शैक्षणिक

Eduacational: Schools, Colleges.
LokMarathi News

Chinchwad : पोदार शाळेत व्हर्च्युअल ई-लर्निग
शैक्षणिक

Chinchwad : पोदार शाळेत व्हर्च्युअल ई-लर्निग

चिंचवड, (लोकमराठी) : कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे शाळा पुन्हा सुरू होण्याची शक्यता कमी आहे. म्हणून चिंचवड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये व्हर्च्युअल ई-लर्निगच्या माध्यमातून मुलांसाठी ऑनलाईन अभ्यासक्रम घेतला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. असे प्राचार्य शहनाज कोटार यांनी सांगितले. शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नाते आतुट राहण्यासाठी हा अभ्यासक्रम घेतला जात असून विद्यार्थी शाळेचा सगळा अनुभव घेत आहेत. या उपक्रमास शाळेच्या प्राचार्य शहनाज कोटार यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक विशेष शैलीने विद्यार्थांना मार्गदर्शन करीत आहेत. त्यातच विद्यार्थ्यांना आपले शिक्षक व वर्गमित्र यांच्यासोबत संवाद साधला जातो. त्यामुळे विदयार्थी खेळीमेळीने शिक्षणाचा आनंद घेत असल्याचे प्राचार्य कोटार यांनी सांगितले....
देव-दर्शन युवा मंच तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा
शैक्षणिक

देव-दर्शन युवा मंच तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा

लोकमराठी न्यूज नेटवर्क चिंचवड : पिंपरी-मोहननगर मध्ये, देव-दर्शन युवा मंच पिंपरी चिंचवड शहर तर्फे दहावी च्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा विषयी मार्गदर्शन करून शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी दिपक रामचंद्र जाधव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेच्या कालावधीमध्ये तंदुरुस्त शरीर कसे ठेवायचे, वेळेचे नियोजन कसे करायचे याबाबत माहिती दिली. त्याप्रसंगी दिनेश सेन, नागेश पवार, शरद लावंडसर, आशा सेन आणि वैशाली गायकवाड यांनी उपस्थिती होत्या. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली....
नवीन टेक्नॉलॉजीची अद्यावत माहिती गरजेची, अन्यथा दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल – डॉ. प्रमोद देव
पुणे, शैक्षणिक

नवीन टेक्नॉलॉजीची अद्यावत माहिती गरजेची, अन्यथा दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल – डॉ. प्रमोद देव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राज्यस्तरीय चर्चासत्राचे उद्घाटन औंध (लोकमराठी) : टेक्नॉलॉजीचा वापर आपण योग्य पद्धतीने व काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. बऱ्याचदा आपण टेक्नॉलॉजीच्या आहारी जातो. त्यामुळे आपण यांत्रिक होतो. इंटरनेट ऑफ थिंग्सचा (IOT) वापर जीवनाच्या अनेक क्षेत्रात केला जात आहे. उदा.स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट कार, स्मार्ट सिटी व स्मार्ट शेती इतर क्षेत्रांमध्ये आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला जात असून, या नवीन टेक्नॉलॉजीची अद्यावत माहिती आपण करून घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्याच्या दुष्परिणामांना आपणास सामोरे जावे लागेल. मानवी मेंदूत मर्यादित डेटा साठवण्याची क्षमता असल्याने, मानवाने कॉम्प्युटर, मोबाईल फोन व पेन ड्राईव्ह यासारख्या यंत्रांचा शोध लावला आहे. मानवाने बदलत्या तंत्रज्ञानानुसार आपल्या ज्ञानात बदल करायला हवेत. तरच तो बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात आपले अस्तित्व सिद...
आर्थिक महासत्ता होण्यासाठी ‘रिसर्च ॲण्ड नॉलेज बेस इकॉनॉमी’ हवी – डॉ. अरविंद नातू
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

आर्थिक महासत्ता होण्यासाठी ‘रिसर्च ॲण्ड नॉलेज बेस इकॉनॉमी’ हवी – डॉ. अरविंद नातू

पीसीसीओईआर मध्ये ‘अविष्कार 2019’ स्पर्धा संपन्न, साठ अभियांत्रिकी महाविद्यालयांचा सहभाग पिपंरी : सध्याची भारतीय अर्थव्यवस्था ‘सर्व्हिस बेस इकॉनॉमी’ प्रकारातील आहे. भारताला जागतिक महासत्ता होण्यासाठी हि अर्थव्यवस्था ‘रिसर्च ॲण्ड नॉलेज बेस इकॉनॉमी’ मध्ये वाढवावी लागेल. असे मार्गदर्शन आयसरचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र येथे (पीसीसीओईआर) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने ‘अविष्कार 2019’ या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्‌घाटन प्रसंगी डॉ. नातू बोलत होते. यावेळी जेकेएलएमपीएसचे संचालक मानसिंग कुंभार, विद्यापीठाच्या आयक्युएसीचे प्रमुखे डॉ. मनिष वर्मा, पीसीसीओईआरचे प्राचार्य हरिष तिवारी, प...
शैक्षणिक, पुणे

समाजामध्ये परिवर्तन करणाऱ्या चळवळींचे प्रेरणास्रोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्रा. प्रकाश पवार

औंध-पुणे (लोकमराठी) : रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुण, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रकाश पवार म्हणाले की, "समाजामध्ये परिवर्तन करणाऱ्या चळवळींचे प्रेरणास्रोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असून, समाजपरिवर्तनाची प्रेरणा आणि ऊर्जा घेण्यासाठी अनेक माणसे चैत्यभूमीला भेट देतात. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त त्यांचे विचार समजून घेऊन आत्मसात करायला हवेत. महात्मा जोतीराव फुले म्हणायचे जशी शेतीला पाण्याची गरज असते. तशीच...
न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महात्मा फुले यांना अभिवादन
शैक्षणिक

न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महात्मा फुले यांना अभिवादन

रहाटणी (लोकमराठी) : येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, तात्या शिनगारे, युवराज प्रगणे, राजेश गायकवाड, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. महात्मा फुले यांनी सर्व समाजाच्या मुलींसाठी १८४८ साली पहिली शाळा काढली व त्यानंतर १८५१ साली अनुसूचित जातीच्या मुलांसाठी शाळा काढली. मुलींना शिकविण्यासाठी शिक्षिका मिळत नसत त्याकरीता त्यांनी सावित्रीमाई फुले यांना शिक्षण दिले व पहिली शिक्षिका बनविले. संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी आणि संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव...