ताज्या घडामोडी

मोफत आरोग्य तपासणी शिबिरास गणेशपूर येथे गावकऱ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ताज्या घडामोडी

मोफत आरोग्य तपासणी शिबिरास गणेशपूर येथे गावकऱ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रिसोड प्रतिनिध शंकर सदार: रिसोड तालुक्यातील गणेशपूर येथे विष्णू जाधव व मित्र परिवार यांच्यावतीन (दि.२२) मंगळवार रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी 60 गावकऱ्याची या शिबिरामध्ये तपासणी करण्यात आली. सध्या गावात थंडी, ताप, सर्दी, खोकला, मलेरीया यांसारख्या साथीच्या आजारांनी धुमाकुळ घातला आहे. साथीच्या आजारामुळे दमा बिपी शुगर या सारख्या आजाराचा वयस्कर लोकांना त्रास होत आहे. हा त्रास टाळण्यासाठी हे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. शिबीरामध्ये तीन डॉक्टरांच्या पथकाने गावकऱ्यांची तपासणी केली. तपासणीमध्ये काही लोकांना बिपी, शुगर आजार यांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले. तसेच नागरिक दुर्लक्ष करत असल्याने त्यांना यावेळी विष्णू जाधव यांनी महत्व पटवून सांगितले. डॉ. विलास केशवराव वाळ...
एसटीची वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

एसटीची वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील

आज ३६ गाड्या धावल्या | १५०० कर्मचारी कामावर परतले एसटी महामंडाळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांची माहिती मुंबई, दि. १२ नोव्हेंबर २०२१ : संप मागे घेण्याबाबत माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत १ हजार ५३२ कर्मचारी कामावर परतले आहेत. त्यामुळे एसटीची वाहतूक आता पूर्वपदावर येत असून आज विविध आगारातून ३६ गाड्या धावल्या, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. दरम्यान, संपामुळे एसटी महामंडळाचे सुमारे १२५ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमिवर एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला....
डॉ. तुषार निकाळजे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
शैक्षणिक, ताज्या घडामोडी

डॉ. तुषार निकाळजे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

डॉ. तुषार निकाळजे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर. ई. एस. एन. पब्लिकेशन्स, प्रशांत हॉस्पिटल, विजयवाडा, अध्यापना आणि लर्न विथ लॉजिक या तामिळनाडू येथील संस्थांनी डॉ. तुषार निकाळजे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला आहे. डॉ. तुषार निकाळजे डॉ.तुषार निकाळजे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे वरिष्ठ सहाय्यक ( क्लार्क) पदावर गेली तीस वर्षे काम करीत आहेत. त्यांनी कार्यालयीन काम करीत असतानाच एम. फिल .पीएच.डी. (राज्यशास्त्र) शिक्षण पूर्ण केले. डॉ.निकाळजे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी दहा पुस्तके लिहून प्रकाशित केली.त्यामधील "भारतीय निवडणूक प्रणाली, स्थित्यंतरे व आव्हाने" हे पुस्तक तीन विद्यापीठांच्या बी .ए , एम ए. (राज्यशास्त्र) विषयाच्या अभ्यासक्रमास संदर्भ पुस्तक म्हणून निवड झालेले आहे. एका राष्ट्रीय व एका आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांत संशोधन प्रबंध सादर केले आहेत. विद्यापीठ अनु...
खडकी सदार येथे ८० टक्के कोरोना लसीकरण पूर्ण
ताज्या घडामोडी

