येथील तुकाई टेकडीवर केले वृक्षारोपण
पुणे, शैक्षणिक

डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने बाणेर येथील तुकाई टेकडीवर केले वृक्षारोपण

पुणे : रयत शिक्षण संस्थेचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रयत विध्यार्थी परिषद आणि वसुंधरा अभियान, बाणेर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वड, जांभूळ, सिताफळ तसेच चिंच अशा विविध जातीच्या देशी फळझाडांचे वृक्षारोपण केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण आंधळे साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना लावलेल्या वृक्षांचे जतन करण्याचे आश्वासन प्राचार्य डॉ.अरुण आंधळे साहेब यांनी दिले. तसेच आज आपण जलसंधारण, मृदासंधारण, वृक्ष संवर्धन केले तरच भावी पिढीसाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व सुंदर पर्यावरण मिळू शकेल. असे मत व्यक्त केले. यावेळी वसुंधरा अभियान परिवाराच्या वतीने सांगण्यात आले की, सन 2006 पासून राष्ट्रीय सेवा योजना व पर्यावरण प्रेमी यांच्या सहकार्याने हळूहळू संपूर्ण टेकडी हिरवीगार बनविण्याचे स्वप्न ...
पिंपरी चिंचवड महापालिका शाळा आयएसओ मानांकित करा – दिपक चखाले
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

पिंपरी चिंचवड महापालिका शाळा आयएसओ मानांकित करा – दिपक चखाले

पिंपरी : शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शाळांचे आयएसओ मानांकित करण्यात याव्यात. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक चखाले यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, आज रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत जवळपास १४० ते १४५ प्राथमिक शाळा सुरु आहेत. यामधे मराठी शाळा १२८ तर इंग्रजी शाळा ९ व उर्दू ७ शाळा आहेत. या शाळेमधे शक्यतो गरीब, सर्वसामान्यांचे विशेष करून झोपडपट्टीत राहणारे मुले-मुली झ देशाच मोठ्या प्रमाणात शिकत आहेत. या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळत आहे का? तसेच स्वच्छता, आरोग्य व पिण्याचे स्वच्छ पाणी, खेळाचे मैदान, अशा अनेक गोष्टी आहेत का? नेमके किती मुले-मुली या शाळेत शिकत आहेत, व ते शिक्षण घेताना दिसतात का? त्यांची बौद्धिक व शारीरिक प्रगती झाली आहे का? किती मुले परिस्...
डाॅ. आंबेडकर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विविध उपक्रमांनी साजरा
पुणे, शैक्षणिक

डाॅ. आंबेडकर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विविध उपक्रमांनी साजरा

डॉ. शिरीष लांडगे-पाटील औंध : रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील मराठी विभागाने 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' विविध उपक्रमांनी साजरा केला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन मराठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे, पश्चिम विभागीय अध्यक्ष अँड.राम काडंगे साहेब व माजी विद्यार्थी सूर्यकांत सरवदे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत महाविद्यालयातील ३०० विद्यार्थीनी सहभाग घेतला.. विद्यार्थ्यांनी पु. ल. देशपांडे लिखित 'विठ्ठल तो आला आला' या एकांकिकेचे ऑनलाईन वाचन केले. यामध्ये महाविद्यालयातील अक्षय होळकर (विठ्ठल), आकाश टेंभुर्णीकर(भटजी), चंद्रकांत सोनवणे(वकील), सुयोग भोसले(डॉक्टर), परमेश्वर रिठे(शेठजी), हर्षद जानराव(मास्तर), कोमल जाविर(सखुबाई), रेणूका मीठे(द्वारकाबाई), अरुणा साबळे(गायिका), अविनाश पांडे(शिंपी)...