राष्ट्रीय

National News Marathi

Apple iPhone 16e : अ‍ॅपल कंपनीचा स्वस्तातील आयफोन लाँच
राष्ट्रीय, मोठी बातमी

Apple iPhone 16e : अ‍ॅपल कंपनीचा स्वस्तातील आयफोन लाँच

Apple iPhone 16e launched In India : जगातील लोकप्रिय कंपन्यांपैकी एक असलेल्या ॲपल कंपनीने आयफोन १६ ई (iPhone 16e) भारतात लाँच केला आहे. तसेच खास गोष्ट म्हणजे आयफोन स्वस्तात मिळावा अशी ग्राहकांची इच्छा आता पूर्ण होणार आहे. कारण आयफोन १६ सीरिजमधील iPhone 16e हा फोन सगळ्यात स्वस्त असणार आहे. तर भारतात लाँच झालेल्या ॲपलच्या नवीन फोनची किंमत, फीचर्स आणि तुम्ही हा कधीपासून ऑर्डर करू शकणार आहात याबद्दल सविस्तर जाणून घेऊया… डिझाइन आणि डिस्प्ले: iPhone 16e मध्ये 6.1 इंचाचा OLED डिस्प्ले आहे, ज्याचा नॉच iPhone 14 सारखा आहे. हा डिस्प्ले 60 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 800 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. iPhone SE सीरिजमध्ये दिसणाऱ्या म्यूट स्विचऐवजी एक ॲक्शन बटण देण्यात आले आहे. ॲक्शन बटणद्वारे युजर्स कॅमेरा किंवा डू नॉट डिस्टर्ब मोड ॲक्टिव्ह करू शकतात. याव्यतिरिक्त फोनमध्ये यूएसबी-सी (USB...
Tamil Nadu Floods : बंगालच्या उपसागरावरील दबावामुळे तामिळनाडूत मुसळधार पाऊस
राष्ट्रीय, मोठी बातमी

Tamil Nadu Floods : बंगालच्या उपसागरावरील दबावामुळे तामिळनाडूत मुसळधार पाऊस

चेन्नई, ता. १८ : भारतीय हवामान खात्याने (IMD) नुकत्याच केलेल्या अंदाजानुसार तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये आणखी पावसाची शक्यता आहे. चेन्नई आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली असून लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. हवामान संस्थेने आपल्या ताज्या हवामान बुलेटिनमध्ये तमिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल परिसरात गुरुवारपासून रविवारपर्यंत एक किंवा दोन ठिकाणी गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. वेल्लोर, तिरुपत्तूर, कृष्णगिरी, धर्मपुरी, सेलम आणि इरोड जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान संस्थेने म्हटले आहे. चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यांतील अनेक भागात गुरुवारी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे पाणी साचल...
Lokmanya Tilak Award : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं पुण्यात गौरव
राष्ट्रीय

Lokmanya Tilak Award : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं पुण्यात गौरव

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२३ नं मंगळवारी पुण्यात (Pune) सन्मानित करण्यात आलं. दिपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो. (PM Modi awarded by Lokmanya Tilak National Award 2023) सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष दिपक टिळक आदी उपस्थित होते. असे पुरस्काराचं स्वरुप लोकमान्य टिळकांची ओळख असलेली पुणेरी पगडी, शाल, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि दैनिक केसरीचा पहिला अंक आणि प्रतिमा आणि १ लाख रुपये ...
Delhi flood: यमुना नदीच्या पातळीत वाढ; दिल्ली बुडाली
ताज्या घडामोडी, मोठी बातमी, राष्ट्रीय

