महाराष्ट्र

भाजप आमदार कालीदास कोळंबकर यांचा जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेशी संवाद
महाराष्ट्र

भाजप आमदार कालीदास कोळंबकर यांचा जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेशी संवाद

मुंबई : आमदार कालिदास कोळंबकर यांनी जनता दरबाराचा माध्यमातून जनतेशी संवाद साधला. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखालील विजय नगर व परिसरातील नागरिकांसाठी जी व उत्तर आरोग्य विभागाच्या अंतर्गत मोफत आरोग्य शिबीर, औषधो उपचार तसेच कोविड-19 टेस्ट सुविधा करण्यात आली. नागरी सुविधे अंतर्गत जेष्ठ नागरिक यांना कार्ड, पॅन-कार्ड, आधारकार्ड सुविधा उपलब्ध करण्यात आले, तसेच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमा अंतर्गत झाडे लावणे, समाजातील विकलांगांना तीनचाकी सायकलचे वाटप ही सुविधा उपलब्ध करण्यात आली. तसेच जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेशी संवाद करून समस्याचे निवारण सुद्धा करण्यात आले. त्यावेळी कार्यकर्ते बाबूभाई भवानजी, वसंत जाधव, चारुलता हंबीर, डॉ. अंकुश शेठ, मयुरी तारी, महेश धानमेले, एकनाथ संगम, शिवाजी खंडागळे, प्रकाश तरळ, उलका ठाकूर, स्नेहा जोशी, सौ. हर्षल कांबळे, मनीषा आमडसकर, प्...
कोविडचा फटका बसलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र, ताज्या घडामोडी

कोविडचा फटका बसलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रत्येक शहरांत वाहनतळ, चेक पोस्ट नजीक ट्रॉमा केअर सेंटर्स उभारण्याचे नियोजन करण्याचे निर्देश मुंबई, ता. १८ : कोविडमूळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या बाबतीत योग्य तो तोडगा लगेच काढला जाईल , वित्त व परिवहन विभाग यांच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश देण्यात येतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले . महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स बस वाहतूक महासंघाच्या शिष्टमंडळाने त्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली व चर्चा केली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.. यावेळी खासदार , ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस महासंचालक संजय पांडे आदींची उपस्थिती होती. राज्या...
रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला उपनिरीक्षकास ६० हजारांची लाच घेताना अटक
महाराष्ट्र

रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला उपनिरीक्षकास ६० हजारांची लाच घेताना अटक

वरोडा : खाजगी संगणक संचालकाने रेल्वे प्रवासाकरिता एका व्यक्तीस आभासी तिकीट काढून दिले. हे तिकीट नियमबाह्य पद्धतीने काढले म्हणून संगणक संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात तडजोड करण्यासाठी ६० हजार रुपयाची लाच घेताना वरोडा येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला उपनिरीक्षकास बुधवारी रंगेहाथ पकडण्यात आले. वरोडा येथील रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलामध्ये गोपिका मानकर उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. भद्रावती येथील खाजगी संगणक संचालकांनी एक महिन्यापूर्वी एका व्यक्तीस रेल्वे प्रवासाकरिता आभासी तिकीट काढून दिले. ही बाब उपनिरीक्षक गोपिका मानकर यांना माहित झाली. त्या संगणक संचालकावर रेल्वे सुरक्षा दल वरोडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी तडजोड करण्याकरिता गोपिका मानकर यांनी तक्रारकर्त्यास एक लाख रुपयाची मागणी केली. त्यामध्ये ६० हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारकर्त्याने याबाबत...
कल्याण : या अजगराला पाहुन तुमचेही डोळे पांढरे होतील!
महाराष्ट्र

कल्याण : या अजगराला पाहुन तुमचेही डोळे पांढरे होतील!

