महाराष्ट्र

कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ चार महत्त्वाचे निर्णय
महाराष्ट्र

कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ चार महत्त्वाचे निर्णय

मुंबई, (लोकमराठी) : महाराष्ट्रात 'कोरोना'च्या वाढत्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. केशरी शिधापत्रिका धारकाना एप्रिल ते जून 2020 या कालावधीसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्यात येणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांनी बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. राज्यात 'कोरोना'चा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होतील, अशी शक्यता बांधली जात होती. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यां व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण' मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः...
Coronavirus : इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या पुढाकाराने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझर टनेलची निर्मिती
मोठी बातमी, महाराष्ट्र

Coronavirus : इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या पुढाकाराने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझर टनेलची निर्मिती

माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहितीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी लावण्यासाठी राज्यात कमी खर्चात अत्याधुनिक सॅनिटायझर टनेल मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी (रेल्वे स्टेशन, बस स्थानक, भाजीपाला मार्केट,शासकीय कार्यालय, विद्यापीठ, हॉस्पिटल प्रवेशद्वार) अशा गर्दीच्या ठिकाणी टनल सॅनिटायझरची उभारणी करून निर्जंतुकीकरण गरजेचे आहे. त्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने पुढाकार घेऊन सॅनिटायझर टनेलची निर्मिती केली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिली. देशातील विविध भागांमध्ये अशा प्रकारच्या टनेलचा वापर केला जातोय. ज्यामध्ये दिल्ली, हरियाना, कर्नाटक, तमिळनाडू राज्यांचा समावेश आहे. तसेच भारतीय रेल्वेकडून हरियाना येथे अशा प्रकारच्या टनेलची निर्मिती करण्यात आलेली आहे. या टनेलला फुमिगेशन टन...
#coronavirus : राज्यात १०१८ कोरोना बाधित रुग्ण ; ७९ जणांना घरी सोडले
मोठी बातमी, महाराष्ट्र

#coronavirus : राज्यात १०१८ कोरोना बाधित रुग्ण ; ७९ जणांना घरी सोडले

12 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण - आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 150 नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या 1018 झाली आहे. कोरोनाबाधित 79 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 875 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिली. राज्यात मंगळवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या 20 हजार 877 नमुन्यांपैकी 19 हजार 290 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 1018 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 79 कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 34 हजार 695 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 4008 जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. निजामुद्दीन येथील झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि म...
अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करच्या प्रसंगावधानाने दिला गरोदर मातेस पुनर्जन्म
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करच्या प्रसंगावधानाने दिला गरोदर मातेस पुनर्जन्म

अलिबाग (रायगड) ता. 6 : पनवेल तालुक्यातील आपटा गावात अंगणवाडी सेविका अलका अनंत कांबळे या नियमित गृहभेटीकरिता गेल्या होत्या. त्यावेळी श्रीमती कांबळे यांच्या लक्षात आले की, श्रीमती मंगल सुनील सीद या गरोदर महिलेस प्रसूती वेदना सुरु झाल्या आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रसंगावधानाने श्रीमती कांबळे या अंगणवाडी सेविकेने तात्काळ ऑटोरिक्षा बोलाविली आणि आशा वर्कर सुनिता रमेश जोशी यांना सोबतीला घेऊन श्रीमती मंगल यांना तात्काळ आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पुढील काही वेळातच आपटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका चव्हाण आणि नेहा गांगुर्डे तसेच आरोग्य पर्यवेक्षिका नमिता पाटील, आरोग्य सेविका कल्पना वैष्णव यांनी श्रीमती मंगल यांची वैद्यकीय तपासणी केली व त्यांची यशस्वी नैसर्गिक प्रसूती केली. श्रीमती मंगल सीद यांची नैसर्गिक प्रसूती होवून त्यांनी एका गों...
#coronavirus : कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना बाधिताचा स्वानुभव!
मोठी बातमी, महाराष्ट्र

#coronavirus : कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना बाधिताचा स्वानुभव!

