विशेष लेख

विशेष लेख, आरोग्य

#Coronavirus : कोरोना विषाणूबाबतच्या शंकासमाधान

उन्हाळा आल्याने किंवा आपण ऊष्ण कटीबंधात असल्याने करोना विषाणूला रोखण्यास मदत मिळेल?तथ्य : आतापर्यंतच्या अहवालानुसार, करोना विषाणू उष्ण आणि दमट हवामान असलेल्या क्षेत्रासह सर्व क्षेत्रात पसरू शकतो.आपण राहत असलेल्या कोणत्याही परिस्थितीत किंवा कोविड-१९ बाधित भागातून प्रवास करत असाल तर संरक्षणात्मक उपायांचा अवलंब करा. कोविड-१९ पासून स्वतःचे संरक्षण करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे वारंवार आपले हात साबण व पाणी वापरून स्वच्छ धुणे. असे केल्याने आपण आपल्या हातावर असलेल्या विषाणूंचा नायनाट करतो आणि आपले नाक, तोंड व डोळ्यांना स्पर्श करून उद्भवणारे संक्रमण टाळतो. गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे नवीन करोना विषाणू आजार रोखता येईल?तथ्य : आपल्या शरीराचे तापमान ३७ डिग्री सेल्सिअस एवढे असते, या तापमानात हे विषाणू आपल्या शरीरात संचार करू शकतात आणि गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्यावर काही परिणाम होत नाही. गरम पाण्यान...
विज्ञाननिष्ठ विचारांनी मेंदूची मशागत करा
विशेष लेख

विज्ञाननिष्ठ विचारांनी मेंदूची मशागत करा

जेट जगदीश आपल्यातील अनेक जण विवेकी असतात. त्यांना श्रध्दा, विश्वास, देव, धर्म, रूढी-परंपरा, सण-उत्सवी उन्माद जया सर्व गोष्टींपैकी बहुतेक गोष्टी अजिबात पटत नसतात. संस्कृतीचा भाग म्हणून, कुटुंबियांच्या भावना दुखवू नयेत म्हणून आपण अनेकदा प्रवाहपतितांसारखे काही गोष्टी पाळतो. देव-धर्म पाळण्यातले, पूजा-अर्चा करण्यातले फोलपण समजूनही सामाजिक बंधने म्हणून आपल्यापैकी अनेकजण मनातल्या मनात चडफडत या गोष्टी करीत असतात. यात एक भीतीही असते… बाजूला पडण्याची, एकटे पडण्याची. पण धैर्य दाखवून असे सर्व लोक एकत्र आले, स्पष्ट बोलू लागले तर जगभरातल्या नास्तिकांची संख्या धर्मानुयायांपेक्षा कदाचित जास्तच भरेल. पण ही सारी सायलेन्ट मेजॉरिटी आहे, म्हणून ती मायनॉरिटी वाटते. 'बाबावाक्यम् प्रमाणम्' ही शब्दप्रमाण्यवादी वृत्ती आपल्या संस्कृतीच्या नसानसांत भिनली असावी असं आपले उत्सवी गोंधळ पाहून तरी वाटतं. आधुनिक भ...
इंदुरीकर महाराजांवर इतका गदारोळ कशासाठी? तृप्ति देसाई! स्त्रीपुरुष समानता हवीच! पण भान सोडू नका!
विशेष लेख

इंदुरीकर महाराजांवर इतका गदारोळ कशासाठी? तृप्ति देसाई! स्त्रीपुरुष समानता हवीच! पण भान सोडू नका!