https://youtu.be/0XJs5J6fTyc कल्याण : कल्याण जवळील तितवाळा येथील एनआरसी कंपनीमध्ये भला मोठा अजगर आढळून आला. जेसीबी चालकाने या अजगराला अलगदपणे उचलून कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून बाजूला ठेवले. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेल्या कंपनीमध्ये कारखाना तोडण्याचे काम सुरू आहे. काम सुरू असताना एक भला मोठा अजगर आढळून आला. जेसीबी चालकाने या अजगराला अलगदपणे उचलून कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून बाजूला ठेवले....
उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे ‘महाराष्ट्र कोविड योद्धा’ पुरस्काराने सन्मानित
महाराष्ट्र, मोठी बातमी

उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे ‘महाराष्ट्र कोविड योद्धा’ पुरस्काराने सन्मानित

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान मुंबई : कोरोना महामारीच्या काळात केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे यांचा 'महाराष्ट्र कोविड योद्धा' पुरस्काराने गौरव करण्यात आला. दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांचा हस्ते कुंदा भिसे यांना 'महाराष्ट्र कोविड योद्धा पुरस्कार' देण्यात आला. शुक्रवारी ( ता. ८ ऑक्टोबर) हा सोहळा मुंबई येथे राजभवनात पार पडला. यावेळी राज्यभरातील विविध ठिकाणच्या अनेक प्रतिष्ठित डॉक्टर, अधिकारी, समाजसेवक यांच्यासह समाजातील विविध कोरोना योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कुंदा भिसे यांना प्रमाणपत्र प्रदान केले. तसेच उन...
विश्वासघात करत मित्राच्या आजीचे सोन्याचे दागिने लंपास
महाराष्ट्र

विश्वासघात करत मित्राच्या आजीचे सोन्याचे दागिने लंपास

औरंगाबाद : सततचे जाणे येणे करण्याऱ्या तरुणाने चक्क आपल्या मित्राचा विश्वासघात करत मित्राच्या आजीचे सोन्याचे दागिने लंपास केले. औरंगाबाद मधील छावणी परिसरात ही घटना घडली असून पोलसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या शमा नियाज म्हणून या आजी आपल्या मुला, नातू आणि सुनेसह पडेगावातील अन्सार कालोनीत राहतात. यांचे किराणामालचे दुकान आहे. त्यांनी आपले पैसे कपाटात ठेवले होते. ६ ऑक्टोबर रोजी कपाटातून ठेवलेली काही रक्कम त्यांना दिसली नाही. त्यांनी शोधाशोध करताना त्यांना कपाटातील पिशवीमधून सोन्याच्या बांगड्या, गंठण कानातले, आणि सोन्याची अंगठी नसल्याचे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यांनी चौकशी करताना त्यांच्याकडे येजा करणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवले. त्यात नातवाचा मित्र आफताब सतत ये जा करत असल्याचे आढळले. पोलिसांनी...
अंनिसचा आगरकर पुरस्कार सुनीलकुमार लवटे यांना, तर जीवनगौरव पुरस्कार प्रभाताई पुरोहित यांना जाहीर!
मोठी बातमी, महाराष्ट्र

अंनिसचा आगरकर पुरस्कार सुनीलकुमार लवटे यांना, तर जीवनगौरव पुरस्कार प्रभाताई पुरोहित यांना जाहीर!

संतराम कर्हाड (अंबाजोगाई), वसंतराव टेंकाळे (लातूर), विजयाताई श्रीखंडे (नागपूर), विनायक चव्हाण (इचलकरंजी), उदयकुमार कुर्हाडे (येवला) यांचाही विविध पुरस्कारांनी सन्मान मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने समाजात - चळवळीत भरीव योगदान देणार्या विविध कार्यकर्त्यांना, मान्यवरांना खालील अंनिसचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत. लवकरच एका कार्यक्रमात हे सर्व पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जातील. ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांना जाहीर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दिला जाणारा ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार’ ज्येष्ठ लेखक - विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांना जाहीर करण्यात येत आहे. सन्मानपत्र व 15 हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. लवटे सर पुरोगामी चळवळींचे मार्गदर्श...
खडकी सदार येथील डीपी बॉक्स धोकादायक : महावितणचे जाणीव पुर्वक दुर्लक्ष
महाराष्ट्र

