शैक्षणिक

Eduacational: Schools, Colleges.
LokMarathi News

रक्तदान करणे हा महायज्ञ आहे – प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

रक्तदान करणे हा महायज्ञ आहे – प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड

पिंपरी :“युद्धे, महायुद्धे, घात-अपघात, कोरोना, विविध आजारपणे आणि कितीतरी घटना, दुर्घटना जगाच्या पाठीवर नित्य घडत असतात. त्यावेळी लक्षावधी रुग्णांची सेवासुश्रुषा करावी लागते. त्यावेळी महत्त्वाची गरज भासते ती रक्ताची. रक्ताचा तुटवडा असेल तर वेळ प्रसंगी प्राणही जाऊ शकतो म्हणून पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यासाठी गरज आहे ती रक्तदानाची. रक्तदान हा आजच्या काळातील महायज्ञ आहे. रक्तदान म्हणजे जीवनदान आहे.” असे विचार प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी येथे मांडले. रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयात नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी या शिबिराचे उद्घाटन करताना वरील विचार मांडले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवायोजना व N.C.C. व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्या...
एस. एम. जोशी कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न

https://youtu.be/ddFcpCEO7pk हडपसर (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दिनांक 20 मार्च 2022 ते 26 मार्च 2022 रोजी काळेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे या ठिकाणी संपन्न झाले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संगिताताई काळे, अमित झेंडे (सरपंच), योगेश काळे (ग्रामपंचायत सदस्य), श्रद्धाताई काळे दिवे पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, एस एम जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. सात दिवसाच्या निवासी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर प्रबोधनात्मक व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. रंजना जाधव यांनी 'महिला सुरक्षा' या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्ष म्हणून संगीताताई काळे उपस्थित हो...
स्वयंरोजगार व उद्योजकता विकास कार्यशाळा महात्मा फुले महाविद्यालयात संपन्न
शैक्षणिक

स्वयंरोजगार व उद्योजकता विकास कार्यशाळा महात्मा फुले महाविद्यालयात संपन्न

पिंपरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंरोजगार व उद्योजकता विकास कार्यशाळा गुरुवारी (दिनांक 17 मार्च) पार पडली. सदर कार्यशाळेत पहिल्या सत्रात सुरेश उमप (विभागीय अधिकारी नवी मुंबई) यांचे उद्योजकीय व्यक्तिमत्व उद्योग संधी या विषयावर व्याख्यान झाले. त्या व्याख्यानात त्यांनी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये सविस्तर विशद केली, तसेच उद्योगाच्या असणाऱ्या विविध संधीचा परामर्श घेतला. दुसऱ्या सत्रात गणेश खामगळ (संचालक, मिटकॉन फोरम, पुणे) यांचे उद्योजकता विकास शास्त्र व शासकीय योजना या विषयावर व्याख्यान झाले. त्या व्याख्यानात त्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय, येथून मिळणारी माहिती तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती सविस्तर सांगितली. तिसऱ्या सत्रातउद्योजक दिगंबर सुतार, यांनी अनुभव...
समाजभूषण अप्पासाहेब जेधे यांच्या दूरदृष्टीमुळे बहुजनांना शिक्षणाची दारे उघडली – प्रा. जयप्रकाश जगताप
पुणे, शैक्षणिक

समाजभूषण अप्पासाहेब जेधे यांच्या दूरदृष्टीमुळे बहुजनांना शिक्षणाची दारे उघडली – प्रा. जयप्रकाश जगताप

पुणे : जेधे मॅन्शन हे केवळ जेधे कुटुंबाच्या वास्तवाचे किंवा राहण्याची ठिकाण नसून, ते सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक चळवळीचे केंद्रस्थान होते. अप्पासाहेबांची शैक्षणिक व सामाजिक दृष्टी महत्त्वपुर्ण ठरली. त्यांच्या काही निर्णयांमुळे बहुजनांच्या मुलांना आज शिक्षणाची दारे खुली झालेली पाहायला मिळतात. त्यांची तत्कालीन दूरदृष्टी आज घडीला बहुजनांच्या शिक्षणासाठी सर्वार्थानं महत्त्वपूर्ण ठरताना दिसते. असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. जयप्रकाश जगताप यांनी केले. श्री शिवाजी मराठा सोसायटीचे समाजभूषण बाबुराव उर्फ अप्पासाहेब जेधे महाविद्यालयांमध्ये अप्पासाहेब जेधे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. लेखक, प्रकाशक, कला शिक्षक व नियामक मंडळ तसेच श्री शिवाजी मराठा सोसायटीचे सदस्य असलेले प्रा. जयप्रकाश जगताप यांनी अप्पासाहेब जेधे यांच्या जीवन कार्या...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन

हडपसर (प्रतिनिधी) : प्राणीशास्त्र, भूगोल आणि आय क्यु.ए .सी यांच्या संयुक्त विद्यमाने इम्पॅक्ट ऑफ अंथरपोजेनिक ऍक्टिव्हिटीज व नेचरल केल्यामीलिडीज ऑन बायोडायव्हर्सिटी या विषयावर एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आज (ता. १५ मार्च) आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित केले आहे. या आंतरराष्ट्रीय वेबिनारच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण जम्मू-काश्मीर विद्यापीठाचे डॉ. कुलदीप शर्मा करणार आहेत. समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे डॉ. बबन इंगोले उपस्थित राहणार आहेत. तसेच डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई रत्नागिरी, डॉ. रॉबर्ट केस प्रेझेक पोलंड, डॉ. रोबोर्ट पेरेरिया अमेरिका, विचार व्यक्त करणार आहेत, अशी माहिती एस. एम .जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी दिली....
सावित्रीबाई फुले स्मृतिदिन व विठ्ठलराव तुपे जयंतीनिमित्त अभिवादन
शैक्षणिक

