अफवा पसरवणाऱ्या पोथ्या – जेट जगदीश
जेट जगदीश
अफवा पसरवणे जर गुन्हा आहे, तर व्रत आणि उपवासाच्या ज्या पोथ्या आहेत त्यातील खोटा आशावाद पसरवणाऱ्या भाकड कथा या अफवा नाहीत का? सत्यनारायण कथा, लक्ष्मीव्रत कथा, संतोषी माता व्रत कथा, सोळा सोमवार, सोळा गुरुवार, सोळा शुक्रवार च्या पोथ्या अफवा नाहीत का? कारण त्यात सांगितल्याप्रमाणे भक्तांच्या मनोकामना कधीच पुऱ्या झालेल्या आजतागायत दिसल्या नाहीत. मग ह्या पोथ्या लिहीणाऱ्या लेखकांनी अफवा पसरवण्याचा गुन्हा केला नाही काय? पोथी वाचणार्या भक्तांकडे क्वचितच धनधान्य, समृद्धी आली असेल. पण पोथी न वाचणाऱ्या या प्रकाशकांनी धर्माच्या नावाखाली पोथीच्या आधारे कर्मकांड करणाऱ्या ब्राह्मणाने मात्र खोऱ्याने पैसे ओढून स्वतःचे मात्र कल्याण केले!
या पोथ्यातील कथांना खरे समजल्यामुळे प्रत्यक्षात नरबळी दिले गेले आणि अनेक भक्तांनी ही व्रते वा पूजा केल्यामुळे मिळणाऱ्या मोक्षाच्या अफवांमुळे आत...