ताज्या घडामोडी

नायब तहसीलदार पदी निवड झालेल्या थेरगाव कन्या तमन्ना शेख यांचा सन्मान
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड

नायब तहसीलदार पदी निवड झालेल्या थेरगाव कन्या तमन्ना शेख यांचा सन्मान

पिंपरी : थेरगावच्या तमन्ना शेख हिची नायब तहसीलदार पदी निवड झाल्याबद्दल क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एजुकेशन फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. २०२१-२२ मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तमन्ना शेख हिने उत्कृष्ट यश मिळवले. त्यामुळे तीची नायब तहसीलदार पदी निवड झाली. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख, इकबाल शेख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन तमन्ना हिला सन्मानित करण्यात आले. घरची परिस्थिती बिकट, आई शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावते, वडील फोर्स मोटर्स कंपनीत कामगार आहेत. थेरगाव येथील आनंदवन सोसायटीत राहणारे शेख कुटुंबातील तमन्ना हिने कुठलाही क्लास न लावता महाराष्ट्र लोकसेवा आयॊगाची परीक्षा दिली व तिसऱ्या प्रयत्नामध्ये मुलींमध्ये राज्यात ८ वी, सर्वसाधारण गटात १०६ वी येऊन नायब तहसीलदार पदी निवड झाली. &...
आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त “भावना” लघुपटातील कलाकारांचा सन्मान!
ताज्या घडामोडी, मनोरंजन

आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त “भावना” लघुपटातील कलाकारांचा सन्मान!

पिंपरी चिंचवड : वर्किंग वूमन वर आधारित असलेला व महिला सशक्तिकरणाचा सामाजिक संदेश देणारा बहुचर्चित "भावना" लघुपटाला नुकताच रॉयल सोसायटी ऑफ टेलिव्हिजन व मोशन पिक्चर्स आवार्ड या आंतरराष्ट्रीय संस्थे तर्फे "बेस्ट वूमन शॉर्ट फिल्म" म्हणून पुरस्कार मिळाला आहे. तसेच गोल्डन ईगल आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल मध्ये देखील "बेस्ट इंडियन शॉर्ट फिल्म" म्हणून "भावना" लघुपटाला गौरविण्यात आले आहे. सलग दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा पिंपरी-चिंचवड शहरातील हा एकमेव लघुपट ठरला आहे. याचीच दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने नेहरूनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात "भावना" लघुपटाचे दिग्दर्शक सीए अरविंद भोसले यांच्या सह लघुपटातील सर्वच कलाकारांचा स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे शहराध्यक्ष दत्ता घुले, अ...
मुंबईतील आयपीएलला कोणताही धोका नाही – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
ताज्या घडामोडी

मुंबईतील आयपीएलला कोणताही धोका नाही – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबईत होऊ घातलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला कोणताही धोका नाही, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत दिली. सदस्य अमित साटम यांनी नियम 292 अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलतांना याबाबत वक्तव्य केले होते. यावर गृहमंत्री श्री. वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर वानखेडे स्टेडियम आणि ट्रायडेंट हॅाटेलवर दहशतवादी हल्ला करण्याबाबत कोणतीही धमकी मिळाली नाही. खेळाडूंची निवास व्यवस्था असलेल्या हॉटेल्सची दहशतवाद्यांनी रेकी केली असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमात येत आहेत. या वृत्ताचे खंडण करून अशी कोणतीही धमकी आणि रेकी करण्यात आली नाही, मुंबईतील आयपीएलला कोणताही धोका नसल्याचे स्पष्टीकरण मुंबई पोलीसांनीही केले आहे, असे गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांनी सांगितले....
नागरिकांना भेडसावणारे प्रश्न आयुक्त व प्रशासक राजेश पाटील यांनी ताबडतोब सोडवावेत : डॉ. कैलास कदम
ताज्या घडामोडी

नागरिकांना भेडसावणारे प्रश्न आयुक्त व प्रशासक राजेश पाटील यांनी ताबडतोब सोडवावेत : डॉ. कैलास कदम

