विशेष लेख

जमिनीच्या त्या व्यवहारात एक डिसीपी अन् एसीपी सदोष? | दोघांचा शासनाला डिफॉल्ट रिपोर्ट सादर
पिंपरी चिंचवड, विशेष लेख

जमिनीच्या त्या व्यवहारात एक डिसीपी अन् एसीपी सदोष? | दोघांचा शासनाला डिफॉल्ट रिपोर्ट सादर

रोहित आठवले पिंपरी चिंचवडची (Pimpri Chinchwad) उद्योगनगरी म्हणून ओळख निर्माण करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या (MIDC) एमआयडीसीच्या एका जागेच्या हस्तांतरण प्रक्रियेत शहरातली एक डिसीपी (DCP) आणि एसीपी (ACP) यांनी सदोष "उद्योग" केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. चौकशी समितीने केलेल्या सर्वसमावेशक पडताळणी नंतर याबाबतचा अहवाल शासनाला पाठविण्यात आल्याचे समजते. कोट्यवधींचा हा सर्व व्यवहार करताना शहरातील एक डिसीपी आणि एसीपी यांनी तीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मदतीने नको तेवढा सक्रीय सहभाग या प्रक्रियेत घेतल्याचे आता उघड झाले असून, शहरातील एका आयपीएस अधिकाऱ्याने (IPS Officer) याबाबतचा रीतसर अहवाल शासनाला पाठविल्याने शहरातील अनेक जमिनींचे व्यवहार रडारवर आले आहेत. या सगळ्या उद्योगात (व्यवहारात) केवळ पोलिसच नाही तर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) मधील एक माजी नगरसेवकाचा...
ख्रिस्ती धर्मियांचा पवित्र आठवडा- गुड फ्रायडेला येशू ख्रिस्ताचे क्रुसावर मरण आणि ईस्टरला पुनरुज्जीवन
विशेष लेख

ख्रिस्ती धर्मियांचा पवित्र आठवडा- गुड फ्रायडेला येशू ख्रिस्ताचे क्रुसावर मरण आणि ईस्टरला पुनरुज्जीवन

कामिल पारखे उपवासकाळ म्हटले कि हरेगावला आणि श्रीरामपूरला भर उन्हाळयात रणरणत्या उन्हात वाळू असलेल्या मैदानात गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवारच्या भक्ती प्रार्थनेत सहभागी झाल्याची आठवण येते. येशू ख्रिस्ताला क्रुसावर टांगल्यानंतर दुपारी तीनला 'हे बापा, मी माझा आत्मा आता तुझ्या स्वाधीन करतो' असे म्हणून त्याने अखेरची मान टाकली, म्हणून भर उन्हात येशूच्या मरणप्राय वेदनांच्या स्मरणार्थ गुड फ्रायडेच्या प्रार्थना व्हायच्या. या चाळीस दिवसांच्या उपवासकाळाची किंवा लेन्ट सिझनची सुरुवात होते ती फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीस येणाऱ्या भस्म बुधवाराने किंवा अँश वेन्सडे या दिवसाने, या भस्म बुधवाराच्या आधल्या शनिवारी गोव्यात, लॅटिन अमेरिकेन आणि इतर पाश्चिमात्य राष्ट्रात कार्निव्हल फेस्टिव्हल सुरुवात होते आणि या उत्सवाची भस्म बुधवाराच्या पूर्वसंध्येला मंगळवारी रात्री सांगता होते. अर्थांत गोव्...
ब्लॅक गोल्डप्रमाणे आता शहरात गार्बेज गोल्ड | स्मशानातील सोने तसं कचऱ्यातील सोने
मोठी बातमी, विशेष लेख

