महाराष्ट्र

अवैधरित्या मद्यपुरवठा प्रकरणी येथे तक्रार करा; मुंबईतील ६ परवानाधारकांचा परवाना रद्द
महाराष्ट्र, मोठी बातमी

अवैधरित्या मद्यपुरवठा प्रकरणी येथे तक्रार करा; मुंबईतील ६ परवानाधारकांचा परवाना रद्द

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे - वर्मा यांची माहिती मुंबई (लोकमराठी) : विधानसभा निवडणुका निर्भीड व खुल्या वातावरणात पार पडण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मुंबईमध्ये नियमभंग करणाऱ्या काही परवानाधारकांवर कडक कारवाई करण्यात आली. ६ परवानाधारकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. यापुढेही अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या अथवा नियमभंग करणाऱ्या अनुज्ञप्तींविरोधात अनुज्ञप्‍ती रद्द अथवा निलंबनाची कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिला आहे. सर्व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचारी यांना याबाबत सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक आचारसंहिता नियमांचा तसेच मुंबई विदेशी मद्य नियमावली १९५३ अंतर्गत नियमांचा भंग करणाऱ्या व अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील वैशाली वाईन्स, व्हरायटी वाईन्स ...
१२ ऑक्टोबर पर्यंत राज्यातील काही भागात वादळी पाऊस; हवामान खात्याची माहिती 
महाराष्ट्र, मोठी बातमी

१२ ऑक्टोबर पर्यंत राज्यातील काही भागात वादळी पाऊस; हवामान खात्याची माहिती

मुंबई (लोकमराठी) : १२ ऑक्टोबर पर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागात दुपार नंतर ढगाळी हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. नाशिक सह खान्देश आणि औरंगाबाद जिल्ह्यात ८ तारखेपर्यंत काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघ-गर्जनेसकट पावसाची शक्यता आहे, तर नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही भागात १२ तारखेपर्यंत मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यांसह उर्वरित मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती ११ तारखे पर्यंत राहील, तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागात १२ तारखेपर्यंत काही प्रमाणात ढगाळी हवामान आणि मेघ गर्जनेसकट पाऊस पडेल. वादळी पावसाची तीव्रता, कालावधी आणि क्षेत्र अधिक नसल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. या हवामानाच्या स्थितीनुसार त्...
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ३ हजार २३९ उमेदवार
महाराष्ट्र, मोठी बातमी

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ३ हजार २३९ उमेदवार

पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वात कमी उमेदवार निवडणूक लढणार- अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती मुंबई (लोकमराठी) : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यात 288 मतदारसंघात 1 हजार 504 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले असून एकूण 3 हजार 239 उमेदवार निवडणूक रिेंगणात आहेत. सर्वात जास्त 246 उमेदवार पुणे जिल्ह्यातून तर सर्वात कमी 23 उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. दरम्यान शनिवारी झालेल्या छाननीअंती 4 हजार 743 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातून 1 हजार 504 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. नंदूरबार जिल्ह्यात 4 मतदारसंघात 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. धुळे जिल्ह्यात 5 मतदारसंघात 38 उमेदवार, जळगाव जिल्ह्यात 11 मत...
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी १ हजार ४२३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल
महाराष्ट्र, मोठी बातमी

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी १ हजार ४२३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांची माहिती मुंबई (लोक मराठी) : विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी राज्यात विविध मतदारसंघांमध्ये १ हजार ४२३ उमेदवारांनी १ हजार ९६९ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आजपर्यंत एकूण १ हजार ७९२ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांनी दिली. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या ४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत आहे नंदुरबार जिल्ह्यात आज ४ मतदारसंघात १५ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली. धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात १६ उमेदवार, जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात ५२ उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात २६ उमेदवार, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात ३४ उमेदवार, वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात १५ उमेदवार, अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात ३९ उमेदवार, वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात २० उमेदवार, ...
मतदान तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई
महाराष्ट्र, मोठी बातमी

मतदान तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई

लोक मराठी : राज्यातील विधानसभा निवडणूक प्रक्रिया खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई तथा कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तशा सूचना दिल्या आहेत. मतदान २१ ऑक्टोबर रोजी आणि मतमोजणी २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. संबंधित नियमानुसार मतदानाची वेळ संपण्यापूर्वी ४८ तास अगोदरपासून ते मतदानाची वेळ संपण्यापर्यंत तसेच मतमोजणीचा संपूर्ण दिवस मद्य विक्रीसाठी कोरडा दिवस म्हणून पाळणे अनुज्ञप्तीधारकांवर बंधनकारक असणार आहे. सर्व संबंधित घाऊक व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्तीधारकांना या काळात त्यांच्या अनुज्ञप्ती बंद ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित अनुज्ञप्तीधारक या निर्देशाचे कडक पालन करतील याची दक्षता घेण्यात यावी. तसेच आवश्यकता असल्यास संशयित अनुज्ञप्तीधारकांच्या अनुज्ञप्त्या मतदान संपण्याच्या ४८...
बलुतेदार, आलुतेदार, भटके विमुक्तांचा उद्या राज्यस्तरीय मेळावा
महाराष्ट्र

