पिंपरी चिंचवड

गौराईच्या हाती चांद्रयानचा रिमोट; काळेवाडीतील भागवत कुटुंबियांचा देखावा (व्हिडीओ)
पिंपरी चिंचवड

गौराईच्या हाती चांद्रयानचा रिमोट; काळेवाडीतील भागवत कुटुंबियांचा देखावा (व्हिडीओ)

पिंपरी चिंचवड (लोकमराठी) : काळेवाडी येथील सुरेखा शंकरराव भागवत (रा. साई मल्हार कॉलनी, तापकीर नगर) यांनी आपल्या घरी गौरी गणपती निमित्त चांद्रयान- २ हा देखावा सादर केलेला आहे. यामध्ये रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने फिरणारे चांद्रयान दाखविण्यात आलेले असून गौरी या महिला शास्त्रज्ञांच्या स्वरुपात दाखविण्यात आल्या आहेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी चांद्रयानाचे प्रक्षेपण पाहताना दाखविण्यात आले आहेत. हा नैत्रदिपक देखावा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. संकल्पना धनश्री दिपक भागवत यांची असून निर्मिती दिपक शंकरराव भागवत यांनी केली आहे. तर हभप शंकरराव आनंदराव भागवत, ज्येष्ठ पत्रकार पदमाकर दत्तात्रय जांभळे यांनी मार्गदर्शन केले आहे. हा सुंदर देखाव्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. https://youtu.be/RtSHWpdOMp0...
राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘खानावळ’ आंदोलन
पिंपरी चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘खानावळ’ आंदोलन

महापालिका आयुक्तांच्या निषेधार्थ प्रवेशद्वारावर नगरसेवकांचा भोजन समारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भोजनाची पालिकेत केली होती व्यवस्था पिंपरी (लोकमराठी ) : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भोजनाची व्यवस्था गेल्या आठवड्यात महापालिका भवनात केली होती. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसने गुरुवारी (ता. ५) दुपारी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर 'आयुक्तांची खानावळ' आंदोलन केले. शहरातील प्रस्तावित व प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री गेल्या आठवड्यात महापालिकेत आले होते. त्या वेळी त्यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यापूर्वी आयुक्तांच्या दालनात भोजन केले. त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी विरोध केला व आयुक्तांच्या निषेधार्थ गुरुवारी दुपारी एक वाजता महापालिका प्रवेशद्वारावर 'खानावळ' आंदोलन केले. बिर्याणी व आमटी असा बेत ह...
महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची पालकमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची पालकमंत्र्यांकडे मागणी

Lok Marathi News Network पिंपरी (लोकमराठी) : पिंपरी चिंचवड महापालिकेत पारदर्शक सत्तेची हमी देऊन विराजमान झालेल्या भाजप सरकारच्या सत्ताकाळात सर्वाधिक भ्रष्टाचार झालेला आहे. याबाबत महानगरपालिकच्या भ्रष्ट पदाधिकारी, अधिकारी, ठेकेदार सल्लागारांच्या गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच भ्रष्टाचार प्रकरणाची फाईल त्यांनी पालकमंत्र्यांकडे दिली आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी “ना खाऊंगा, ना खाने दुंगा” ही घोषणा करून भ्रष्टाचार मुक्त भारत करू ही हमी जनतेला दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र ही घोषणा करीत पारदर्शक कारभाराची हमी दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन २०...
रावेतमध्ये पतीने केला पत्नीचा खून ; सुसाइड नोट लिहून केली आत्महत्या
पिंपरी चिंचवड

रावेतमध्ये पतीने केला पत्नीचा खून ; सुसाइड नोट लिहून केली आत्महत्या

पिंपरी (लोक मराठी ) : पिंपरी चिंचवड येथील रावेत याठिकाणी पत्नीचा हातोडीने खून करून पतीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.२८) सकाळी सव्वा आठच्या सुमारास उघडकीस आली आहे .कौटुंबिक जीवनातील ताणतणावाला वैतागून आत्महत्या केल्याचे समजते आहे. घटनास्थळी पोलीसांना सुसाइड नोट सापडली आहे. वृक्षाली गणेश लाटे (वय ४०, रा. आदित्य टेरेस, शिंदे वस्ती, रावेत), असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर पती गणेश ऊर्फ संजू चंद्रकांत लाटे (४५) यांनीही आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे चारच्या सुमारास गणेश यांनी आपल्या पत्नीचा हातोडी डोक्यात मारून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून पत्नी वृषाली या आजारी होत्या. आजारपणात त्यांना होणाऱ्या यातना सहन न झाल्याने त्यांचा खून करून आपण आत्महत्या करीत असल्याचे गणेश यांन...
दत्ता साने कार्यालय तोडफोड प्रकरण; आरोपीस अटक
पिंपरी चिंचवड

दत्ता साने कार्यालय तोडफोड प्रकरण; आरोपीस अटक

गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई पिंपरी (लोकमराठी ) : नगरसेवक दत्ता साने यांच्या कार्यालय तोडफोड प्रकरणी फरार असलेल्या सराईत आरोपीला मोटारसायकलसह अटक करण्यात आली. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकने ही कारवाई केली. जस्टिन रिचर्ड जेम्स उर्फ जस्टिन जॉन कॅनेडी (वय 27, रा. बोपोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी