महाराष्ट्र

बलुतेदार, आलुतेदार, भटके विमुक्तांचा उद्या राज्यस्तरीय मेळावा
महाराष्ट्र

बलुतेदार, आलुतेदार, भटके विमुक्तांचा उद्या राज्यस्तरीय मेळावा

लोक मराठी : बारा बलुतेदार, अठरा आलुतेदार, भटके विमुक्त, ओबीसी, एसबीसी यांचा राज्यस्तरीय मेळावा उद्या (शुक्रवार, दि. २०) सकाळी १० ते ३ वाजता कोथरूड-कर्वे चौक (पुणे) येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती महाराष्ट्र बाराबलुतेदार महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष विशाल जाधव यांनी दिली असून या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असेही आवाहन जाधव यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, तर कार्यक्रमाचे उद्घाटक ओबीसी नेते तथा बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच शेकापाचे नेते जयंत पाटील, शब्बीर अन्सरी, बाळासाहेब मिसाळ, आमदार बच्चू कडू, कपिल पाटील, संदेश चव्हाण, प्रतापराव गुरव, सतिष कसबे, दशरथ राऊत, दत्तात्रय चेचर, चंद्रकांत गवळी, मारूती कदम, साहेबरावज...
कादंबरीकार किरण नगरकर यांचे निधन
महाराष्ट्र, मोठी बातमी

कादंबरीकार किरण नगरकर यांचे निधन

मुंबई (लोकमराठी ) : कादंबरीकार किरण नगरकर यांचे आज (ता. ५) निधन झाले. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६७ वर्षाचे होते. किरण नगरकर हे मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिणारे आधुनिक लेखक, नाटककार, समीक्षक होते. किरण नगरकरांची पहिली कादंबरी अभिरुची नावाने १९६७-६८च्या सुमारास प्रसिद्ध झाली होती. नंतर तीच 'सात सक्कं त्रेचाळीस ' या नावाने मौज प्रकाशनाने १९७४ला प्रकाशित केली. मराठीतील महत्त्वाच्या कादंबर्‍यांमध्ये हिची गणना होते. मोजक्याच कादंबर्‍या लिहून नगरकर अत्यंत लोकप्रिय असे कांदबरीकार म्हणून ओळखले जायचे. 'रावण आणि एडी ही त्यांची कादंबरी इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. नगरकरांच्या 'गॉड्स लिटल सोल्जर, ककल्ड या पुस्तकांनी मराठी आणि इंग्रजीत नवे विचार मांडले. २००१ला ककल्ड या पुस्तकासाठी नगरकरांना साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरविण...
मुंबईत ३८ हेक्टर क्षेत्रात कांदळवन उद्यानाची निर्मिती; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती 
महाराष्ट्र, मोठी बातमी

मुंबईत ३८ हेक्टर क्षेत्रात कांदळवन उद्यानाची निर्मिती; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई (लोकमराठी) : मुंबई येथे ३८ हेक्टर क्षेत्रात दोन कांदळवन उद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे. यापैकी गोराई येथे ८ हेक्टर क्षेत्रावर २६.९७ कोटी रुपये खर्चून तर दहिसर येथे ३० हेक्टर क्षेत्रावर ४८.८० कोटी रुपये खर्चून कांदळवन उद्यान विकसित केले जात असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. गोराई कांदळवन गोराई कांदळवन उद्यानात निसर्ग परिचय केंद्र, मँग्रो ट्रेल, पक्षी निरीक्षण मनोरा, स्थानिकांमार्फत होडी पर्यटन, यासारखी कामे प्रस्तावित असून २०२१ च्या दीपावलीच्या आधी हा प्रकल्प पर्यटकांसाठी उपलब्ध होईल यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीने निधी उपलब्ध करून दिला आहे. दहिसर कांदळवन दहिसर कांदळवन उद्यानाला प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कांदळवनाची जैवविविधिता खूप मोठी असून येथे कांदळवनाच्या ११ प्रजाती आढळतात. त्यामुळे संशोध...
शिरपूर दुर्घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी करणार – कामगारमंत्री डॉ. संजय कुटे यांची घोषणा
महाराष्ट्र