ब्लॅक गोल्डप्रमाणे आता शहरात गार्बेज गोल्ड | स्मशानातील सोने तसं कचऱ्यातील सोने

रोहित आठवले उद्योगनगरीत मागणी वाढत गेल्यावर ऑइलचा काळाबाजार आणि त्यातून घर भरणारे पिंपरी चिंचवडकरांनी पाहिले. आता ब्लॅक ऑईलचा ट्रेण्ड मागे पडून गार्बेज गोल्डने जोर धरला असून, शहरातील या कचऱ्यावर आपल्या घरात हिरवळ फुलविणारे बहरू लागले आहेत. पिंपरी चिंचवडमधील कारखान्यांना पूर्वी ऑईलची गरज भासत होती. त्यातून या ऑईलचा काळाबाजार सुरू झाला. ब्लॅक गोल्ड म्हणून याकडे पाहिले जाऊ लागल्याने अनेकांनी यावर घरं भरली. पण नंतर तंत्रज्ञानात बदल होत जाऊन ही मागणी रोडावली. त्यामुळे याचा काळाबाजारही कमी झाला. पण शहरातील वाढती लोकसंख्या व नोकरीसाठी दाखल झालेल्यांच्या घरात कंपन्यांत तयार होणाऱ्या कचऱ्याला नेते मंडळींनी आपलंस करायला सुरुवात केली. कचरा कोण उचलणार, तो नेऊन कोण टाकणार, त्यातून भंगार कोण वेगळे करणार, वेगळे केलेले भंगार डेपोतून बाहेर कोण आणणार, पुढे ते जालना आणि मुंबईला कोण पाठवण...
शिवजयंतीचा वाद का?
विशेष लेख

शिवजयंतीचा वाद का?

डॉ. श्रीमंत कोकाटे आपल्या देशात अनेक महापुरुष होऊन गेले, कोणत्याही महापुरुषांच्या जयंतीचा वाद नाही, मग शिवजयंतीचाच वाद का? शिवाजीराजांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रभाव आज देखील इतका आहे की त्यांच्या कार्याला पदोपदी विरोध करणाऱ्यांना शिवजयंतीचा वाद घालून त्यांच्या कार्याचे महत्व कमी करण्याचा खोडसाळपणा करावा लागतोय. शिवाजीराजांच्या कार्याचा प्रभाव जगभर जाऊ नये, त्यांचे कृषी धोरण, युद्ध धोरण, प्रशासन धोरण, आरमार, महिला विषयक धोरण, स्थापत्यशास्त्र, धार्मिक धोरण, गुप्तचर यंत्रणा, समतावादी तोरण, बुद्धिप्रामाण्यवाद इत्यादी विषयावर चर्चा होऊ नये. जयंतीचा वाद निर्माण करून सनातनी व्यवस्थेने छत्रपती शिवाजीराजे यांची अवहेलना सुरू ठेवलेली आहे. त्यांच्या जागतिक प्रभावाला पायबंद घालण्यासाठी शिवजयंतीचा वाद निर्माण केला जातो. कोणत्याही व्यक्तीचा जन्म एकदाच होतो. तो तीन-तीन होत नाही. तीन वेळा शिवजयंत...
गरीब माणसं मरण्यासाठीच जन्मतात
विशेष लेख

गरीब माणसं मरण्यासाठीच जन्मतात

विश्वंभर चौधरी आजच्याच दिवशी दोन वर्षांपूर्वी जनता कर्फ्यु लागला होता. मग दिल्लीच्या सर्वोच्च सरांनी टीव्हीवर येऊन 'आज रात बारा बजे के बाद..' वगैरे नोटाबंदीच्या वेळची हिरोगिरी केली आणि एक दुःस्वप्न सुरू झालं. गरीब माणसं मुलाबाळांसह, बायकांसह, वृद्धांसह शेकडो किलोमीटर तळपत्या उन्हात डांबरी रस्त्यावर चालायला लागली. काही मेली, काही जन्माचं दुखणं घेऊन घरी पोचली. शहरात होती ती उपाशी राहिली, कुठल्या तरी मदतीच्या प्रतिक्षेत त्यांचे प्राण कंठाशी आले. आपल्यापेक्षा अप्रगत देश असलेल्या बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी चार दिवसांची मुदत घोषित करून मग लाॅकडाऊन लावला पण आपल्या अकराव्या अवताराची… असो. चालणारांना, मरणारांना एकच एक धर्म किंवा जात नव्हती. ते नसल्यामुळे राजकारणात त्याचा उपयोग नव्हता. म्हणून विवेक अग्निहोत्री सारख्या अलौकिक प्रतिभेचा धनी असलेल्या दिग्दर्शकाला या विदारक तितक्य...
कट्टरतावाद जोपासणा-या संस्थांचा निषेध केला पाहिजे : दया सिंह
विशेष लेख

