पर्यावरणप्रेमींचे वृक्षतोडी निषेधार्थ आंदोलन
निगडी, (लोकमराठी) : चिखली येथील गावठाणाच्या जागेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पासाठी त्या जागेतील सुमारे दोन हजार झाडे तोडली जात आहेत. निसर्गाचा ऱ्हास करून प्रकल्प उभारणीला स्थानिक नागरिक आणि लहान बालमंडळींनी विरोध केला आहे. याच्या निषेधार्थ ‘जगा व जगू द्या’ या अभियानांतर्गत लहान मुलांनी निषेध आंदोलन केले. यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते.‘जर एखादा देश अथवा तेथील नागरिक झाडांचा नाश करत असतील तर ते स्वतःचा नाश करत आहेत’, ‘राजकारणी, विकसक आणि अधिकारी वृक्ष लागवडीचे नियम बासनात बसवत आहेत, पालिकेचे निसर्ग संवर्धनाचे ढोंग’, ‘राजकारण्यांनो निसर्ग वाचवा अन्यथा आम्ही उद्याचे मतदार धीरे का झटका जोर से लगे’, ‘राजकीय स्वार्थासाठी पाणवठे बुजवले जात आहेत. त्याकडे का दुर्लक्ष होत आहे’, ‘दोन थेंब वापराच्या पाण्याचे कमी द्या! पण आमचे आरोग्य सदृढ ठेवा.वाढत्...










