#Coronavirus : कोरोना विषाणूबाबतच्या शंकासमाधान
उन्हाळा आल्याने किंवा आपण ऊष्ण कटीबंधात असल्याने करोना विषाणूला रोखण्यास मदत मिळेल?तथ्य : आतापर्यंतच्या अहवालानुसार, करोना विषाणू उष्ण आणि दमट हवामान असलेल्या क्षेत्रासह सर्व क्षेत्रात पसरू शकतो.आपण राहत असलेल्या कोणत्याही परिस्थितीत किंवा कोविड-१९ बाधित भागातून प्रवास करत असाल तर संरक्षणात्मक उपायांचा अवलंब करा. कोविड-१९ पासून स्वतःचे संरक्षण करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे वारंवार आपले हात साबण व पाणी वापरून स्वच्छ धुणे. असे केल्याने आपण आपल्या हातावर असलेल्या विषाणूंचा नायनाट करतो आणि आपले नाक, तोंड व डोळ्यांना स्पर्श करून उद्भवणारे संक्रमण टाळतो. गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे नवीन करोना विषाणू आजार रोखता येईल?तथ्य : आपल्या शरीराचे तापमान ३७ डिग्री सेल्सिअस एवढे असते, या तापमानात हे विषाणू आपल्या शरीरात संचार करू शकतात आणि गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्यावर काही परिणाम होत नाही. गरम पाण्यान...