पिंपरी (दि. १२ मार्च २०२२) पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी म्हणून ओळखली जात असतानाही अनेक मुलभूत प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. मागील पाच वर्षात भाजपाच्या सत्तेच्या काळात पाणी, वाहतूक, नदी प्रदूषण, कचरा समस्या, आरोग्य विषयक समस्यांनी तर उग्ररुप धारण केले आहे. या समस्या कायमस्वरुपी सोडविण्यास भाजपाचे मनपातील पदाधिकारी अपयशी ठरले आहेत. १४ मार्च पासून मनपाचे कामकाज प्रशासक म्हणून आयुक्त राजेश पाटील पाहणार आहेत. आयुक्त पाटील हे कुशल प्रशासक म्हणून ओळखले जातात. आता त्यांनी प्रशासक पदाच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे आणि कर देणा-या नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली आहे.शुक्रवारी डॉ. कैलास कदम यांनी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळासमवेत आयुक्तांची मनपा भवन मध्ये ...
पीसीसीओईआर मध्ये एका दिवसात पंच्याहत्तर पेटंट्स नोंदणीचा विक्रम
ताज्या घडामोडी

पीसीसीओईआर मध्ये एका दिवसात पंच्याहत्तर पेटंट्स नोंदणीचा विक्रम

पिंपरी (दि. १२ मार्च २०२२) देशभर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्ताने पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथिल पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय (पीसीसीओईआर) मध्ये २८ फेब्रुवारी २०२२ अर्थात राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून एका दिवसात ७५ पेटंट्सची नोंदणी करत एक नवीन विक्रम केला आहे.अशी माहिती संस्थेच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. हिरीष तिवारी यांच्या समन्वयाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नोंदणी झालेल्या ७५ पेटंटची पुस्तिका करण्यात आली त्याचे प्रकाशन विश्वस्त मंडळाच्या हस्ते शुक्रवारी (दि. ११ मार्च) करण्यात...
विधानसभा इतर कामकाज
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, राजकारण

विधानसभा इतर कामकाज

मुंबई दि. 10 : आदिवासींसाठीच्या पदभरतीला गती देण्यासाठी विशेष पदभरती मोहीम राबविण्यात येणार असून याबाबत एकत्रित बैठक घेण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत अर्धा तास चर्चेत सहा विषयांवर चर्चा झाली. अधिसंख्य कर्मचाऱ्यांबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उपसमितीचा अहवाल आल्यावर निर्णय घेण्यात येईल, असे श्री. भरणे यांनी सांगितले. सदस्य श्री. सुधीर मुनगंटीवार व श्री.संदीप दुर्वे यांनी उपस्थित केलेल्या चर्चेस उत्तर देताना ते बोलत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथील बॉटनिकल गार्डनच्या कामाला गती मिळावी, याविषयी चर्चा झाली त्याला उत्तर देताना सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन संपन्न
ताज्या घडामोडी

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये महिला सक्षमीकरण समिती, स्टाफ वेल्फेअर, राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले. आयुर्वेद तज्ञ डॉ. लीना बोरुडे म्हणाल्या की, महिलांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. शारीरिक आरोग्य जेवढे महत्त्वाचे तेवढेच मानसिक आरोग्यही महत्त्वाचे आहे. आहार-विहार याकडे महिलांनी लक्ष द्यायला हवे. आनंदी जीवन जगले पाहिजे, असे विचार त्यांनी मांडले. स्त्रीरोग तज्ञ डॉ. निशा पानसरे पानसरे म्हणाल्या की, महिलांनी काळाबरोबर बदल स्वीकारला पाहिजे. मेंनस्ट्रोल सायकल बद्दल माहिती दिली मेंनस्ट्रोल कपचे महत्व विशद केले. मिनू भोसले म्हणाल्या की, भूतकाळातील वाईट गोष्टींचे विस्मरण झाले पाहिजे. चांगल्या गोष्टींचे स्मरण ठेवून आशावादी जीवन जगण्यासाठी महिलांनी प्रयत्न करायला हवेत. तसेच डॉ. मेघा शर्मा यांनी मेंनस्ट्रोल कप चे डेमोनस्ट्रेशन व P...
पुण्य करताना पाप होतंय – महापाप
ताज्या घडामोडी