Delhi flood: यमुना नदीच्या पातळीत वाढ; दिल्ली बुडाली

नवी दिल्ली : दिल्लीतील यमुना नदीचे पाणी सतत विकराल रूप धारण करित आहे. 46 वर्षांचा विक्रम मोडत पाण्याची पातळी 208 मीटरच्या पुढे गेली आहे. राजधानीतील सर्व सखल भाग पाण्यात बुडाला आहे. कश्मीरी गेट आयएसबीटीमध्ये अनेक फूट पाणी आहे. नेहमी गजबजणारा रिंगरोड सुनसान आहे. रिंगरोडवर यमुना नदीच्या पाण्यात उसळणाऱ्या लाटा आपल्याला समुद्राची आठवण करून देत आहेत. राजघाटापासून चांदगी राम आखाड्यापर्यंत ते पाण्यात बुडाले आहेत. दिल्लीतील सर्वात मोठे स्मशान बोधघाट बंद करण्यात आले आहे. त्यात अनेक फूट पाणी साचले आहे. https://youtu.be/lLG_PRuuFgw केंद्रीय जल आयोगानुसार हरियाणा बॅरेजमधून येणाऱ्या पाण्याची पातळी दुपारनंतर कमी होण्याची शक्यता आहे. दिल्लीचा लाल किल्ला देखील पाण्याखाली गेलाय. दिल्लीतील पूरसदृश परिस्थितीमुळे यमुनेच्या आसपासच्या भागातील शाळा रविवारपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. दिल्लीच्...
केरळमधील YouTubers चे वार्षिक उत्पन्न ₹2 कोटींपर्यंत ; प्राप्तिकर छाप्यांमध्ये 25 कोटींचा घोटाळा उघड
राष्ट्रीय, मोठी बातमी

केरळमधील YouTubers चे वार्षिक उत्पन्न ₹2 कोटींपर्यंत ; प्राप्तिकर छाप्यांमध्ये 25 कोटींचा घोटाळा उघड

मुंबई, ता. 27 : आयकर (आयटी) विभागाने केरळमधील कोची आणि कोझिकोड भागातील लोकप्रिय यूट्यूबर्सच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले आहेत. वृत्तानुसार, आयटी विभागाने शुक्रवारी दहा लोकप्रिय यूट्यूबर्सवर छापे टाकले. रिपोर्ट्सनुसार, आयकर विभागाकडे यूट्यूबर्सकडून गोळा केल्या जात असलेल्या कमाईबद्दल कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळेच आर्थिक माहिती गोळा करण्यासाठी विभागाने सर्वेक्षण म्हणून हा छापा टाकला. असे सांगण्यात येत आहे की या छाप्यामागे यूट्यूबर्सना आयकर नियमांची माहिती देणे हा आहे जेणेकरून करचुकवेगिरीच्या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये. या छाप्यात सुमारे 25 कोटींची करचोरी झाल्याचे विभागाला समोर आले. असे काही YouTubers होते ज्यांना अजिबात कर मिळाला नाही. विभागाकडून अशा यूट्यूबर्सना नोटीस बजावण्यात आली आहे. आयकर विभागाने केरळमध्ये यूट्यूबर्सच्या घरांवर छापे टाकले आहेत. त्या...
Infosys: आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसने आपल्या कर्मचार्‍यांना दिली एक अप्रतिम भेट, कर्मचार्‍यांना मिळाले हे मोठे बक्षीस
राष्ट्रीय, मोठी बातमी

Infosys: आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसने आपल्या कर्मचार्‍यांना दिली एक अप्रतिम भेट, कर्मचार्‍यांना मिळाले हे मोठे बक्षीस

Images Source : Google मुंबई, ता. 15 : आयटी कंपन्यांच्या कर्मचार्‍यांना त्यांच्या कंपनीकडून केवळ बोनस आणि प्रोत्साहनच मिळत नाही, तर काहीवेळा त्यांना त्यांच्या योगदानासाठी इक्विटी शेअर्सच्या स्वरूपात प्रोत्साहन देखील मिळते. देशातील आघाडीच्या आयटी कंपनी इन्फोसिसने (Infosys) असेच पाऊल उचलले आहे आणि आपल्या पात्र कर्मचाऱ्यांना 5.11 लाखांहून अधिक इक्विटी शेअर्सचे वाटप केले आहे. हे वाटप इन्फोसिसच्या दोन कर्मचारी संबंधित योजनांतर्गत करण्यात आले आहे आणि हे वाटप गेल्या आठवड्यात 12 मे रोजी झाले. इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना शेअर्स का दिले?इन्फोसिसने हे शेअर्स आपल्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत कारण काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल बक्षीस द्यायचे होते. याशिवाय कंपनीतील कर्मचाऱ्यांचे मालकी हक्क थोडे वाढले पाहिजेत, अशीही इन्फोसिसची इच्छा आहे. इन्फोसिसने 14 मे रोजी एका एक्सचेंज फाइलिंगमध्...
राज ठाकरे यांनी एलिझाबेथ २ यांना केले अभिवादन ; म्हणाले… 
राष्ट्रीय, मोठी बातमी

