ताज्या घडामोडी

‘लाडकी बहीण योजने’साठी पुन्हा मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत अर्ज करता येणार…
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

‘लाडकी बहीण योजने’साठी पुन्हा मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत अर्ज करता येणार…

लोकमराठी न्यूज नेटवर्क : महायुती सरकारची सर्वात महत्वकांक्षी योजना असलेल्या "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत ज्या महिलांना मिळाला नाही, त्यांच्यापर्यंत लाभ पोहचवण्यासाठी ही मुदतवाढ देणात आली आहे. आता महाराष्ट्रातील महिलांना मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत (Ladki Bahin Yojana) अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 ही नवीन मुदत दिली आहे. यापूर्वी या योजनेत अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत होती. आता 15 ऑक्टोबर 2024 रात्री बारा वाजेपर्यंत या योजनेत अर्ज करता येणार आहे. मात्र हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच भरावे लागणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत ग्रामीण भागापासून शहरापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला होता. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. त्यामुळे सरकारने अ‍ॅप आ...
ब्रह्माकुमारीज परिवाराच्या वतीने पत्रकारांचा सपत्नीक सत्कार
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, सामाजिक

ब्रह्माकुमारीज परिवाराच्या वतीने पत्रकारांचा सपत्नीक सत्कार

रिसोड/प्रतिनिधी शंकर सदार :- स्थानिक सिव्हिल लाईन स्थित ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने रिसोड शहरासह तालुक्यातील अधिकृत प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीयात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दीना निमित्ताने ब्रह्माकुमारीज मीडिया विंग सदस्य रवि अंभोरे यांच्या पुढाकाराने व ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राच्या संचलिका ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली 6 जानेवारी शनिवारी सकाळी 9 वाजता पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्माकुमारी ज्योती दीदी तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर तर सत्कार मुर्ती म्हणून सर्व प्रतिष्ठित पत्रकार उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तहसीलदार तेजनकर, ब्रह्माकुमारी ज्योती दीदी, ...
PCMC : काळेवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
ताज्या घडामोडी, क्राईम

PCMC : काळेवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

काँग्रेस शहराध्यक्षा सायली नढे यांच्या प्रयत्नामुळे नराधम गजाआड पिंपरी, दि. ५ सप्टेंबर २०२३ : एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरी कोणी नसताना तीच्यावर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधमाला वाकड पोलीसांनी अटक केली. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पिडीत मुलीच्या भावाने याबाबत आरोपीला जाब विचारला असता, आरोपीनेच तीच्या भावाला कोणाला काही सांगितल्यास हात पाय तोडण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिडीतीच्या भावाने काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे व सामाजिक कार्यकर्ते किरण नढे यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर नढे दांपत्याने पिडीतीच्या भावाला वाकड पोलीस ठाण्यात घेऊन जात गुन्हा दाखल केला. सौरभ सुरेश चव्हाण (वय २१) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून वाकड पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, पिडीत मुलगी काळेवाडीत आपला भा...
Hari Narke : पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला; विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन
महाराष्ट्र, ताज्या घडामोडी, मोठी बातमी

Hari Narke : पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला; विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन

पुणे (लोकमराठी न्यूज) : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. Asian Heart Hospital मध्ये घेतला अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 60 व्या वर्षी मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. समता परिषदेच्या उद्या मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी हरी नरके आजच पहाटे पुण्याहून मुंबईला येत होते. येताना पहाटे त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला त्यामुळे बीकेसीच्या एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र शासनाने स...
सहाय्यक पोलीस आयुक्ताने पत्नी व पुतण्याची गोळ्या झाडून केली हत्या; स्वतःलाही गोळी झाडून संपवलं
ताज्या घडामोडी, क्राईम

सहाय्यक पोलीस आयुक्ताने पत्नी व पुतण्याची गोळ्या झाडून केली हत्या; स्वतःलाही गोळी झाडून संपवलं

