झुंडीचे दुष्टचक्र मोडण्याची गरज आहे आणि हे काम महाराष्ट्रातील सक्षम स्त्रिया एकत्र येऊन करू शकतात!
शीतल करदेकर
झुंडशाही ही जातिभेद, लिंगभेद ,आर्थिक विषमता ,धार्मिक विद्वेष कशा कशात नाही? या झुंडवादी प्रवृत्ती व प्रस्थापितांना धक्के देताना, आपले स्थान निर्माण करताना रडावं नाही तर लढावं लागतं! ही लढाई आत्मसन्मानाची आपली गुणवत्ता सिद्ध करत ,समाजात स्थान मिळवण्याची असते !ताठ मानेने जगण्याच्या हक्काची असते!
झुंड चित्रपटाबद्दल सगळेच भरभरून बोलत आहेत! बाजूंने- विरोधात सगळेच काही जोरदार सुरू आहे ! त्यात मोठा गट सोईने गप्प! काहीजण हात धुवून घेत आहेत! प्रसिद्धीची किंमत खूप मोठी असते! विषयाशी याचं काही घेणं देणं नसते असे हे मुखवटेबाज! नागराज मंजुळे विषय चांगला घेतला आहे !हा चित्रपट विजय बारसे या झोपडपट्टीतील मुलांसाठी फुटबॉल प्रशिक्षणाची समाजसेवी संस्था सुरु करणाऱ्या खऱ्याखुऱ्या हिरोची आहे! हीच भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकारली आहे!
जातीव्यवस्था आणि त्यातून होणा...