शिवसेना का अडली?

शिवसेना का अडली?

मोठ्य सुधारणेची गरज आहे!

शीतल करदेकर

राज्यपाल भेटीला गेलेले शिवसेना दिग्गज हाती सर्व कागदपत्रे घेऊन जाताहेत! आता झालं..महाराष्ट्रात सत्ता स्थापन होणार! सत्तानाट्य संपणार! शरद पवारांकडून सहकार्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं पूर्ण समर्थन आहे. काँग्रेससोबत चर्चा सकारात्मक आहे. नवीन समिकरणं आणि लोकहिताच्या कार्यक्रमावर महाशिवआघाडी काम करणार असे वाटत असतानाच,कळले की आवश्यक कागदपत्रेच नाहीत. पाठिंब्याची पत्रे आमदार माहिती सहीसह नाहीत!

शिवसेनेला मुदतवाढ देण्यास महामहिम राज्यपालांनी नकार दिला असला तरी सेना काय भाजपा काय संख्याबळ असेल तर सत्तेसाठी दावा करू शकते. राष्ट्रवादी, काँग्रेस सत्तास्थापनेस पुढे आली तरी शिवसेना सोबत असेल तरच हे शक्य आहे. मग पुन्हा मुख्यमंत्री कार्यकाळ वाटप होऊ शकत.. सगळं होऊ शकतं पण माती कुणी खाल्ली याचा तपास करून अचूकतेने काम होणं गरजेचं आहे.

युतीपर्वाची अखेर

काकाचं पत्र हरवलं…म्हणून समाजमाध्यमात टिंगलही झाली. पंधरा दिवस युती नाट्य सुरु होते. दिवाळी पत्रकार मिलन अनौपचारिक गप्पात मा. मु. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचाच मुख्यमंत्री होणार म्हटलं. मग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व्यक्त झाले, समान वाटपाबाबत, जर भाजपाचा मुख्यमंत्री होणार तर आम्हाला दिलेल्या शब्दाचे काय?

शिवसेनेचा मुख्यमंत्री अडिच वर्ष व्हायला हवा महत्वाची मंत्रीपद हवीत,हे मागणं चूक नव्हत कारण निवडणूकीआधी भाजपाला सर्वार्थाने सेनेने सहकार्य केले होते ,कमी जागाही स्वीकारल्या,पक्षात भाजपा विरोधी सूर असतानाही युती केली आणि भाजपा केवळ आमच्यामुळेच जिंकलो सांगत राहिली. मागील पाच वर्षातील अनुभवावरुन सेनेने ज्या मागण्या केल्या आणि लिहून मागितले तेही अचुक होते. इतके वर्ष शिवसेना सहकार्याने वाढलेले, जर हिंदुत्वासाठी, देशहितासाठी एकत्र आले होते तर आपल्या सोबत्याला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याचै औदार्य का दाखवू शकले नाहीत? कारण पूर्वीचे सच्चे नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे नाहीत. भाजपा व्यापारी पार्टी कडे प्रवास करतेय, त्याचं हे उदाहरण!

पण घोडं कुठे अडलं?

मोठी गडबड आहे ती नियोजनात ,आजूबाजूला असलेल्या लोकांत! उध्दव ठाकरेपर्यत वास्तव पोहोचत नाही, गटबाजीत स्वार्थात काहीजण व्यस्त आहेत! शिवसेनेत आदित्य टिम कार्यरत आहे, प्रसिध्दी संपर्क आऊटसोअर्सिग सुरु झाले. लोकांची भावना काही प्रमाणात पक्षप्रमुखांपर्यत पोहचू लागली. या सगळ्याचा परिपाक म्हणून सेना भाजपा विरोधात उभी राहिली .

खा.संजय राऊत सतत दोन तीन आघाड्या सांभाळत असताना जे काम पुढे करायचे आहे ते करण्याचे नियोजन,नियमानूसार दोन्ही काँग्रेसकडून पाठिंबा येण्यासाठी पत्र घेणे,त्यासाठी सेनेकडून निवेदन जाणे. सर्व तयारी करणेस सेनेकडे नेते नव्हते का? जर होते तर हा सल्ला मार्गदर्शन कुणी का नाही केलं? केंद्रात राजीनामा उशीरा का दिला?

हे सगळे गंभीरपणे घेण्याची गरज आहे, कारण सत्तेवर येणझ हे कुणा एकासाठी नाही तर समस्त जनतेसाठी असते हे पक्क लक्षात असायला हवं! मजाक नाही हा! पण पक्षप्रमुखांनी सेनेतील अतिहुशार कानखुजले जरा दूर करुन सच्चा विश्लावू सैनिकांना जवळ करण्याची गरज आहे. हे काम आदित्य करु शकतो कारण तो नव्या संपर्क जगात वावरतो, आणि अलिप्तपणे निरिक्षण करण्याचे मँनेजमेंट स्किल त्याचेकडे आहे, पण एक निश्चित आहे की, मा. बाळासाहेबांचे सेनेचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे! गरज आहे ती एकीने नियोनबद्ध काम करण्याची!