पंचहौद मिशन चहापान, भारतीय पत्रकारितेतील पहिले स्टिंग ऑपरेशन
कामिल पारखे
गोपाळराव जोशी हे अर्वाचीन महाराष्ट्रातील एक वादग्रस्त पात्र आहे. अमेरिकेत जाऊन डॉक्टर होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला असलेल्या डॉ. आनंदीबाई जोशी यांचे पती अशीच गोपाळराव जोशी यांची प्रामुख्याने ओळख आहे. पुण्यातील त्याकाळच्या अनेक थोर व्यक्तींना गणपतरावांनी आपल्या विविध चाळ्यांनी आणि उपद्व्यापांनी घाम फोडला होता. पुण्यातील पंचहौद चर्चमधील चहापान किंवा ग्रामण्य प्रकरण या गोपाळरावांनी निर्माण केलेल्या वादात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, न्यायमुर्ती म. गो. रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे वगैरेंसारखे भलेभले लोक अडकले.
पंचहौद चर्च-पवित्र नाम देवालय किंवा होली नेम कॅथेड्रल
विशेष म्हणजे हे चहापान प्रकरण हा वाद गोपाळरावांनी अगदी ठरवून, त्यात अनेक लोकांना गोवून घडवून आणला होता आणि नंतर पुणे वैभव या वृत्तपत्रात आपल्या बायलाईनसह बातमी छापून त्यात पुण्यातील या ...