खडकी सदार येथे ८० टक्के कोरोना लसीकरण पूर्ण

प्रतिनीधी शंकर सदार/ शंभर टक्के कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आता नागरिकांना घरोघरी जाऊन लसीकरणा विषयी माहिती दिली जात आहे. गावात ही योजना आखली खडकी सदार येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व ग्रामपंचायत सरपंच सरला आत्माराम सदार यांनी. यामध्ये गावातील नागरिकांचे लसीकरण न झालेल्या नागरिकांची यादी तयार करण्यात आली आहे, त्यांनी घरी जाऊन लसीकरण घेण्यास वेळोवेळी सांगितले आहे. तसेच सध्या गावामध्ये ८० टक्के लसीकरण झाले असल्याचे यावेळी सरपंच सरला सदार यांनी सांगितले आहे. अवघ्या काही आठवड्यात गावात शंभर टक्के लसीकरण पूर्ण होईल अशी माहीती त्यांनी यावेळी दिली आहे. यामध्ये गावचे आरोग्य सेवक लाखाडे सर, घुगे मँडम , ग्रामपंपाचय सदस्या पूनम अनिल सदार, अर्चना कैलास सदार ,ग्रामपंचायत संगणक परिचालक विकास सदार, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कवर सर, गाडे सर, मानवतकर सर, ...
राज्यपाल सत्यपाल मलिक यांना ३०० कोटींची लाच देऊ करणारा रा. स्व. संघाचा ‘तो’ व्यक्ती कोण? : अतुल लोंढे
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

राज्यपाल सत्यपाल मलिक यांना ३०० कोटींची लाच देऊ करणारा रा. स्व. संघाचा ‘तो’ व्यक्ती कोण? : अतुल लोंढे

https://youtu.be/JzOyCufPDnw फडणवीस सरकारच्या काळात मंत्रालयात वसुलीसाठीच संघाचे लोक नेमले होते का? याची चौकशी करावी मुंबई : जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून कार्यरत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत एक व्यक्ती व अंबानी यांच्या फाईलला मंजुरी देण्यासाठी आपल्याला ३०० कोटींची लाच देण्याचा प्रस्ताव होता, असा गौप्यस्फोट मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. मलिक यांना कोट्यवधी रुपयांची लाच देऊ करणारा रा. स्व. संघाशी निगडीत तो व्यक्ती कोण आहे? राज्यातही फडणवीस सरकारच्या काळात विविध मंत्र्यांच्या कार्यालयात नियुक्त केलेले संघाचे लोक वसुली आणि फाईली क्लिअर करण्यासाठीच नेमले होते का? याची चौकशी महाविकास आघाडी सरकारने करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की...
कोविडचा फटका बसलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र, ताज्या घडामोडी

कोविडचा फटका बसलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रत्येक शहरांत वाहनतळ, चेक पोस्ट नजीक ट्रॉमा केअर सेंटर्स उभारण्याचे नियोजन करण्याचे निर्देश मुंबई, ता. १८ : कोविडमूळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या बाबतीत योग्य तो तोडगा लगेच काढला जाईल , वित्त व परिवहन विभाग यांच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश देण्यात येतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले . महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स बस वाहतूक महासंघाच्या शिष्टमंडळाने त्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली व चर्चा केली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.. यावेळी खासदार , ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस महासंचालक संजय पांडे आदींची उपस्थिती होती. र...
मोदी-शहाच्या प्रतिमेचे दहन करून साजरा करणार दसरा – संभाजी ब्रिगेड
पिंपरी चिंचवड, ताज्या घडामोडी

मोदी-शहाच्या प्रतिमेचे दहन करून साजरा करणार दसरा – संभाजी ब्रिगेड

पिंपरी: केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार अत्यंत निदर्यी असून शेतकरी, कामगार, सामान्य जनतेच्या मुद्द्यांवर कमालीचे असंवेदशील आहे. जुलमी कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून ते भांडवलदारांच्या हिताचे आहेत. तसेच लखीमपुर येथील आठ शेतकऱ्यांची गाडी खाली चिरडून केलेल्या हत्येच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड यंदा दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या प्रतिमे ऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमेचे दहन करून दसरा साजरा करणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सतिश काळे यांनी म्हटले आहे की, सत्तेवर आल्यापासून मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम सुरू केले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.तसेच सातत्याने होणारी गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ, कोविड का...
सासू व पत्नीची हत्या करणाऱ्या घरजावयाला पोलिसांनी केली अटक
ताज्या घडामोडी, राष्ट्रीय

