पत्रकार निशा पाटील – पिसे यांची आत्महत्या
पिंपरी ( लोकमराठी ) :- पिंपरी- चिंचवड महिला पत्रकार संघाच्या माजी अध्यक्षा आणि दैनिक प्रभातच्या ज्येष्ठ पत्रकार निशा पाटील-पिसे यांनी गुरूवारी (ता. ३१) रात्री नऊच्या सुमारास नेहरूनगर येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू व अभ्यासू पत्रकार म्हणून त्या ओळखल्या जात. दैनिक केसरीतून त्यांनी पत्रकारितेच्या कारकिर्दीस सुरूवात केली होती. ‘लोकसत्ता’च्या ‘पिंपरी-चिंचवड अंतरंग’ पुरवणीसाठी त्या नियमित लेखन करायच्या. ‘एमपीसी न्यूज’मध्ये त्यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली. ‘एमपीसी न्यूज’च्या मुख्य वार्ताहर पदाची धुराही त्यांनी सक्षमपणे सांभाळली होती. पुढे ‘पीसीबी टुडे’च्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. शेवटी दैनिक ‘प्रभात’मध्ये उपसंपादक म्हणून त्या कार्यरत होत्या.
काल रात्री पावणेनऊ वाजता त्या कार्यालयातून घरी गेल्या. त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी खोलीचा दरवाजा आत...









