महाराष्ट्र

मराठीत रिपोर्ताज करणाऱ्या स्वतंत्र पत्रकारांसाठी फेलोशिप
महाराष्ट्र

मराठीत रिपोर्ताज करणाऱ्या स्वतंत्र पत्रकारांसाठी फेलोशिप

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ७ ऑगस्ट २२ मुंबई : समाजात होत असलेले परिवर्तन आणि प्रत्येक क्षेत्रात घडणाऱ्या घटनांवर बारीक लक्ष ठेवणे ही पत्रकारांची जबाबदारी आहे. घटनांची माहिती देण्याबरोबरच बातमीच्या खोलात जाऊन माहिती मिळवणे, लोकांच्या समस्या आणि सर्वसमावेशक लोकशाहीसाठी आवश्यक गोष्टींचे पालन होते आहे की नाही यावर लक्ष ठेवणे, नागरीकांचे मानवी आणि मूलभूत हक्क यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करणे, जनहिताबाबत सरकारचे अपयश अधोरेखित करणे, व्यवस्थेला प्रश्न विचारणे, आरोग्य, कृषी आणि राजकारण ते पर्यावरण क्षेत्रात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांचे सखोल वार्तांकन करणे, अशा अनेक जबाबदाऱ्या पत्रकारांना पार पाडाव्या लागतात. या कामात स्वतंत्र पत्रकारांना मदत करण्यासाठी नॅशनल फाउंडेशन ऑफ इंडिया (NFI) मीडिया फेलोशिपचे पाचवे पर्व सादर करीत आहे. या फेलोशिपच्या पहिल्या पर्वात NFI ने देशातील 21 सर्व...
AHMEDNAGAR : कर्जत तालुक्यातील चांदे, मुळेवाडी, कोंभळीत अवैध दारू विक्री जोरात | राज्य उत्पादन शुल्क विभाग व एसपी ऑफिसपर्यंत पोहचतो हप्ता
महाराष्ट्र, मोठी बातमी

AHMEDNAGAR : कर्जत तालुक्यातील चांदे, मुळेवाडी, कोंभळीत अवैध दारू विक्री जोरात | राज्य उत्पादन शुल्क विभाग व एसपी ऑफिसपर्यंत पोहचतो हप्ता

संग्रहित छायाचित्र अहमदनगर : कर्जत तालुक्यातील चांदे बुद्रुक, मुळेवाडी, कोंभळी गावात राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीसांच्या आशीर्वादाने अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे येथील शेतकरी, शेतमजूर देशोधडीला लागला असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या अवैध धंद्यांचा पोलिस अधिक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयापर्यंत हप्ता पोहचत असल्याचे सांगितले जात आहे. गावातच हात भट्टी, देशी विदेशी दारू उघडपणे मिळत असल्याने तरूण पिढी त्याकडे आकर्षित होत आहे. तर कौटुंबिक वाद, हिंसाचार वाढला असून बऱ्याच जणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे सामाजिक शांतता भंग पावत आहे. अहमदनगर पोलीस आणि हप्ता वसूली नवीन नाही. या आधी अहमदनगर पोलीसांची हप्ते वसूली चव्हाट्यावर आली होती. अवैध दारू विक्री होणारी (Chande Bk, Mulaywadi, Kombhali) ही गावे कर्जत पोलीसांच्या...
हिंदुत्व विचारासाठी सत्ता परिवर्तन झाले ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन
महाराष्ट्र, राजकारण

हिंदुत्व विचारासाठी सत्ता परिवर्तन झाले ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन

