हळदी कुंकू म्हणजे, पती नसलेल्या महिलांना अपमानीत करण्याचा सण
संदिप गोवळकर
हळदीकुंकू या विषयावर लिखाण करताना महिला माझ्यावर नाराज होणार हे अपेक्षित आहे. कोणाला बंर वाटाव कोणी मला चांगले म्हणावे म्हणून मी कधीही लिखाण केले नाही....
ज्या सणामध्ये पती मयत झालेली स्त्रिया,शहिंद जवानच्या वीर पत्नी यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसेल ते सण मला मान्य नाहीत. त्या सणाचे मी आज ही समर्थन करत नाही या पुढे करणार नाही.
संक्रांतीनंतर हळदीकुंकू कार्यक्रम घरोघरी गल्लीबोळात दिसतात. हळदीकुंकू सण म्हणजे नवरा असणाऱ्या बायका नटूनथटून एकमेकींना हळदीकुंकू लावतात व भेटवस्तू देतात.हे हळदीकुंकू त्याच स्त्रियां लावतात ज्यांचा पती जिवंत आहे. हा कार्यक्रम करत असताना त्या महिलेचा नवरा असणे अपेक्षित आहे. तिला सवाष्णी असे म्हणतात.
देशाच्या सिमेवर शहिंद झालेल्या वीर पत्नीला, कधी सन्मानपूर्वक या कार्यक्रमात वागणूक दिलेली मी पाहिले नाही. जेव्हा ...