कट्टरतावाद जोपासणा-या संस्थांचा निषेध केला पाहिजे : दया सिंह

‘ऑल इंडीया पिस मिशन’ चे शांततेचा संदेश देणा-या चर्चासत्राचे पुण्यात आयोजनपिंपरी, पुणे (दि. २१ मार्च २०२२) देशाची शांतता आणि अखंडता कायम ठेवणे हे सर्व देशवासियांचे प्रथम कर्तव्य आहे. परंतू मागील आठ वर्षात देशामध्ये अशांतता, व्देष निर्माण करण्याचे काम काहि संस्था, संघटना करीत आहेत. कट्टरतावादाची विचारसरणी जोपासणा-या अशा संस्थांचा सर्वांनी निषेध केला पाहिजे आणि त्या विरुध्द लढून सर्व धर्मसमभाव वाढीस लावण्याचे काम केले पाहिजे. या उद्देशाने ‘ऑल इंडीया पिस मिशन’ (All India Peace Mission) देशभर काम करीत आहे. अशा व्देषाच्या आणि अशांतता निर्माण करणा-या वातावरणात शांततेचा आणि सद्‌भावनेचा संदेश देशभर देण्यासाठी यावर्षी विविध परिसंवाद, चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती ऑल इंडिया पिस मिशनचे संस्थापक अध्यक्ष दया सिंह यांनी दिली.या वर्षी गुरु तेग बहादूर सिंह साहेब यांची ४०० वी जयंती (प्रका...
संत तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन की हत्या ?
विशेष लेख

संत तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन की हत्या ?

श्रीमंत कोकाटे संत तुकाराम महाराज यांच्या मृत्यूबद्धल दोन मतप्रवाह आहेत.पहिला आहे ते विमानात बसून सदेह वैकुंठाला गेले आणि दुसरा आहे त्यांची हत्या केली. संत तुकाराम महाराज यांचा जन्म 1608 चा तर मृत्यू 1650 सालचा म्हणजे ते फक्त 42 वर्षे जगले.ते वयाच्या 42 व्या वर्षी मृत्यू पावले.हे वय मृत्यूचे नाही.संत तुकाराम महाराज अत्यंत तरुण असताना त्यांचा मृत्यू कसा झाला हा नेहमीच शंकेचा,वादाचा विषय राहिला आहे. संत तुकाराम महाराजांचा मृत्यू कसा झाला हे समजून घेण्यासाठी त्यांचा संघर्ष समजून घ्यावा लागेल.ते अत्यंत बुद्धिमान,प्रेमळ आणि श्रीमंत होते.त्यांनी सुमारे 5 हजार अभंग लिहिले.त्यांनी लोकांना कर्जमुक्त केले.संत तुकाराम महाराजांचा लढा विषमतेविरुद्ध होता.ते म्हणतातभेदाभेद भ्रम अमंगल।सर्वांची एकची वीण।तेथे कैसे भिन्नाभिन्न।संत तुकाराम महाराजानी विषमतेला विरोध करून समतेचा आग्रह धरला.वर्णव्यवस्थेव...
तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन की खून?
विशेष लेख

तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन की खून?