मुंबई, ता २३ : हिंदुत्व विचाराच्या रक्षणासाठी राज्यात सत्ता परिवर्तन झाले असून बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचे खरे वारसदार भाजपा बरोबर आले आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शनिवारी पनवेल येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोप प्रसंगी केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात निर्माण झालेला विकासाचा अनुशेष त्वरेने पूर्ण करून महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवू, असा विश्वासही श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, प्रदेश प्रभारी सी.टी.रवी, सह प्रभारी ओमप्रकाश धुर्वे व जयभान पवैय्या, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेश सरचिटणीस आ. श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiya) आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. श्री. फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी ...
कोल्हापूरात कळंब्यातील वटवृक्षाला मिळाले जीवनदान
महाराष्ट्र

कोल्हापूरात कळंब्यातील वटवृक्षाला मिळाले जीवनदान

कोल्हापूर : कळंबा तलाव परिसरात अतिवृष्टीमुळे शुक्रवारी (ता. १५) उन्मळून पडलेल्या वटवृक्षाला आज निसर्गप्रेमींच्या मदतीमुळे जीवनदान मिळाले. या वटवृक्षाबाबत अभिनेते व सह्याद्री देवराईच्या सयाजी शिंदे यांनी कोल्हापूरातील निसर्गप्रेमींना हाक दिली, व बघता बघता ही बातमी कळताच कोल्हापूर परिसरातील निसर्गप्रेमी एकत्र आले. सुहास वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व कळंबा ग्रामपंचायतीचे सरपंच सागर भोगम, निसर्गमित्र परितोष उरकुडे, प्रशांत साळुंखे, अभिजीत वाघमोडे, अमर गावडे, मनीषा ससे, डॉ. सुधीर ससे, समरजीत नाईक यांनी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम व संजय घोडावत ग्रुप टीम यांच्या सहकार्याने उन्मळून पडलेले हे वडाचे झाड योग्य टेक्निकल पद्धतीने अगदी कमी वेळात पुनरोपण (Replant) केले. ...
रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी तर्फे वारकऱ्यांची आरोग्य तपासणी
सामाजिक, महाराष्ट्र

रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी तर्फे वारकऱ्यांची आरोग्य तपासणी

कर्जत, ता. ५ (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ कर्जत (Karjat) सिटीच्या वतीने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सोमवारी (ता. ४) श्री आशितोष महादेव पायी दिंडी ही कर्जतहुन पंढरपूरकडे प्रस्थान करीत असताना कर्जत तालुक्यातील धांडेवाडी येथे मुक्कामी होती. रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे सचिव प्रा. सचिन धांडे यांच्याकडे पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने सर्व वारकऱ्यांचे आरोग्य तपासणी घेण्यात आली. यात एकूण १५० वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणीसाठी रोटरीयन डॉ. विजयकुमार चव्हाण डॉ. अद्वैत काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे नूतन अध्यक्ष अभयकुमार बोरा, सचिव प्रा. सचिन धांडे माजी अध्यक्ष इंजि. रामदास काळदाते, माजी सचिव राजेंद्र जगताप, माजी अध्यक्ष प्रा. विशाल म्हेत्रे, दयानंद पाटील, संदीप गदादे, सदाशिव फरांडे...
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

मुंबई, ३० : महाराष्ट्राचे ३० वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज पद व गोपनीयतेची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी श्री. शिंदे आणि श्री. फडणवीस यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रगीतानंतर श्री. शिंदे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाचा उल्लेख करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सोहळ्यास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांच्यासह सर्वश्री प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, प्...
संविधानाचा अपमान व अंधश्रध्दा पसरवल्याबद्दल या महिला पोलीसांवर गुन्हा दाखल होऊ शकतो?
महाराष्ट्र

संविधानाचा अपमान व अंधश्रध्दा पसरवल्याबद्दल या महिला पोलीसांवर गुन्हा दाखल होऊ शकतो?