शिरपूर दुर्घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी करणार – कामगारमंत्री डॉ. संजय कुटे यांची घोषणा

मुंबई (लोकमराठी) : धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे रसायन कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांबद्दल कामगारमंत्री डॉ. संजय कुटे यांनी तीव्र शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. या घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी केली जाईल. संबंधित फॅक्टरी मालक व विभागाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे (DISH) अधिकारी यांचीही चौकशी करून यात जे कुणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा कामगारमंत्री डॉ. कुटे यांनी केली. शिरपूर येथे झालेल्या दुर्घटनेची आणि येथे झालेल्या कामगारांच्या मृत्यूची राज्य सरकार आणि कामगारमंत्री डॉ. कुटे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मृतांच्या परिवाराला शासनाकडून 5 लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले आहे. परंतु या कारखान्याच्या शेजारी लोकवस्ती होती. त्यामुळे या घटनेतील मृतांच्या परिवाराला संबंधित कंपनीच्या मालकाकडूनही प्रत्येकी 5 ल...
निवडणूक सुधारणा ही निरंतर चालणारी प्रक्रिया : राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया
महाराष्ट्र, मोठी बातमी

निवडणूक सुधारणा ही निरंतर चालणारी प्रक्रिया : राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया

‘राज्य निवडणूक आयोग : रौप्य महोत्सवी वाटचाल’चे पुण्यात प्रकाशन पुणे (लोकमराठी): निवडणूक सुधारणा ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने विविध सुधारणा हाती घेतल्या आहेत. या सुधारणांच्या माध्यमातून निर्भय, मुक्त व पारदर्शक निवडणुका पार पाडणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे केले. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या २५ वर्षपूर्तीनिमित्त ‘राज्य निवडणूक आयोग : रौप्य महोत्सवी वाटचाल’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे प्रकाशन श्री. सहारिया यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे यावेळी उपस्थित होत्या. श्री. सहारिया यांचे 'निवडणूक सुधारणा आणि स्थानि...
मुख्यमंत्र्यांकडून वंचित आघाडीला बळ – पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांकडून वंचित आघाडीला बळ – पृथ्वीराज चव्हाण

पुणे (लोकमराठी) : लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित आणि भाजपचे काय संबंध होते हे सर्वांना माहित आहे. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वंचितला बळ येत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पुण्यातील काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथे विंचीत बहुजन आघाडी हा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष होईल असा दावा केला. त्यावर चव्हाण म्हणाले, "वंचित आघाडी वाढावी यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न आहेत. लोकसभेत त्यांचे काय संबंध होते हे लोकांना माहिती आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे जागा वाटपासाठी अजून चर्चा झालेली नाही. तसेच आणखी आघाडीत कोणाला घ्यायचे हे ठरलेले नाही.'' ''मुख्यमंत्री फडणवीस हे अमित शहांप्रमाणे सामा दाम दंड भेद वापरून विरोधी पक्षातील नेत्यांना धमकाऊन भाजपमध्ये घेत आहेत. विरो...
एक सप्टेंबरपासून वाहतुकीचे नियम अधिक कडक; विना परवाना वाहन चालवल्यास पाच हजार दंड
महाराष्ट्र, मोठी बातमी

एक सप्टेंबरपासून वाहतुकीचे नियम अधिक कडक; विना परवाना वाहन चालवल्यास पाच हजार दंड