सासू व पत्नीची हत्या करणाऱ्या घरजावयाला पोलिसांनी केली अटक

नवी दिल्ली : घरजावई झाल्याचे सासू-सासरे टोमणे मारत असत. दररोजच्या या टोमणे आणि कुचकट बोलण्याला वैतागूनच घरजावयाने पत्नी आणि सासूचा खून केला. त्याने गोळी झाडल्यामुळे पत्नी व सासूचा जागेवरच मृत्यू झाला. राजधानी दिल्लीत ही धक्कादायक घटना घडली आहे. बाबा असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरीदास नगर येथे आपल्या पत्नीसह सासू-सासऱ्यांकडेच आरोपी राहत होता. त्यावरुन, घरजावई झालेल्या बाबा यांस सासू-सासरे टोमणे मारत असत. दररोजच्या या टोमणे आणि कुचकट बोलण्याला वैतागूनच आरोपीने पत्नी आणि सासूचा खून केला. विशेष म्हणजे आरोपीने स्वत: फोन करुन घडलेली घटना पोलिसांना सांगितली. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी बाबाला अटक केली आहे....
दिघीत आढळला दुर्मीळ पांढरा तस्कर साप (व्हिडीओ)
ताज्या घडामोडी

दिघीत आढळला दुर्मीळ पांढरा तस्कर साप (व्हिडीओ)

पिंपरी : दिघीतील वाळके मळा येथे शुक्रवारी (ता. १) दुर्मिळ पांढरा (अल्बीनो) साप आढळला. सर्पमित्र अमर गोडांबे यांनी या सापाला सुरक्षितरित्या पकडुन याबाबतची माहीती वनविभाग अधिकारी वनपाल अनिल राठोड यांना देऊन या सापाला निसर्गाच्या सान्निध्यात सोडुन दिले. https://youtu.be/mqn32qE8z5g वन्यजीव सप्ताहच्या पहील्याच दिवशी वाळके मळा येथे विजय लांडगे यांना हा साप दिसला. त्यांनी तत्काळ सर्पमित्र अमर गोडांबे यांना माहीती दिली असता, सर्पमित्रांनी तेथे धाव घेऊन हा साप सुरक्षितरित्या पकडला. तीन फुट लांबीचा पुर्ण वाढ झालेला तस्कर जातीचा अल्बीनो हा साप पहिल्यांदा आढळुन आल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. हा साप जंगलात सोडत असताना सर्पमित्र दिपक बनसोडे, अलताफ सय्यद, विक्रम भोसले आणि अभिषेक फुलारी उपस्थित होते. रंगद्रव्यांच्या आभावाने अल्बीनो पांढरा तस्कर जातीचा साप हा बिनविषारी आहे. तो अत्य...
खड्डे खोदून ठेवले! आता अपघात होण्याची वाट पाहतेय का? महापालिका
ताज्या घडामोडी

खड्डे खोदून ठेवले! आता अपघात होण्याची वाट पाहतेय का? महापालिका

पिंपरी-चिंचवड, (बाळासाहेब मुळे) : मोशी जाधवाडी हाय स्ट्रीट मार्गावरती केबलच्या कामासाठी महानगरपालिकेने रस्त्याच्या कडेला मागील पंधरा दिवसांपासून जागोजागी खड्डे खोदून ठेवले आहेत. मात्र, रस्ता पूर्ववत करण्यात आलेला नाही. आता मोठा अपघात होण्याची महापालिका वाट पाहत आहे का? अशाच काहीशा प्रतिक्रिया देतांना रस्त्यावरून येणारे-जाणारे नागरिक दिसत आहेत. कारण त्या खड्ड्यामुळे फुटपाथवरून जाताना अबालवृद्धांना खूप मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच या महत्त्वाच्या मार्गावर एका बाजूला पुणे जिल्ह्यातील मोठे भाजी मार्केट यार्ड आहे, तर दुसर्‍या बाजूला आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक्जीबिशन सेंटरचे मोठे ग्राउंड आहे. त्यामुळे या मार्गाच्या दोन्ही बाजूने फुटपाथ वरून येणाऱ्या जाणाऱ्यांची व रस्त्यावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. महापालिकेने रस्त्याच्याकडेला अनेक खड्डे ख...