छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
पिंपरी : शुक्रवारी (दि. १७ डिसेंबर) कर्नाटकमधील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांचा निषेध करण्यासाठी, आज शनिवारी (दि १८ डिसेंबर) पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व पुरोगामी व समविचारी संघटनांच्या वतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तीव्र निदर्शने, माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना मारुती भापकर म्हणाले की "महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनच कर्नाटक मधील जनतेने व सरकारांनी सतत महाराष्ट्राचा तिरस्कार केलेला आहे. या तिरस्काराचा एक भाग म्हणून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची विटंबना, कर्नाटक मधील काही समाजकंटकांनी केलेली आहे. कर्नाटक मधील भाजपसरकारचाही या समाजकंटकांच्या कृत्याला पाठिंबा असल्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठा...