पुणे (लोकमराठी न्यूज) : एका सहाय्यक पोलीस आयुक्तांने पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वता:वर गोळी झाडून आपले जीवन संपवलं आहे. ही धक्कादायक घटना आज (ता. २४ जुलै २०२३) पहाटे घडली असून ही बातमी समजताच एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. भारत गायकवाड (ACP Bharat Gaikwad) असे त्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. तर मोनी गायकवाड (वय ४४) असे पत्नीचे तर दीपक गायकवाड (वय ३५) असे पुतण्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत गायकवाड हे अमरावती पोलीस (Amaravati Police) दलात सहाय्यक आयुक्त पदी कार्यरत होते. त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला आहे. सहाय्यक आयुक्त गायकवाड हे पुण्यात आपल्या कुटूंबाकडे आले होते. त्यांनी मध्यरात्री चारच्या सुमारास पत्नीचा व पुतळ्याचा गोळी झाडून खून केला आहे. खुनानंतर भारत ...
पोलीस भरतीची लेखी परीक्षा होणार २३ जुलैला
ताज्या घडामोडी, नोकरीविषयक

पोलीस भरतीची लेखी परीक्षा होणार २३ जुलैला

मुंबई, ता. 19 जुलै : सशस्त्र पोलीस शिपाई भरती (Police Bharti) -२०२१ शारीरिक चाचणी मधील २ हजार ५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता रॉयल गोल्ड स्टुडिओ, रॉयल पाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई (Mumbai) या ठिकाणी घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर येण्याकरीता गोरेगाव रेल्वे स्टेशन येथून बस क्रमांक ४५२ असून स्टॉपचे नाव मयूर नगर बस स्टॉप आहे. या लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांनी २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत या परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होईल. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. या लेखी परीक्षेसाठी येताना उमेदवारांनी महाआयटीने ई-मेलद्वारे पुरविलेले शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेचे ओळखपत्र डाऊनलोड करुन त्याची कलर प्रिंट आणि आवेदन अर्जावरील दोन कलर पासपो...
Delhi flood: यमुना नदीच्या पातळीत वाढ! दिल्ली बुडाली
ताज्या घडामोडी, मोठी बातमी, राष्ट्रीय

Delhi flood: यमुना नदीच्या पातळीत वाढ! दिल्ली बुडाली

नवी दिल्ली : दिल्लीतील यमुना नदीचे पाणी सतत विकराल रूप धारण करित आहे. 46 वर्षांचा विक्रम मोडत पाण्याची पातळी 208 मीटरच्या पुढे गेली आहे. राजधानीतील सर्व सखल भाग पाण्यात बुडाला आहे. कश्मीरी गेट आयएसबीटीमध्ये अनेक फूट पाणी आहे. नेहमी गजबजणारा रिंगरोड सुनसान आहे. रिंगरोडवर यमुना नदीच्या पाण्यात उसळणाऱ्या लाटा आपल्याला समुद्राची आठवण करून देत आहेत. राजघाटापासून चांदगी राम आखाड्यापर्यंत ते पाण्यात बुडाले आहेत. दिल्लीतील सर्वात मोठे स्मशान बोधघाट बंद करण्यात आले आहे. त्यात अनेक फूट पाणी साचले आहे. https://youtu.be/lLG_PRuuFgw केंद्रीय जल आयोगानुसार हरियाणा बॅरेजमधून येणाऱ्या पाण्याची पातळी दुपारनंतर कमी होण्याची शक्यता आहे. दिल्लीचा लाल किल्ला देखील पाण्याखाली गेलाय. दिल्लीतील पूरसदृश परिस्थितीमुळे यमुनेच्या आसपासच्या भागातील शाळा रविवारपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. दिल्लीच्...
नोकरीसाठी पुण्याला निघालेल्या अवंतीवर काळाचा घाला 
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