मुंबई (लोकमराठी) : मोटार वाहन कायद्यातील बदलांमुळे एक सप्टेंबरपासून नवीन नियम लागू होणार आहेत. वाहतुकीचे नवीन नियम आधीपेक्षा अधिक कठोर असतील. वाहतूक परवान्याशिवाय गाडी चालवल्यास दंड दहापट करण्यात आला आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यावर होणाऱ्या दंडात्मक कारवाईत बदल करण्यात आले आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने हे बदल करण्यात आले आहेत. ड्रायव्हिंग लायसन्स सोबत नसेल तर पाचशे रुपयांऐवजी दसपट म्हणजे तब्बल पाच हजार रुपये दंड मोजावा लागणार आहे. दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकांकडून दोन हजार रुपये दंड वसूल केला जात होता, तोही आता दहा हजार रुपयांवर नेण्यात आला आहे. वाहतुकीचे नवे नियम लागू करण्याबाबत विधेयकाला संसदेने मंजुरी दिली. अल्पवयीन मुलांनी गाडी चालवताना अपघात घडला, तर त्याच्या किंवा तिच्या पालकांना तीन वर्ष तुरुंगवासाची तरतूद आहे. त्याचबरोबर ...
राज ठाकरेंकडे एवढी संपत्ती कुठून आली?; अंजली दमानिया यांचा सवाल
महाराष्ट्र, मोठी बातमी

राज ठाकरेंकडे एवढी संपत्ती कुठून आली?; अंजली दमानिया यांचा सवाल

मुंबई (लोकमराठी) : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चौकशीसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहे. या चौकशीची वेळ चुकीची असल्याचे मत दमानिया यांनी व्यक्त केले आहे. मात्र त्याचवेळी ही चौकशी याआधीच व्हायला हवी होती असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. तसचं राज ठाकरे यांच्या कमाईचे साधन काय?, त्यांच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली? असा सवालही त्यांनी एका वृत्तवाहिनिशी बोलताना व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांची चौकशी २२ तारखेला म्हणजेच आज होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट झाल्यानंतर मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे सकाळपासूनच मुंबईमधील अनेक महत्वाच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच बंदोबस्तामध्ये राज ठाकरे त्यांची पत्नी शर्मिला आणि मुलगा अमित यांच्या सोबत पावणे अकराच्या सुमारास कृष्णकुंजवरुन ईडीच्या ...
कांदा व्यापाऱ्याची ४२ लाखाची फसवणूक
महाराष्ट्र

कांदा व्यापाऱ्याची ४२ लाखाची फसवणूक

सोलापूर, दि. २० (लोकमराठी) : सोलापूरातील कांदा व्यापारी उस्मान अब्दूल गफुर बागवान (वय ५१, रा. तेलंगी पाच्छा पेठ, सोलापूर) यांची ४२ लाख २३ हजार ९३९ रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यांच्याकडून कांदा घेवून ठरलेल्या भावापेक्षा कमी पैसे दिले. थकीत रक्कम न दिल्याने मिरासाब आणि सिराज (रा. जिना मक्कल, तामीळनाडू) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बागवान यांचा कांदा विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी शेतकऱ्याकडून घेतलेला कांदा हे मिरासास आणि सिराज यांच्याकडे जुना पुना नाका येथे ट्रकने तामीळनाडू येथे पाठवला होता. ओळख असल्यामुळे बागवान हे मिरासाब आणि सिराज यांच्यासोबत व्यवहार करित होते. सुरवातीला काही दिवस व्यवहार व्यवस्थित झाला. त्यानंतर मात्र मिरासाब आणि सिराज या दोघांनी ठरलेल्या भावापेक्षा कमी पैसे दिले. उर्वरित रक्कम नंतर देतो म्हणून टाळाटाळ केली. अद्यापर्यंत थकीत रक्कम दिली नाही. बागवान यांनी वा...
लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या टपाल तिकिटाचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
महाराष्ट्र, मोठी बातमी

लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या टपाल तिकिटाचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

लोक मराठी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी साजरी होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र शासन व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने गुरूवारी (दि. १ ऑगस्ट) अण्णा भाऊंचे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात येणार आहे. अशी माहिती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी दिली. मुंबईतील ब्रांदा येथील रंगशारदा सभागृहात गुरूवारी सकाळी साडेनऊ वाजता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते हा ऐतिहासिक सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री दिलीप कांबळे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समिती उपाध्यक्ष मधुकर कांबळे, लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती अध्यक्ष अशोक लोखंडे, आमदार सुधारक भालेराव यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी, अधिकारी आणि अण्णा...