शीतल करदेकर इंदुरीकर महाराजांबद्दल इतका गदारोळ कशासाठी?असे विषय कोण का पेटवतं? स्त्रीपुरुष समानताहवीच, एकमेकांचा आदरही करायला हवा याची जाणीव स्त्रीसक्षमीकरणासाठी काम करणा-या बहुसंख्य महिलांना आहे. महिलांच्या हक्काची लढाई तृप्ती देसाई यांनी मंदिर प्रवेशापासून केली. त्यांचं योगदान मोठं आहे. पण त्याही आपलं भान सोडू लागल्याचं दिसतंय! त्यानी चक्क मुख्यमंत्र्यांना कोंडण्याची भाषा केली. ही अयोग्य आहे. कारण विषय कोणता काय बोलतोय कुणाशी जोडतोय हे कळत नाही असं दिसतय. देसाईबाईंचे कार्यक्रम आंदोलनं आणि त्यांची भूमिका संशयास्पद वाटण्याची चर्चा आहे. त्यांनी इंदुरीकर महाराजांच्या तोंडाला काळं फासू म्हटलं अनेक आरोप केले.कशासाठी तर महाराज सम विषम तारीख,स्त्रीपुरुष संग या विषयी बोलले.यात स्त्रीचा अपमान व्हावं असं काय होतं? नंतर महाराजांच्या वादात इतर समर्थक घूसले, त्यांनी अभद्र भाषा वापरली.त्यांचेवर क...
जेव्हा सत्ताधारी आमदार बलात्कार करतो, तेव्हा पिडीतेचे एनकाऊंटर केले जाते- प्रा. हरी नरके
विशेष लेख

जेव्हा सत्ताधारी आमदार बलात्कार करतो, तेव्हा पिडीतेचे एनकाऊंटर केले जाते- प्रा. हरी नरके

प्रा. हरी नरके उन्नाव बलात्कार प्रकरणात आरोपी उत्तरप्रदेशचा सत्ताधारी आमदार आहे. तो अपघाताद्वारे पिडीतेच्या नातेवाईकांची हत्त्या घडवतो. तिला जाळून मारतो. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मुख्यमंत्री फाट्यावर मारतात. पिडीतेला पुरवलेली सुरक्षा असतानाही तिला जाळून मारल जातं. योगीपुरूष मुख्यमंत्री आहेत. ते स्वपक्षाच्या आमदाराला पाठीशी घालतात. ४ जून २०१७ पासून सुरू असलेला उन्नाव पिडीतेचा संघर्ष आता मृत्यूमुळे थांबला आहे. ४ जून २०१७ रोजी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या कुलदीप सेंगर या आमदाराने तिच्यावर बलात्कार केला होता. तरिही उ.प्र. पोलिसांनी तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही. मग १७ ऑगस्ट २०१७ रोजी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर तिनं स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुठे पोलीस, मीडिया आणि कोर्टाने तिची दखल घेतली.सेनगरवर गुन्हा दाखल झाला. पुढे तिच्या विनंतीवरून सुप्रीम कोर्...
महाराष्ट्रात महिला अत्याचाराला आळा बसणेबाबत विधान परिषदेत ठोस निर्णय होईल का?
विशेष लेख

महाराष्ट्रात महिला अत्याचाराला आळा बसणेबाबत विधान परिषदेत ठोस निर्णय होईल का?

शीतल करदेकर तेलंगणातील ४ बलात्कारीअत्याचारींचा पोलींसांनी केलेल्या खात्म्यानंतर महिला बलात्कार व अत्याचाराचा विषय देशभरात ऐरणीवर आला. सगळीकडे या एन्कौन्टरचं स्वागत झाले. मात्र, दुसरीकडे हा न्याय नाही तर ही पळवाट असून अशा गुन्हेगारांना न्यायानेच कठोर शासन होणे अपेक्षित असून ही शिक्षा होऊन एक कठोर संदेश समाजात गेला तरच न्यायाचा वचक समाजात बसून अशा प्रकारची विकृत कृत्ये करण्याच्या मानसिकतेला आळा बसेल असा आवाज या विषयातील जाणकार व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आंध्र प्रदेशात मुख्यमंत्री रेड्डी यांनी सभागृहात आश्वासन दिले की २१दिवसात बलात्कार्यांना शासन करू! दिशा नावाचा कायदा केला. पुरोगामी महाष्ट्रात महिला सुरक्षेबाबत कोणती ठोस अचूक कायदे तरतूद होते याची उत्सुकता आणि आवश्यकता आहेच. 'दिशा विधेयक' महाराष्ट्र राज्यात कधी? अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विटरद्वारे प्रश्न विचारुन केली त...
सावरकरांना विरोध का ?
विशेष लेख

सावरकरांना विरोध का ?