जेट जगदीश जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या अभंग व किर्तनातून समाजाची जनजागृती करायचे. त्यांनी पुराणातील खोट्या कर्मकांडावर प्रचंड प्रमाणात टिका केली. अनिष्ट चालीरीती रुढी परंपरेला विरोध केला. अंधश्रद्धा निर्मूलन केले. तुकाराम महाराजांच्या किर्तनातून गावोगावी सुधारणा होऊ लागली. वर्णभेद, जातीभेद कमी होऊ लागला. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या किर्तनातून नुसते जन जागृतीच करत नव्हते तर ते आपल्या किर्तनातून तयार झालेल्या युवकांना स्वराज्यासाठी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात भरती करत होते. शिवाजी महाराजांचे मावळे घडवत होते. त्यांना आर्थिक मदत पुरवत होते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात गुरु-शिष्याचे नाते तयार झाले होते. त्यामुळे भटांचे मनुवाद्यांचे लोकमनातील वर्चस्व कमी होत चालले होते. लोक अंधश्रद्धेतून बाहेर पडू लागले होती. या गोष्टीचा भ...
झुंडीचे दुष्टचक्र मोडण्याची गरज आहे आणि हे काम महाराष्ट्रातील सक्षम स्त्रिया एकत्र येऊन करू शकतात!
विशेष लेख

झुंडीचे दुष्टचक्र मोडण्याची गरज आहे आणि हे काम महाराष्ट्रातील सक्षम स्त्रिया एकत्र येऊन करू शकतात!

शीतल करदेकर झुंडशाही ही जातिभेद, लिंगभेद ,आर्थिक विषमता ,धार्मिक विद्वेष कशा कशात नाही? या झुंडवादी प्रवृत्ती व प्रस्थापितांना धक्के देताना, आपले स्थान निर्माण करताना रडावं नाही तर लढावं लागतं! ही लढाई आत्मसन्मानाची आपली गुणवत्ता सिद्ध करत ,समाजात स्थान मिळवण्याची असते !ताठ मानेने जगण्याच्या हक्काची असते! झुंड चित्रपटाबद्दल सगळेच भरभरून बोलत आहेत! बाजूंने- विरोधात सगळेच काही जोरदार सुरू आहे ! त्यात मोठा गट सोईने गप्प! काहीजण हात धुवून घेत आहेत! प्रसिद्धीची किंमत खूप मोठी असते! विषयाशी याचं काही घेणं देणं नसते असे हे मुखवटेबाज! नागराज मंजुळे विषय चांगला घेतला आहे !हा चित्रपट विजय बारसे या झोपडपट्टीतील मुलांसाठी फुटबॉल प्रशिक्षणाची समाजसेवी संस्था सुरु करणाऱ्या खऱ्याखुऱ्या हिरोची आहे! हीच भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकारली आहे! जातीव्यवस्था आणि त्यातून होणा...
पेनड्राईव्ह बॉम्बची वात पिंपरीत ; पिंपरी चिंचवडचे असेही कनेक्शन
मोठी बातमी, विशेष लेख

पेनड्राईव्ह बॉम्बची वात पिंपरीत ; पिंपरी चिंचवडचे असेही कनेक्शन

रोहित आठवले विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या महाविकास आघाडीच्या विरोधातील १२५ तासांच्या कथित रेकॉर्डिंग पेनड्राईव्ह बॉम्बची वात पिंपरी चिंचवडहून (Pimpri Chinchwad) पेटल्याचे आता समोर येत आहे. ज्या गुन्ह्यात संबंधित आरोपीचे वकीलपत्र घेण्यात आले. तो गुन्हा पिंपरी पोलिस ठाण्यात ऑक्टोबर २०१९ मध्ये दाखल करण्यात आला होता. तर तपासात २०२१ मध्ये आरोपींच्या अटकेनंतर जामिनासाठी संबंधित वकिलाला आरोपींच्या कुटुंबाने भेटून वकीलपत्र दिले होते. या कथित प्रकरणातील तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण (Adv Pravin Chavan) यांचे रेकॉर्डिंग असलेल्याचे सांगणारा पेनड्राईव्ह नुकताच विधानमंडळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सादर झाल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच गोंधळ उडाला आहे. हे मोडतोड (मॅन्यूप्लेटेड) केलेले रेकॉर्...