PCMC : काळेवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
काँग्रेस शहराध्यक्षा सायली नढे यांच्या प्रयत्नामुळे नराधम गजाआड
पिंपरी, दि. ५ सप्टेंबर २०२३ : एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरी कोणी नसताना तीच्यावर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधमाला वाकड पोलीसांनी अटक केली. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पिडीत मुलीच्या भावाने याबाबत आरोपीला जाब विचारला असता, आरोपीनेच तीच्या भावाला कोणाला काही सांगितल्यास हात पाय तोडण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिडीतीच्या भावाने काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे व सामाजिक कार्यकर्ते किरण नढे यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर नढे दांपत्याने पिडीतीच्या भावाला वाकड पोलीस ठाण्यात घेऊन जात गुन्हा दाखल केला.
सौरभ सुरेश चव्हाण (वय २१) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून वाकड पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, पिडीत मुलगी काळेवाडीत आ...