बलुतेदार, आलुतेदार, भटके विमुक्तांचा उद्या राज्यस्तरीय मेळावा

लोक मराठी : बारा बलुतेदार, अठरा आलुतेदार, भटके विमुक्त, ओबीसी, एसबीसी यांचा राज्यस्तरीय मेळावा उद्या (शुक्रवार, दि. २०) सकाळी १० ते ३ वाजता कोथरूड-कर्वे चौक (पुणे) येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती महाराष्ट्र बाराबलुतेदार महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष विशाल जाधव यांनी दिली असून या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असेही आवाहन जाधव यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, तर कार्यक्रमाचे उद्घाटक ओबीसी नेते तथा बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच शेकापाचे नेते जयंत पाटील, शब्बीर अन्सरी, बाळासाहेब मिसाळ, आमदार बच्चू कडू, कपिल पाटील, संदेश चव्हाण, प्रतापराव गुरव, सतिष कसबे, दशरथ राऊत, दत्तात्रय चेचर, चंद्रकांत गवळी, मारूती कदम, साहेबरावज...
कादंबरीकार किरण नगरकर यांचे निधन
महाराष्ट्र, मोठी बातमी

कादंबरीकार किरण नगरकर यांचे निधन

मुंबई (लोकमराठी ) : कादंबरीकार किरण नगरकर यांचे आज (ता. ५) निधन झाले. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६७ वर्षाचे होते. किरण नगरकर हे मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिणारे आधुनिक लेखक, नाटककार, समीक्षक होते. किरण नगरकरांची पहिली कादंबरी अभिरुची नावाने १९६७-६८च्या सुमारास प्रसिद्ध झाली होती. नंतर तीच 'सात सक्कं त्रेचाळीस ' या नावाने मौज प्रकाशनाने १९७४ला प्रकाशित केली. मराठीतील महत्त्वाच्या कादंबर्‍यांमध्ये हिची गणना होते. मोजक्याच कादंबर्‍या लिहून नगरकर अत्यंत लोकप्रिय असे कांदबरीकार म्हणून ओळखले जायचे. 'रावण आणि एडी ही त्यांची कादंबरी इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. नगरकरांच्या 'गॉड्स लिटल सोल्जर, ककल्ड या पुस्तकांनी मराठी आणि इंग्रजीत नवे विचार मांडले. २००१ला ककल्ड या पुस्तकासाठी नगरकरांना साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरविण...
मुंबईत ३८ हेक्टर क्षेत्रात कांदळवन उद्यानाची निर्मिती; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती 
महाराष्ट्र, मोठी बातमी

मुंबईत ३८ हेक्टर क्षेत्रात कांदळवन उद्यानाची निर्मिती; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई (लोकमराठी) : मुंबई येथे ३८ हेक्टर क्षेत्रात दोन कांदळवन उद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे. यापैकी गोराई येथे ८ हेक्टर क्षेत्रावर २६.९७ कोटी रुपये खर्चून तर दहिसर येथे ३० हेक्टर क्षेत्रावर ४८.८० कोटी रुपये खर्चून कांदळवन उद्यान विकसित केले जात असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. गोराई कांदळवन गोराई कांदळवन उद्यानात निसर्ग परिचय केंद्र, मँग्रो ट्रेल, पक्षी निरीक्षण मनोरा, स्थानिकांमार्फत होडी पर्यटन, यासारखी कामे प्रस्तावित असून २०२१ च्या दीपावलीच्या आधी हा प्रकल्प पर्यटकांसाठी उपलब्ध होईल यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीने निधी उपलब्ध करून दिला आहे. दहिसर कांदळवन दहिसर कांदळवन उद्यानाला प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कांदळवनाची जैवविविधिता खूप मोठी असून येथे कांदळवनाच्या ११ प्रजाती आढळतात. त्यामुळे संशोध...
शिरपूर दुर्घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी करणार – कामगारमंत्री डॉ. संजय कुटे यांची घोषणा
महाराष्ट्र

शिरपूर दुर्घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी करणार – कामगारमंत्री डॉ. संजय कुटे यांची घोषणा

मुंबई (लोकमराठी) : धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे रसायन कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांबद्दल कामगारमंत्री डॉ. संजय कुटे यांनी तीव्र शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. या घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी केली जाईल. संबंधित फॅक्टरी मालक व विभागाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे (DISH) अधिकारी यांचीही चौकशी करून यात जे कुणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा कामगारमंत्री डॉ. कुटे यांनी केली. शिरपूर येथे झालेल्या दुर्घटनेची आणि येथे झालेल्या कामगारांच्या मृत्यूची राज्य सरकार आणि कामगारमंत्री डॉ. कुटे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मृतांच्या परिवाराला शासनाकडून 5 लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले आहे. परंतु या कारखान्याच्या शेजारी लोकवस्ती होती. त्यामुळे या घटनेतील मृतांच्या परिवाराला संबंधित कंपनीच्या मालकाकडूनही प्रत्येकी 5 ल...
निवडणूक सुधारणा ही निरंतर चालणारी प्रक्रिया : राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया
महाराष्ट्र, मोठी बातमी

निवडणूक सुधारणा ही निरंतर चालणारी प्रक्रिया : राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया

‘राज्य निवडणूक आयोग : रौप्य महोत्सवी वाटचाल’चे पुण्यात प्रकाशन पुणे (लोकमराठी): निवडणूक सुधारणा ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने विविध सुधारणा हाती घेतल्या आहेत. या सुधारणांच्या माध्यमातून निर्भय, मुक्त व पारदर्शक निवडणुका पार पाडणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे केले. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या २५ वर्षपूर्तीनिमित्त ‘राज्य निवडणूक आयोग : रौप्य महोत्सवी वाटचाल’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे प्रकाशन श्री. सहारिया यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे यावेळी उपस्थित होत्या. श्री. सहारिया यांचे 'निवडणूक सुधारणा आणि स्थानि...