पुण्य करताना पाप होतंय – महापाप

अक्षय काटकर काही घाटातील हा किळसवाणा प्रकार, येणारा जाणारा प्रवासी वर्ग माकडांना खायला देत आहे. माकडांना खाऊ घालू नका. कारण, हे निसर्ग नियमाविरुद्ध आहे, खाद्य शोधण्याची क्षमता माकडांमध्ये आहे, ती नष्ट करून त्यांना असहाय बनवू नका. वन्यजीवांना खाऊ घालणे बेकायदा आहे. पुण्य करताना पाप होतंय-महापाप. प्राण्यांना किंवा पक्षांना (कबुतरांना, माकडांना, पोपटांना वगैरे वगैरे) अन्न धान्य खाऊ घालणाऱ्यांच्या बातम्या पाहून आपल्यातला भाबडेपणा जागा होतो. आणि कौतुक करतो आपण. प्रथमदर्शनी आपण स्वतःवरच खुश होतो की आपल्या मनात किती पवित्र आणि सहानुभूतीचे विचार आहेत. थोडी उसंत घ्या, आधी पुढचे शेवटपर्यंत वाचा. निसर्ग, या सर्व जीवांना आपल्या जन्मापूर्वीपासून पोसतोय; त्यासाठी त्यांच्या आहार विहार आणि प्रयत्नवादाचे प्रोग्रामिंग त्यांच्या मेंदूत by default निसर्गाने टाकले आहे. वन्य जीवांन...
रहाटणीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला बचत गटाची स्थापना
ताज्या घडामोडी

रहाटणीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला बचत गटाची स्थापना

रहाटणी : येथील महाराष्ट्र कॉलनी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला बचत गटाची नुकतीच स्थापना करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते देविदास आप्पा तांबे यांच्या हस्ते या बचत गटाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी महिला बचत गटाच्या अध्यक्षा संगिता प्रकाश कांबळे, उपाध्यक्षा अरूणा हितेंद्र कांबळे, खजिनदार अनिता विभिषण लोंढे, सदस्य रंजना भगवान कांबळे, सुरेखा दादासाहेब कांबळे, माधुरी धनाजी कांबळे, लिला सचिन कांबळे, ललिता अशोक जानराव, सुनिता सिद्धार्थ लगड, पार्वती नेताजी कांबळे, गितांजली रघुनाथ कांबळे, वनिता निलकंठ रामपूरे आदी उपस्थित होते. अध्यक्षा संगिता कांबळे म्हणाल्या की, महिलांना घरी बसल्या कामे मिळावेत व महिला स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभ्या रहाव्यात. या उद्देशाने या महिला बचत गटाची स्थापना केली आहे. बचत गटाच्या माध्यमातून विविध सरकारी योजनांचा महिलांना लाभ मिळवून देण्याच...
मोफत आरोग्य तपासणी शिबिरास गणेशपूर येथे गावकऱ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ताज्या घडामोडी

मोफत आरोग्य तपासणी शिबिरास गणेशपूर येथे गावकऱ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रिसोड प्रतिनिध शंकर सदार: रिसोड तालुक्यातील गणेशपूर येथे विष्णू जाधव व मित्र परिवार यांच्यावतीन (दि.२२) मंगळवार रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी 60 गावकऱ्याची या शिबिरामध्ये तपासणी करण्यात आली. सध्या गावात थंडी, ताप, सर्दी, खोकला, मलेरीया यांसारख्या साथीच्या आजारांनी धुमाकुळ घातला आहे. साथीच्या आजारामुळे दमा बिपी शुगर या सारख्या आजाराचा वयस्कर लोकांना त्रास होत आहे. हा त्रास टाळण्यासाठी हे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. शिबीरामध्ये तीन डॉक्टरांच्या पथकाने गावकऱ्यांची तपासणी केली. तपासणीमध्ये काही लोकांना बिपी, शुगर आजार यांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले. तसेच नागरिक दुर्लक्ष करत असल्याने त्यांना यावेळी विष्णू जाधव यांनी महत्व पटवून सांगितले. डॉ. विलास केशवराव वाळले, B...