नोकरीसाठी पुण्याला निघालेल्या अवंतीवर काळाचा घाला

लोकमराठी न्यूज नेटवर्क | १ जुलै २०२३ बुलढाणा : येथील समृद्धी महामार्गावर मध्यरात्री खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात बस उलटून डिझेल टँक फुटल्याने बसला आग लागली आणि झोपेतच २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात अनेकांनी आपली मुलं, नातेवाईक गमावली, तर काहींचं अख्खं कुटुंब गेलं. यापैकीच अवंती पोहनीकर ही तरुणी देखील होती. अवंतीचा या अपघातात होरपळून मृत्यू झाला. तिच्या अशा अकाली जाण्याने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अवंती पोहनीकर ही वर्ध्याची असून ती इंजिनीअर होती. पुण्याला जाण्यासाठई शुक्रवारी सायंकाळच्या खासगी ट्रॅव्हल्सने ती निघाली होती. परंतु मध्यरात्री बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच अवंतीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. अपघाताची माहिती मिळाली तेव्हा आपली मुलगी ठीक असेल ना, तिला का...
तुम्ही डोकं आपटून घ्याल, अशा पद्धतीने दिनेश कार्तिक धावबाद झाला
क्रीडा, ताज्या घडामोडी

तुम्ही डोकं आपटून घ्याल, अशा पद्धतीने दिनेश कार्तिक धावबाद झाला

दिनेश कार्तिक IPL 2023 मध्ये वाईट टप्प्यातून जात आहे. गेल्या मोसमात स्टार असलेल्या डीकेला यावेळी धावा करता आल्या नाहीत. शिवाय, तो यावर्षी विकेटकीपिंगमध्येही चुका करत आहे. आणि त्याची रनिंग बिटवीन द विकेट हा देखील यावेळी चर्चेचा विषय आहे. कार्तिक यावेळीही रनआउट झाल्यामुळे चर्चेत आला आहे. पण लखनौ विरुद्ध, सोमवार 1 मे रोजी त्यांचीही फसवणूक झाली. लखनौविरुद्ध बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि सुरुवातीला हा निर्णय योग्य वाटला. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने पॉवरप्लेमध्ये कोणतेही नुकसान न करता बाहेर काढले. मात्र यादरम्यान त्याचा वेग खूपच कमी होता. धावणे खूप हळू असावे.आणि त्यानंतर कोहलीची विकेट पडल्यानंतर सतत हादरे बसत होते. 18 वे षटक संपले तेव्हा परिस्थिती अशी होती की संघाने 6 गडी गमावून 115 धावा केल्या होत्या. वानिंदू हसरंगा आणि दिनेश कार्तिक क्रीजवर होते. शेव...
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणेच्या वतीने पोलिस पाटिल सन्मान
ताज्या घडामोडी

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणेच्या वतीने पोलिस पाटिल सन्मान

लोणावळा, दि.९ (लोकमराठी) - लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणेच्या वतीने पोलिस पाटिल यांचा सन्मान करण्यात आला. पोलीस पाटील हा गाव पातळीवरचा एक महत्त्वाचा कणा आहे. प्रामुख्याने गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था, शांतता प्रस्थापित करण्याचे काम पोलीस पाटील करीत असतो. गाव पातळीवर कोणतेही काम असू दे सेवेसाठी सदैव तत्पर असणारा पोलीस पाटील असतो. म्हणून अशा पोलीस पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन लोणावळा विभागाचे उपविभागीय अधिकारी (आयपीएस) सत्य साई कार्तिक, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या वतीने लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील व पोलीस मित्र यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस पाटील संजय जाधव,पोलीस पाटील शहाजहान इनामदार,पोलीस पाटिल ह.भ.प अनंता शिंदे, पोलीस पाटिल अनिल पडवळ, पोलीस पाटिल राहुल आंबेकर, पोलीस पाटील गुरुनाथ मांडेकर, पोलीस पाटी...