महाराष्ट्र

१८ फेब्रुवारी रोजी मराठ्यांची गौरवगाथा महानाट्याचे आयोजन
महाराष्ट्र

१८ फेब्रुवारी रोजी मराठ्यांची गौरवगाथा महानाट्याचे आयोजन

रायगड, दि.४ (लोकमराठी) - १८ फेब्रुवारीला "मराठ्यांची गौरवगाथा" महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.(निर्मित/ लिखित/ दिग्दर्शित )प्रवीण नंदकुमार देशमुख यांनी शिवदुर्ग मित्र प्रस्तुत "मराठ्यांची गौरवगाथा" या महानाट्याची अधिकृत घोषणा केली. २फेब्रुवारी १६६१ रोजी कर्तलबखानाच्या बलाढ्य सैन्याचा छत्रपती शिवाजी महाराज व सरनोबत नेताजी पालकर यांच्या सैन्याने गनिमी कावा या युद्धनीतीने संपूर्ण पराभव केला त्यांना शरणागती पत्करायला लावली व शिवाजी महाराजांचा मोठा विजय झाला म्हणूनच २फेब्रुवारी हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो, यावर्षी ३६२ वा विजय दिन सोहळा उंबरखिंडीमध्ये साजरा करण्यात आला. याचे आयोजन पंचायत समिती खालापूर, जिल्हा परिषद, तसेच शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले याच दिवसाचे औचित्य साधून शिवदुर्ग मित्र प्रस्तुत प्रवीण नंदकुमार देशमुख (नि...
श्री नगद नारायण, गोसावी बाबा शेतकरी ग्रामविकास पॅनलचा एकतर्फी विजय
महाराष्ट्र

श्री नगद नारायण, गोसावी बाबा शेतकरी ग्रामविकास पॅनलचा एकतर्फी विजय

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क हाजीपुर, बीड (दि. 20 डिसेंबर) : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज सर्वत्र जाहीर झाले. विजय उमेदवारांचे गुलाल, ढोल-ताशे आणि डीजेच्या आवाजामध्ये सर्वत्र आनंद उत्सव आणि जल्लोषात स्वागत होत आहे. याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील हाजीपुर गावची ग्रामपंचायत निवडणूक ही मोठ्या उत्साहात पार पडली. देशाच्या स्वातंत्र्यापासून ते आज पर्यंत गावची ग्रामपंचायत ही बिनविरोध म्हणून गणली जात होती. परंतु या पंचवार्षिक निवडणुकीला पहिल्यांदाच दोन पॅनल गावामध्ये पडले आणि प्रथमच निवडणूक गावामध्ये झाली. श्री नगद नारायण गोसावी बाबा शेतकरी ग्रामविकास पॅनल आणि श्री गोसावी बाबा ग्रामविकास पॅनल या दोन पॅनल मध्ये काट्याची टक्कर झाली. आणि यामध्ये श्री नगद नारायण गोसावी बाबा शेतकरी ग्रामविकास पॅनल चे सर्वच्या सर्व उमेदवार हे मोठ्या फरका...
दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी केला विवाह ; हे आहे कारण… 
महाराष्ट्र, मोठी बातमी

दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी केला विवाह ; हे आहे कारण…

लोकमराठी न्यूज नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी विवाह केलाय. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एकाच मुलासोबत, एकाच वेळी सख्ख्या बहिणींच्या या आगळ्या वेगळ्या लग्नाची आता सोशल मीडियावर चर्चा होतीये. शुक्रवारी अकलूज-वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे हा अनोखा विवाह संपन्न झालाय. अतुल हा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील असून त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. तर कांदिवली मधील उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी आहेत. सहा महिन्यांपूर्वी पिंकी, रिंकी आणि त्यांची आई आजारी पडल्यानंतर अतुल नावाच्या टॅक्सी ट्रॅव्हल करणाऱ्या युवकाने रुग्णालयात त्यांची काळजी घेतली होती. यातून त्यांचे प्रेम जुळले आणि नातेवाईकांच्या संमतीने काल हा विवाह अकलूज मध्ये पार पडला. इंजिनीअर पदावर कार्यरत अ...
अहमदनगर : अकोले तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करा 
महाराष्ट्र, मोठी बातमी

