मानवतेचा महामेरू एस. एम. जोशी
श्रीधर महादेव जोशी म्हणजेच एस. एम. जोशी (एस. एम) यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे १२ नोव्हेंबर १९०४ रोजी झाला. त्यांचे मूळ गाव हे कोकणमधील रत्नागिरीजवळील 'गोळप' हे होय. त्यांचे (S M Joshi) शिक्षण बी.ए., एल.एल.बी., डी.लीट. असून पुणे विद्यापीठाने त्यांना डी.लीट या पदवीने त्यांच्या देशसेवेच्या कार्याबद्दल सन्मानित केले होते. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. देशासाठी कार्य करत असताना त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यात तुरुंगवासही त्यांच्या वाट्याला वारंवार आला. अशा या तुरुंगवासातील दिवसांमध्ये सुद्धा त्यांनी वाचनाची आवड जोपासली. या दिवसांत कार्ल मार्क्सच्या विविध ग्रंथांचे वाचन, विविध साप्ताहिकांतील अग्रलेखांचे वाचन, गुजराती कादंबऱ्यांचे वाचन, मानवेंद्रनाथ रॉय यांचे 'Tasks before us' या पुस्तकाचे वाचन. इत्यादी ग्रंथांचे वाचन त्यांनी केले होते.
याव्यतिरिक्त तुरुंगामधी...