Lokmanya Tilak Award : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं पुण्यात गौरव
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२३ नं मंगळवारी पुण्यात (Pune) सन्मानित करण्यात आलं. दिपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो. (PM Modi awarded by Lokmanya Tilak National Award 2023)
सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष दिपक टिळक आदी उपस्थित होते.
असे पुरस्काराचं स्वरुप
लोकमान्य टिळकांची ओळख असलेली पुणेरी पगडी, शाल, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि दैनिक केसरीचा पहिला अंक आणि प्रतिमा आणि १ लाख रुपये ...