अहमदनगर : अकोले तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करा

अहमदनगर : Ahmednagar जिल्ह्यातील राजूर, शाहूनगर आणि अकोले (Akole) तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करावी व शाहूनगर व राजूरला पोलीस अधीक्षकांनी भेट द्यावी. यासाठी आज अहमदनगर येथे पोलीस अधिक्षक राकेश ओला (Rakesh Ahla) यांना सामाजिक कार्यकर्ते व लेखक हेरंब कुलकर्णी (Herambh Kulkarni) यांनीनिवेदन दिले. सोबत सावली संस्थेचे नितेश बनसोडे होते. यावेळी कुलकर्णी यांनी तालुक्यात होणारी अवैध विक्री, रात्रीची चोरटी वाहतुक याविषयी त्यांना माहिती दिली. राजूर येथील दारू विक्रेत्यांना मदत करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करा, बिट अंमलदार यांना तालुक्यात जबाबदार धरा. अशी मागणी यावेळी कुलकर्णी यांनी केली, सोबत सावली संस्थेचे नितेश बनसोडे होते. ...
अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? – जयंत पाटील
महाराष्ट्र, मोठी बातमी

अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? – जयंत पाटील

मुंबई, दि. २८ ऑक्टोबर : गुजरात (Gujarat) निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. आमचा महाराष्ट्र (Maharashtra) कुठे नेऊन ठेवणार आहात ? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress party) प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे सरकारला केला आहे. वेदांता फोक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात (Nagpur) येणारा एअरबस प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प आज गुजरातला गेला. एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्ली...
वीज चोरी करणाऱ्यांविरोधात भर जहागिर येथे मोठी कारवाई
महाराष्ट्र

वीज चोरी करणाऱ्यांविरोधात भर जहागिर येथे मोठी कारवाई

रिसोड: आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या नागरिकांवर महावितरणानं कारवाईचा बडगा उगारला आहे. रिसोड तालुक्यातील भरजहागिर येथे महावितरण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रविण कुमार जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड ग्रामणीचे सहाय्यक अभियंता हरिष गिर्हे यांनी (दि.11) रोजी भरजहागिर येथे विज मिटर तपासणी आणि विज चोरी उघडकीस आणि आहे. वीज अधिनियम २००३ कलम १३५ अन्वये सतरा जणांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये गजानन नारायण मुरकुटे, श्रीराम पुंजाजी फुके, शंकर रुजाजी फुके, जगन्नाथ नारायण चोपडे, प्रल्हाद विठ्ठल चोपडे, बाळकृष्ण रामाजी चोपडे, बळीराम सिताराम चोपडे, अर्जुना तुळशीराम काळदाते, आत्माराम नारायण तायडे, रंगनाथ शिवराम सानप, भगवान बाजीराव सानप, नारायण हरिभाऊ सानप, राजू मोहन डहाके, सुधाकर विश्वनाथ जिरवणकर, भगवान शभुआप्पा पतवार, मोरया दुध डेअर (महाजन) गज...
आधी प्रकल्पाची जागा दाखवा, मगच आंदोलन करा | आदित्य ठाकरेंना भाजपचे आव्हान
महाराष्ट्र

आधी प्रकल्पाची जागा दाखवा, मगच आंदोलन करा | आदित्य ठाकरेंना भाजपचे आव्हान

मुंबई : घराण्याच्या वारशातून शिवसेनेचे नेतेपदाची माळ गळ्यात पडलेले आदित्य ठाकरे यांच्या वेदान्ता फॉक्सकॉन प्रकल्पाविषयीच्या आक्रोशाचे पितळ येत्या शनिवारी ते स्वतःच उघडे करणार आहेत. या प्रकल्पाबाबत ठाकरे सरकारने अडीच वर्षात काहीही प्रयत्न केले नसल्याचा पुरावा आदित्य ठाकरे स्वतःच येत्या शनिवारी तळेगावजवळ आयोजित केलेल्या आंदोलनातून देणार असल्याने त्यांच्या आंदोलनाची महाराष्ट्र वाटच पाहात आहे, अशी खोचक टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली. मतदारांचा कौल खुंटीवर टांगून फसवणुकीने मिळविलेली सत्ता आणि प्रकल्पाच्या वाटाघाटींचा वाटा या दोन्ही बाबी हातून गेल्याने ठाकरे पितापुत्रांना नैराश्याने ग्रासले आहे. तळेगावजवळ जेथे हा प्रकल्प येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे, त्याबाबत साधा सामंजस्य करारदेखील ठाकरे सरकारने केलाच नसल्याचे स्पष्ट झाल...
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणार्‍या घोटाळ्याचा तपास अहवाल दाबला 
महाराष्ट्र