लोकमराठी : कोरोना (covid-19) या आजारावर योग्य उपचार व मनाची सकारात्मकता असेल तर त्यावर विजय मिळविणे कठिण नाही. असे मत एका कोरोनावर मात केलेल्या रूग्णाने व्यक्त केले आहे. या रूग्णाने आपला अनुभव सांगताना म्हटले आहे की, माहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी अमेरिकेला गेलो होतो. कोरोना विषाणू संदर्भात भारतात (नागपुरात) परतल्यावर त्यापैकी 3 सहकाऱ्यांना कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटीव्ह आली. हे ऐकून मी घरीच स्वत:ला क्वारंटाईन केलं. आणि नंतर माझ्या सेाबत आलेल्या मित्रांसोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी गेलो. मला असिम्टोटिक कोरोना झाल्याचं निदान झालं. म्हणजे कोरोनाची कोणतीही बाह्य लक्षणं मला नव्हती. तरी मला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. कोरोना असल्याचं कळलं. त्यामध्ये मला मल्टीविटामीनच्या गोळ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दे...
अन्नपदार्थांमध्ये भेसळ रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे निर्देश
महाराष्ट्र

अन्नपदार्थांमध्ये भेसळ रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे निर्देश

मुंबई, (लोकमराठी) : राज्यात अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी विभागाने कठोर पावले उचलावी. औषध निरीक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावी, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिल्या. विधानभवनात राज्यमंत्री श्री.पाटील यांनी विभागाचा आढावा घेतला. यावेळी विभागाच्या आयुक्त पल्लवी दराडे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील नागरिकांना भेसळमुक्त दर्जेदार अन्नघटक व पदार्थ मिळाले पाहिजेत. जेणेकरुन, नागरिकांच्या आरोग्याला कुठलीही बाधा पोहोचणार नाही. अन्नपदार्थातील भेसळ रोखण्यासाठी भेसळखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असेही राज्यमंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.राज्यात रस्त्यांवर तसेच छोट्या दुकानातून अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या सुमारे 7 लाख विक्रेत्यांची नोंदणी झाली असून टप्प्याटप्प्याने त्यांना अन...
भाजपा चित्रपट कामगार आघाडीने जाहीर माफी मागावी – एनयुजे महाराष्ट्र; तर आघाडीचे अध्यक्ष विजय सरोज यांचा खुलासा
महाराष्ट्र

भाजपा चित्रपट कामगार आघाडीने जाहीर माफी मागावी – एनयुजे महाराष्ट्र; तर आघाडीचे अध्यक्ष विजय सरोज यांचा खुलासा

मुंबई : राजकीय पक्ष राजकारण करतात एकमेकांवर चिखलफेक करतात. आणि आपल्या सोईने आणि कामाच्या, हिताच्याच बातम्या याव्यात. असे प्रत्येकाला वाटत असते. बातमीदारी करताना अपडेट माहिती पोहोचवताना जी मेहनत आमच्या प्रसार माध्यम प्रतिनिधींना घ्यावी लागते, उनपावसाची पर्वा न करता धावावे लागते याचे महत्व जनता समजू शकते. स्वार्थी आंधळे लोकं हे समजू शकतंच नाहीत. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला कस्पटासमान मानणारे लोकच त्यांचा अपमान करतात हे प्रखर जळजळीत वास्तव आहे. चित्रपटातील कलाकार साँफ्ट टारगेट असतात, तिथे आपण कोणावरही हल्ला केला तर गपगुमान सहन करतात असा आपला गोड गैरसमज असल्याने माध्यमांवर हीन दर्जाची चिखलफेक करताहेत! लोकशाहीच्या मुख्य आधारस्तंभाला कुत्रा म्हणून सोशल मिडियात वायरल करणारे हे जे कोणी लोक आहेत त्यांनी कोणताही विलंब न करता आपण केलेल्या महाप्रतापाबद्दल प्रसार माध्यमांची जाहीर माफी मागावी. अन्यथा आप...
इंदू मिल येथे होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची उंची वाढवणार – अजित पवार
मोठी बातमी, महाराष्ट्र

