बोगस प्रमाणपत्र प्रकरणातील महापालिकेच्या 28 लिपिकांची खातेनिहाय चाैकशी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चर्तुर्थ श्रेणी वर्गातून लिपिक पदावर पदोन्नती मिळविलेल्या कर्मचा-यांनी टंकलेखनाचे बोगस प्रमाणपत्र सादर केले आहे. त्यामुळे 117 कर्मचा-यांपैकी 28 लिपिकांची पदोन्नती रद्द करण्यात आली. त्या कर्मचा-यांचे वर्ग ड चतुर्थश्रेणी पदावर पदावतन करुन खातेनिहाय चाैकशीचे आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचा-यांची अपुरी संख्या, शासन दरबारी लालफितीत अडकलेल्या आकृतीबंधामुळे प्रशासनाला कर्मचा-यांची कमरतता जाणवत होती. त्यामुळे प्रशासनाने मंजूर पदावर चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनूसार लिपिक पदावर पदोन्नती दिली. महापालिका आस्थापनेवरील वर्ग 4 मधील सुमारे 117 कर्मचा-यांना वर्ग 3 मधील लिपिक पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय प्रशासनाने काही दिवसापुर्वी घेतला. त्याचा लाभ सुमारे 117 कर्मचा-यांना झाला. त...