विजय चोरमारे, (पत्रकार) विनायक दामोदर सावरकर यांना ‘वीर’ हे विशेषण १९२० मध्ये प्रथम लावण्यात आले. ‘भाला’कार भोपटकरांनी ते पहिल्यांदा वापरले. आणि ते रूढ झाले. अगदी आजसुद्धा त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणूनच ओळखले जाते. परंतु सावरकरांच्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे सावरकर हे ‘स्वातंत्र्यवीर’ नव्हे, तर ‘माफीवीर’ असल्याची मांडणी अभ्यासक करतात. 'द वीक' या देशातील जबाबदार नियतकालिकाने जानेवारी २०१६ मध्ये यासंदर्भातील माहिती पुढे आणली आहे. ती ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे मांडली आहे. आणि ती आजवर कुणी खोडून काढल्याचे ऐकिवात नाही. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार असताना २००३मध्ये संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सावरकरांचे तैलचित्र लावण्यात आले. महात्मा गांधींच्या तैलचित्राच्या अगदी समोर. भारतीय संसदेच्या इतिहासात काँग्रेस आणि इतर विरोधकांनी बहिष्कार घातलेला हा एकमेव सम...
#सेफ्टी फर्स्ट!! (सुरक्षिततेचा मूलमंत्र)
विशेष लेख

#सेफ्टी फर्स्ट!! (सुरक्षिततेचा मूलमंत्र)

स्मृती कुळकर्णी-आंबेरकर होणाऱ्या घटना चुकत नाहीत! टाळताही येत नाहीत. पण १२ गावचे (Exactly, ४ खंड आणि २४ देशांचे) पाणी प्यायलेली सोलो ट्रॅव्हलर म्हणून मी काही गोष्टी नक्की सुचवू इच्छिते! अत्याचार कोणावरही होतात, कुठल्याही वयात होतात, मुलगा-मुलगी दोघांवरही होतात पण मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण जास्त आहे म्हणून खास टीप्स Part 1Domestic Safety - ★ एखादा वाईट प्रसंग, घटना #अनोळखी_ठिकाणीच होते असं नाही. बरेचदा आपल्या पायाखालच्या, नेहमीच्या रस्त्यावरही होऊ शकते. Don't be Predictable!!! तीच वेळ, तोच रस्ता, तीच पार्किंगची जागा याचं रोजचं दळण दळू नका!! घरून बाहेर पडल्यावर १०० पावलं वाचवून तुम्ही एखाद्या ठिकाणी लवकर पोहोचत असाल तर आठवड्यातून २ दिवस लांबचा रस्ता घ्या. १० मिनिटं लवकर निघा. मध्ये एखादं काम असेल तर ते काम करून वाट वाकडी करून इच्छित स्थळी पोहोचा! ऑफिसच्या ठिकाणी कधीतरी वेगळ्या ठिक...
हैदराबाद बलात्कार, हत्या आणि एनकाऊन्टरच्या संदर्भात…
विशेष लेख