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणार्‍या घोटाळ्याचा तपास अहवाल दाबला

1826 कोटींचा 'मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती घोटाळा’ करणार्‍या 64 शैक्षणिक संस्थांवर गुन्हे दाखल का होत नाहीत? - अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर लोकमराठी न्यूज नेटवर्क : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षणासाठी केंद्र सरकारकडून देण्यात येणार्‍या शिष्यवृत्तीमध्ये वर्ष 2017 मध्ये झालेला 1 हजार 826 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता; मात्र आजही त्याची चौकशी ‘चालू’च असल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे पैसे खाणार्‍या 64 शैक्षणिक संस्थांची नावे का लपवली आहेत ? काहींकडून वसूली झाली, तर गुन्हे दाखल का केले नाहीत ? चौकशी अहवालावर निर्णय का होत नाहीत ? असे प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच हे प्रकरण आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे हस्तांतरीत करावे, *अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेने महाराष्ट्र शासनाच्...
ठाण्यातील सावरकर नगरमध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
महाराष्ट्र

ठाण्यातील सावरकर नगरमध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

ठाणे : श्री योगा सेवा प्रतिष्ठान सावरकर नगर ठाणे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमाने संपन्न झाला. सर्व प्रथम झेंडा वंदनाचा कार्यक्रम करण्यात आला, श्री योगा सेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुनीता श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठानच्या साईबाबा यांच्या नवीन देव्हाऱ्याचे ह्यावेळी उदघाटन करण्यात आले. अनिता गुप्ता, सुषमा गुप्ता यांनी देशभक्तीपर गीते गायली, माजी रेल्वे पोलीस पवन सिंग यांनी स्वातंत्र्याची महती सांगणारे भाषण केले. नगरसेवक दिलीप बारटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच व्यावसायिक अंकुश जोष्टे यांनीही कार्यक्रमास हजेरी लावली. अध्यक्षा सुनीता श्रीवास्तव, उपाधक्ष्या विनिता राजन,खजिनदार वैशाली सावंत, सभासद पांकजम शाशिधरण, सिधार्थी पुजारी, सुमा सुब्रमण्यम, कांचन पावसकर, अनिता गु...
SINDHUDURG : संदेश पत्रांमुळे तळेरे गावाला सांस्कृतिक चेहरा मिळाला
महाराष्ट्र

SINDHUDURG : संदेश पत्रांमुळे तळेरे गावाला सांस्कृतिक चेहरा मिळाला

संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांचा गौरव करताना कवी अजय कांडर, ऍड विलास परब, राजेश कदम, ऋषिकेश मोरजकर पत्रसंग्राहक निकेत पावसकर गौरव सोहळ्यात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन | पावसकर यांच्या प्रकट मुलाखतीलाही प्रतिसाद सिंधुदुर्ग-तळेरे : एखाद्या गावाला सांस्कृतिक चेहरा प्राप्त होण्यासाठी त्या गावातील सांस्कृतिक कार्यकर्त्यांच योगदान महत्त्वाचं असतं. तळेरे गावाला संदेश पत्रसंग्राहक म्हणून महाराष्ट्रात ख्याती मिळविलेल्या निकेत पावसकर यांच्यामुळे तळेरे गावाला स्वतंत्र सांस्कृतिक चेहरा प्राप्त झाला. अशा गावच्या गुणी कलावंताला गावानेही जपायला हवे. तळेरे गाव पावसकर यांच्यासारख्या गुणी कलावंतावर प्रेम करून याचीही प्रचिती देत आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी येथे केले. किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे श्री पावसकर यांचा गौरव समारंभ तळेरे येथील 'अक्षरघर' येथे...