पिंपळे सौदागर येथील ”तिरंगा सन्मान यात्रेला” भरभरून प्रतिसाद; नागरिकांकडून पुष्पवृष्टी अनं स्वागत
''भारत माता की जय, वंदे मातरम, हम सब एक है'' अशा घोषणांनी परिसर दणाणला
राष्ट्रभक्तीची ज्योत कायम तेवत राहण्यासाठी सतत प्रयत्नशील - कुंदाताई संजय भिसे
पिंपरी, ता. १६ : देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन पिंपळे सौदागर परिसरात घरोघरी तिरंगा फडकवून मोठया उत्साहात अणि आनंदात साजरा करण्यात आला. प्रत्येक भारतीय नागरीकाला आपली देशभक्ती व्यक्त करण्यासाठी भाजपा चिंचवड विधानसभा महिला मोर्चा तथा उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांच्या वतीने १५ ऑगस्ट दिनी '' तिरंगा सन्मान यात्रे''चे आयोजन करण्यात आले होते.
देशभक्तीपर गीतांसह ठीक सकाळी १० वाजता पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकातून या यात्रेला प्रारंभ झाला. या यात्रेत जवळपास पाचशे नागरिक सहभागी झाले होते. ढोल-लेझीमच्या गजरात ठिकठिकाणी राष्ट्रध्वज तिरंगा आणि यात्रेचे नागरिकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. ७५ फुटी झेंड्याकडे पाहत ना...