हैदराबाद बलात्कार, हत्या आणि एनकाऊन्टरच्या संदर्भात…

पंकज कुमार तुम्हाला दोन वर्षांपुर्वीची दिल्लीच्या रेयान इंटरनॅशनल स्कूलची घटना आठवते? दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या सात वर्षाच्या चिमुकल्या मुलाची शाळेच्याच वॉशरूममध्ये दोनदा गळा चिरून हत्या करण्यात आली होती. सोशल मिडीयावर त्याचा मृतदेह पाहून मन विषाण्ण झालं, राग द्वेष सगळ्या भावना एकदम उफाळून आल्या. पोलिसांनी चोवीस तासांच्या आत त्याच शाळेच्या बस ड्रायव्हरला अटक केली, बस ड्रायव्हरने त्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केली असे सांगितले. बस ड्रायव्हर ने लगेच गुन्हा कबूल सुद्धा केला. मिडीयाने वारंवार कहाण्या सांगून, मल्टीमिडीया प्रेझेंटेशन दाखवून आपल्या कल्पकतेला जणू हायजेक केले. हेच सत्य आहे असे आपल्या मनात बिंबविले. संपूर्ण प्रकरण आणि घटना आपल्याला अगदी क्लियर दिसू लागल्या. लोकांच्या भावना तिव्र होत्या, आरोपी ड्रायव्हरला भर चौकात फाशी द्या, जनतेच्या हवाली करा, गोळ्या घाला वगैरे वगैरे. ...
आरोपींना मारण्याची प्रथा लोकशाहीला घातक
विशेष लेख

आरोपींना मारण्याची प्रथा लोकशाहीला घातक

अनिल वैद्य कर्नाटकात चार आरोपींना मारून टाकले तर अनेक लोकं फार खुश झाले आहेत कारण लोक बलात्काराच्या घटनेमुळे फार संतप्त होते. पण ते हे विसरतात की, आपल्या लोकशाही देशात Rule of the Law कायद्याचे राज्य हे तत्व आहे. या पद्धतीने जर आरोपीचा पोलीस खात्मा करू लागले तर धनदांडगे पैशाच्या जोरावर व जात दांडगे जातीच्या जोरावर विरोधकांना सहजा सहजी शासकीय गोळी घालून सरकारी खून करतील. पाहिले बळी असतील ते गरीब, बहुजन, ओबीसी, अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक लोक ज्यांच्याकडे पैसा नाही, सत्ता नाही असे लोक. आरोपी करणे व गोळ्या घालून मारून टाकणे असेच करायचे असेल तर कशाला न्याय व्यवस्था संविधानात निर्माण केली.? हा सुध्दा प्रश्न नागरिकांनी स्वतःला विचारला पाहिजे. कसाबला जो देशद्रोही होता त्याला सुद्धा खटला चालवून फाशी दिली. हिंसेचा ज्यांचा इतिहास आहे, खून करणे, मारा मारी करणे, बदला घेणे, युद्धखोर अशी ज्यांच...
कुणी न्याय देता का न्याय?
विशेष लेख

कुणी न्याय देता का न्याय?

भारतमातेच्या लेकींप्रती थोडा सन्मान, थोडी संवेदना! शीतल करदेकर एखाद्या सिनेमातील प्रसंग वाटावेत असा तेलंगणातील चार बलात्का-यांचा खातमा! जनमानसांतून होणारा जल्लोष ढोल, ताशे,बाजे, पोलीसांवर उधळली जाणारी फुलं हे अस्वस्थता वाढवत होते ,या मागे वेदना होती !असंवेदनेची! आपला भारत देश कोणत्या दिशेला चालला आहे ? आमच्या देशात बलात्कार करणाऱ्या नराधमांना कायद्यानुसार सजा मिळाली नाही, ही नाराजीही या जल्लोषात विरून गेली होती. २०१४च्या दिल्ली निर्भया कांडानंतर महिला लैगिक अत्याचार विरोधी कायदा तयार झाला. बलात्का-याला फाशी आणि कठोर शिक्षा,अशा घटनांमध्ये त्वरित न्याय व्हावा म्हणून जलदगती न्यायालयात याची सुनावणी होणे, तसेच गुन्हेगारांना शासन होणे अत्यावश्यक आहे. हेही अधोरेखीत झाले.पण त्याचा फारसा उपयोग झाल्याचे दिसले नाही. लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एक स्तंभ न्याय व्यवस्था! हा स्तंभ डळमळीत होतोय,न्याय म...