इंदू मिल येथे होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची उंची वाढवणार – अजित पवार

बाबासाहेबांच्या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही; उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ग्वाही मुंबई : दादर येथील इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची उंची वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून आता हा पुतळा ३५० फुटांचा असणार आहे तर स्मारकाची उंची ४५० फूट असेल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याच्या सुधारित प्रस्तावाला बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पुतळ्याची उंची वाढणार असल्याने आता या स्मारकाच्या खर्चातही वाढ होणार आहे. आधी स्मारकासाठी ७०९ कोटी रुपये प्रस्तावित खर्च होता आता तो ९९० कोटींवर जाणार आहे. परंतु बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी दिली.या स्मारका...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाच्या विरोधात ठाण्यात हिंदुत्वनिष्ठांचे निषेध आंदोलन
महाराष्ट्र

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाच्या विरोधात ठाण्यात हिंदुत्वनिष्ठांचे निषेध आंदोलन

सावरकरांचा अवमान करणाऱ्या पुस्तकावर देशभरात तत्काळ बंदी घालावी, अन् संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करावी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी ठाणे : भोपाळ येथे काँग्रेस सेवादलाच्या प्रशिक्षण शिबिरात 'वीर सावरकर कितने ‘वीर ?' या नावाने वाटण्यात आलेल्या पुस्तकामध्ये अत्यंत हीनकस, स्वा. सावरकरद्वेषी आणि धादांत खोटारडे लिखाण केले आहे. यातून काँग्रेसवाले स्वातंत्र्यवीरांना बदनाम करण्यासाठी किती खालच्या पातळीला जाऊ शकतात, हेच दिसून येते. स्वा. सावरकर यांचाच नव्हे, तर कोणत्याही राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचा अवमान कोणाकडूनही होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने तत्काळ यासंदर्भात कायदा करण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसने वाटलेल्या पुस्तकातून देशात धार्मिक आणि जातीय तणाव निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचाही कुटील हेतू दिसून येतो. काँग्रेसचा स्वा. सावरकरद्वेष, हा संपूर्ण क्रांतीकारी चळवळीविषयी...
ग्रामीण उद्योजक स्त्रियांचा मुंबईमध्ये आजपासून “माणदेशी महोत्सव”
मोठी बातमी, महाराष्ट्र

ग्रामीण उद्योजक स्त्रियांचा मुंबईमध्ये आजपासून “माणदेशी महोत्सव”

यंदा ९ जानेवारी ते १२ जानेवारी मुंबईकरांना साताऱ्यातील “माण” तालुक्याचा अनुभवलोककलावंत भारुडकार चंदाताई तिवाडी प्रेक्षकांना करणार भारुडाने मंत्रमुग्धमृदुला दाढे- जोशी संगित मैफिल आणि केराबाई यांच्यासह जुगलबंदीलोकसंगीत, लोकनृत्य, गझी लोकनॄत्य, यांचा आस्वादमहिला कुस्त्याचा आनंद मुंबई : माण हा सातारा जिल्ह्यातील एक दुष्काळी भाग. या भागातील महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी माणदेशी फाऊंडेशनची स्थापना झाली. दरवर्षी माणदेशी फाऊंडेशन संस्थेचा “माणदेशी महोत्सव” मुंबईमध्ये भरविला जातो. माणदेशी महोत्सवाचे मुंबईतील यंदाचे चौथे वर्ष आहे. यंदा ९ जानेवारी ते १२ जानेवारी २०२० “माणदेशी महोत्सव” रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे. गावाकडील संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मुंबईकरांनी या महोत्सवात येऊन आनंद घ्यावा अशी माहिती माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्ष...