खडकी सदार येथील डीपी बॉक्स धोकादायक : महावितणचे जाणीव पुर्वक दुर्लक्ष

रिसोड: तालुक्यातील खडकी सदार येथील डीपी बॉक्स अतिशय खराब झाला आहे. गावकऱ्यांने तो बदलून नविन बसवण्याची मागणी महावितरण कार्यालयाकडे वेळोवेळी करुन ही अद्याप तो बदलण्यात आलेला नाही. त्या डीपी बॉक्समुळे जनावराना शॉक लागण्याची शक्यता आहे. खडकी सदार गावातील शेतात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर डीपी बाक्स असल्याने गावातील जनावरे शेळ्या यांना शाँक लागण्याची शक्यता जास्त प्रणाणात आहे. तसेच डीपी बॉक्स हा मेन लाईन पासून डारेक्ट करण्यात आला आहे. गावात कुठे काही अडचण आली तर लेगच तो बंद करता ही येत नाही. त्यामुळे रस्त्यावरुन जाताना भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी गावात जिवीत हानी होण्याच्या आधी डीपी बॉक्स बदण्यात यावा अशी गावकऱ्याची मागणी आहे....
परतीच्या पावसामुळे खडकी सदार येथे सोयाबीन पिकाचे नुकसान |शेतकरी हवालदिल; मदतीची मागणी
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र

परतीच्या पावसामुळे खडकी सदार येथे सोयाबीन पिकाचे नुकसान |शेतकरी हवालदिल; मदतीची मागणी

रिसोड प्रतिनिधी शंकर सदार: मागील चार पाच दिवसापासून वाशिम जिल्हात मुळसधार पाऊस सुरु असल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास घिरावून गेला आहे. रिसोड तालुक्यातील खडकी सदार या गावातील शेतकऱ्याची सोयाबीनची कापणी केली आहे. सतत तीन चार दिवस चालू असलेल्या पावसामुळे सोयाबीनचे दाणे फुटून पूर्ण सोयाबीन पीक वाया गेले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने आता आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले होते. त्यात आता सोयाबीन काढणीला आले असताना पावसामुळे झाडाच्या शेंगांना कोंब फुटले आहेत तर कपाशीची बोंडे सुद्धा काळवंडून गेली आहेत. तसेच तूर, मूग, उडीद या पिकांनाही फटका बसला होता. यामुळे याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. अशातच काही प्रमाणात वाचलेल्या सोयाबीनचे पिकामुळे काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांच्या अश...
आठ दिवसापासून खडकी सदार अंधारात; महावितरण कर्मच्याकडून उडवाउडवीचे उत्तर
महाराष्ट्र

आठ दिवसापासून खडकी सदार अंधारात; महावितरण कर्मच्याकडून उडवाउडवीचे उत्तर

खडकी सदार: मागील आठ दिवासापासून खडकी सदार येथील लाइट बरोबर नल्यामुळे गणपती महाल्मी या सारख्या सण अंधारत साजरे करावे लागले आहेत. यासंबंधित महावितरण कर्मचाऱ्याला सांगितले असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे गावकऱ्याचे म्हणणे आहे. गावामध्ये जी लाइट आहे सध्या त्याने गावकऱ्याचे मोठ्या प्रणातनुकसान झाले आहे, पॅन, टिव्ही, लाइट, कुलर इलेक्टांनिक वस्तू खराब झाल्याने गावकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या गावाला वायरमन नसल्याने आठ दिवसापासून गावकऱ्यांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने साप आणि विंचू असल्या अनेंक प्राण्यापासून जिवीत हानी होण्याची शक्यता आहे. गावात भिंती कोळसणे अनेंक घटना घडू शकता असे गावकऱ्याचे म्हणे आहे. त्या जर लाईट नसले तर अजून मनस्ताप होतोय. लकरात लवकर लाइट व्यवस्थीत करण्यात यावी. तसेच सध्या डेंगू साथ मोठ्या प्रणात असल्य...