पुणे : महिला पोलीसांनी वटपोर्णिमेला वडाच्या झाडाची पुजा केली असल्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. मात्र, यामुळे संबंधित महिला पोलीस अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, महाराष्ट्र पोलीस खात्याच्या शासकीय गणवेशात या महिला पोलीसांनी संविधानाचा अपमान केला असून गणवेशात अंधश्रद्धा पसरवण्याचे काम केले आहे. असा आरोप विनायक कांडाळकर यांनी केला आहे. विनायक कांडाळकर यांनी म्हटले आहे की, संविधानाने धार्मिक स्वातंत्र्य तुम्हाला घरात दिले आहे. तुम्ही शासकिय गणवेशात विशीष्ट एका धर्माचा कार्यक्रम करु शकत नाही. कारण तुम्ही पोलिस भरती झाल्यानंतर संविधानाचे पालन करण्याची व धर्मनिरपेक्ष काम करण्याची जाहीर शपथ घेतली आहे. आणि आज आपण शासकिय वर्दीमध्ये वटपोर्णिमेला वडाच्या झाडाची पुजा करुन आपण विशीष्ट एका धर्माचे पालन करत असल्याचे वर्दीतील फोटो टाकून साक्ष दिली आहे. आपण केवळ वर्दीचाच अपमान...
सर्वांसाठी पाणी या बरोबरच सर्वांसाठी आरोग्य हा उपक्रम सुरू करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र

सर्वांसाठी पाणी या बरोबरच सर्वांसाठी आरोग्य हा उपक्रम सुरू करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सर्वांसाठी पाणी’ धोरणाचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई, ता. 7 : मुंबई महानगरपालिका देशात सर्वोत्तम महानगरपालिका आहे. सर्वांसाठी पाणी या धोरणाच्या माध्यमातून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक माणसाला हक्काचे पाणी मिळणार आहे. सर्वांसाठी पाणी हे धोरण राबवणारी मुंबई महानगरपालिका देशात पहिली महानगरपालिका आहे. सर्वांसाठी पाणी या बरोबरच सर्वांसाठी आरोग्य हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यान, नागरी निवारा परिषद गोरेगांव येथे बृहन्मुंबई महानगरपालिका परिसरातील सर्व निवासी रहिवाशांसाठी असणाऱ्या “सर्वांसाठी पाणी” धोरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम श...
नैसर्गिक इंधनाचा वापर काटकसरीने करणे ही काळाची गरज – अन्न,नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ
महाराष्ट्र

नैसर्गिक इंधनाचा वापर काटकसरीने करणे ही काळाची गरज – अन्न,नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि.२९ :- कच्च्या तेलाचा कमी होत चाललेला साठा, इंधन खरेदीसाठीचे परावलंबित्व आणि वाढते तापमान या सर्व पार्श्वभूमीवर इंधन बचत ही काळाची गरज बनली असून इंधनाचा वापर काटकसरीने करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले. येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA),पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने सक्षम-२०२२ (संरक्षण क्षमता महोत्सव) हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला अर्जुन पुरस्कार प्राप्त श्रीराम भावसार, भारत पेट्रोलियमचे कार्यकारी संचालक पी. के. रामनाथन, ओ ॲन्ड एम गेलचे कार्यकारी संचालक शालिग्राम मोवर, पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA) चे पश्चिम विभ...
मुंबईत महाराष्ट्र दिन समारंभाची रंगीत तालीम
महाराष्ट्र

मुंबईत महाराष्ट्र दिन समारंभाची रंगीत तालीम

मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र राज्याच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त 1 मे रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण होईल. सामान्य प्रशासन (राजशिष्टाचार) विभागामार्फत महाराष्ट्र दिनाचा हा समारंभ आयोजित करण्यात आला असून आज या कार्यक्रमाची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव भरत गावडे यांनी ध्वजारोहण केले. आज झालेल्या रंगीत तालमीत अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुप कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) एस. जयकुमार, राजशिष्टाचार विभागाचे संबंधित अधिकारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. रंगीत तालमीत झालेल्या संचलनात संचलन प्रमुख अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त दत्ता नलावडे, संचलन उप प्रमुख सायबर क्राईम चे सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव, ध्वजाधिकारी सशस्त...