राज ठाकरे यांनी एलिझाबेथ २ यांना केले अभिवादन ; म्हणाले…

मुंबई, ता ९ : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (QueenElizabethII) ह्यांचं ७० व्या वर्षी निधन झाले. त्यांना जगभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराणी यांना अभिवादन केले असून त्यांच्या बद्दल मत व्यक्त केले आहे. राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांचं निधन झालं. ७० वर्ष त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. आणि ही ७० वर्ष कुठली? तर जगभरातून राजेशाही संपुष्टात आलेली असताना, जगभरात लोकशाहीचे वारे वेगाने वाहत असतानाची ७० वर्ष. युरोपमधली अनेक राजघराणी ही रक्तरंजित क्रांत्यांनी उलथवून टाकली गेली. पण ब्रिटनची राजेशाही टिकली ती ब्रिटिशांचा त्यांच्या परंपरांविषयी असलेला कमालीचा अभिमान आणि बदलाचे वारे समजून घेत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येण्याची तयारी, कधी नाईलाजाने तर कधी आनंदाने दाखवलेल्या रा...
सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते ईडीच्या रडारवर - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय, मोठी बातमी

सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते ईडीच्या रडारवर - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

पिंपरी : केंद्र सरकार (Central government) विरोधकांना विविध केंद्रीय यंत्रणेद्वारे संपविण्याचा प्रयत्न करीत असून, सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते ईडीच्या (Enforcement directorate) रडारवर आहेत. अशावेळी ते स्वतःला वाचवतात कि, जनतेला हा मोठा प्रश्न आहे. असे मत बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पिंपरी येथे केले. पिंपरीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात शनिवारी (ता. ६) सकाळी ११ वाजता मुस्लिम समाजाच्या स्थानिक प्रश्नांविषयी संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शहरातील मुस्लिम बांधवांशी मोकळा संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. अ‍ॅड. आंबेडकरांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केल्याने अतिशय कमी वेळेमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला....
मध्यप्रदेशात आम आदमी पक्षाचा महापौर
राष्ट्रीय, मोठी बातमी

मध्यप्रदेशात आम आदमी पक्षाचा महापौर

भोपाळ, ता १८ : दिल्ली, पंजाब नंतर आता इतर राज्यात आम आदमी पक्षाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. मध्यप्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) एक महापौरपद जिंकले आहे. राज्यातील ११ पैकी सहा ठिकाणी भाजपने महापौरपद जिंकले आहे. तर काँग्रेसला तीन ठिकाणी विजय मिळवला आहे. सिंगरौली येथील महापौरपदी आम आदमी पक्षाचा (Aap) उमेदवार विजयी झाला आहे. भाजपला इंदूर, बुऱ्हाणपूर, सतना, खंडवा, सागर तसेच उज्जैन येथे महापौरपदे जिंकता आली. काँग्रेसला ग्वाल्हेर, जबलपूर तसेच छिंदवाडा येथे महापौरपदी विजय मिळवता आला. छिंदवाडा हा कमलनाथ यांचा बालेकिल्ला तेथे काँग्रेसने आपला प्रभाव राखला. ग्वाल्हेरमध्ये मात्र, भाजपला (BJP) धक्का बसला आहे. गेल्या वेळी काँग्रेसला (Congress) एकही महापौरपद जिंकला आले नव्हते. त्यातुलनेत त्यांची कामगिरी चांगली झाली आहे....
वीज पडण्याची इशारा देणारे 'दामिनी ॲप' आपल्या मोबाईलमध्ये आहे ना?
मोठी बातमी, राष्ट्रीय

वीज पडण्याची इशारा देणारे 'दामिनी ॲप' आपल्या मोबाईलमध्ये आहे ना?

लातूर, ता. २७ : लातूर जिल्हा मराठवाड्यात वीज पडून दुर्घटना होण्यात दुसऱ्या स्थानी आहे. यावर उपाय शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या सहकार्याने अभ्यासगट स्थापन केला होता. त्या अभ्यासगटाचे सादरीकरण झाले असून अभ्यासगटाने सुचवलेल्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी तात्काळ करणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी सांगितले. वीज पडण्याच्या घटनेतील जीवितहानी कमी करण्यासाठी किंबहुना टाळण्यासाठी काही ठोस उपाययोजना सुरु आहेतच तथापि यावरचा एक उपाय म्हणजे पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकार यांनी वादळी पाऊस, वीजांच्या कडकडाटाचा अचूक अंदाजाची पूर्वसूचना नागरिकांना मिळावी, याकरिता 'दामिनी' ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून वादळी पाऊस, वीजांच्...