सावित्रीबाई फुले स्मृतिदिन व विठ्ठलराव तुपे जयंतीनिमित्त अभिवादन

हडपसर (प्रतिनिधी) : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी प्रतिमा पूजन करुन अभिवादन केले. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा त्यांनी घेतला. याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळेच महिलांना सर्व क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळत आहे. तसेच त्या भारताच्या पहिल्या स्री शिक्षिका असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. स्वर्गीय विठ्ठलराव तुपे पाटील यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रसंगी उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, आय. क्यु. ए. सी चे समन्वयक डॉ. किशोर काकडे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ.शोभा कोरडे यांनी तर आभार सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.शिल्पा शितोळे यांनी मानले....
एस. एम. जोशी कॉलेजमधील प्राध्यापकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची गाईडशिप
शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमधील प्राध्यापकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची गाईडशिप

हडपसर (प्रतिनिधी) : डॉ. एकनाथ मुंढे (अर्थशास्त्र) डॉ. अतुल चौरे (मराठी), डॉ. शहाजी करांडे (इंग्रजी), डॉ. शिल्पा शितोळे (बॉटनी), डॉ. ज्योती किरवे (कॉमर्स) या प्राध्यापकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. गाईडशीप मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच एस. एम. जोशी महाविद्यालयातील बॉटनी विषयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे, केमिस्ट्री विषयाचे डॉ.गजानन वाघ, डॉ.शकुंतला सावंत, डॉ.रंजना जाधव, मराठी विषयाचे डॉ.राजेंद्र ठाकरे, इतिहास विषयाचे डॉ. दिनकर मुरकुटे यांनाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. गाईडशिप असून, महाविद्यालयात केमिस्ट्री विभाग आणि मराठी विभागाचे पीएच. डी. चे संशोधन केंद्र आहे. या संशोधन केंद्रामार्फत आणि रिसर्च गाईड यांच्या माध्यमातून भविष्यात संशोधनास अधिक ...
श्री फत्तेचंद जैन विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

श्री फत्तेचंद जैन विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा

चिंचवड : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व जुनिअर कॉलेज मध्ये ८ मार्च रोजी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी जैन विद्या प्रसारक मंडळाचे मानद सचिव ऍड. राजेंद्रकुमार शंकरलाल मुथा व सहाय्यक सचिव अनिलकुमार मोतीलाल कांकरिया यांनी सर्व महिला शिक्षकांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सहाय्यक प्रकल्प अधिकारी निरंतर शिक्षण प्रक्रिया जिल्हा परिषद, पुणे विभाग शिल्पा रोडगे यांनी शाळेस भेट दिली व सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांचे स्वागत व सत्कार प्रशालेच्या प्राचार्य नवले एस. एस यांनी केले. महिला दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इंदिरा गांधी, सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, जिजाऊ इत्यादी महिलांच्या वेशभूषा केल्या होत्या. याप्रसंगी प्रशालेतील सर्व महिला शिक्षकांचा व महिला पालकांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. कार्...
राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. शकुंतला सावंत यांची नियुक्ती
शैक्षणिक

राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. शकुंतला सावंत यांची नियुक्ती

हडपसर (प्रतिनिधी) : केमिस्ट्री विभागाच्या प्रोफेसर डॉ. शकुंतला सावंत यांची राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय औंध (ता. खटाव जि. सातारा) येथे प्राचार्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल एस एम जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. शकुंतला सावंत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. संजय जडे, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, आय. क्यु. ए. सी. चे प्रमुख डॉ. किशोर काकडे, डॉ. गजानन वाघ, डॉ. एस. पी. खुंठे, डॉ. राजेंद्र ठाकरे, डॉ. ग्रंथपाल शोभा कोरडे, अधीक्षक आर. डी. लोखंडे आदि प्राध्यापक व सेवक वर्ग उपस्थित होते....
डॉ.आंबेडकर महाविद्यालयात महिलांसाठीचे मोफत आरोग्य शिबीर संपन्न
शैक्षणिक

डॉ.आंबेडकर महाविद्यालयात महिलांसाठीचे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

पुणे (प्रतिनिधी) : उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील "महिला सक्षमीकरण केंद्र" व "युनिवर्सल हेल्थ सेंटर "पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व वयोगटातील महिलांसाठी संपूर्ण शाररीक तपासणी शिबीर दि. ७ मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे साहेबानी सदरच्या तपासणी शिबिराचे महत्व अधोरेखित केले. भारतीय समाजात महिलांच्या आरोग्याचे प्रश्न हे ज्वलंत आहेत. बऱ्याच वेळा महिला त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात व आजार गंभीर झाल्यानंतर त्याकडे पाहतात. कोणत्याही आजाराची सुरवातीलाच निदान झाले तर त्याच्यावर उपचार करणे सोईचे पडते, त्यामुळे सदरचे शिबीर हे याच कारणास्तव महत्वाचे ठरते. अशा शिबिरांच्या माध्यमातून महिलांनी आपल्या आरोग्यावि...