डॉ. दत्तात्रय लोखंडे यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् लंडनतर्फे जागतिक पुरस्कार

डॉ. दत्तात्रय लोखंडे यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् लंडनतर्फे जागतिक पुरस्कार

पुणे : गॅलॅक्सी ग्रुप आणि गॅलॅक्सी युथ फॉउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दत्तात्रय लोखंडे यांना लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् पुरस्काराने गौरविण्यात आले. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मेहबूब सय्यद, मराठी चित्रपट निर्माते सिकंदर सय्यद आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते येथे नुकताच त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् लंडन तर्फे जगभरातील देशांमध्ये ग्लोबल प्लेज कॅम्पेन हा उपक्रम सुरु आहे. या अंतर्गत कोरोनाच्या काळात आणि त्या अगोदर उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान जागतिक स्तरावर केला जात आहे. याच अनुशंगाने डॉ. दत्तात्रय लोखंडे यांच्या कोरोनाच्या काळात आणि त्या आधीपासूनच सेवाभावी कामाची दखल घेत जागतिक स्तरावरील पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

डोंगराळ भागात समाज सेवा

गेली सहा वर्षे शिक्षण क्षेत्रात आणि डोंगराळ भागात समाज सेवा आणि गेल्या दिड वर्षांपासून पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि हातावर पॉट भरणाऱ्या जनतेसाठी मोफत जेवण, औषधे, सॅनिटायजर, मास्क, रक्त, प्लास्मा डोनर दीनदुबळ्यांना, गरजूना सर्वतोपरी, विविध अत्यावश्यक साहित्य पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पोहचवले. विशेष बाब म्हणजे कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी करून घेणे हे त्यांना आवडत नाही. गरजूंच्या सेवेसाठी झटणारी अशी माणसे क्वचितच आढळतात. आपल्या नोकरी आणि व्यवसायाच्या कमाईच्या ६० टक्के मिळकत ते गोरगरीब अनाथ मुले यांच्या शिक्षणास मदत करतात.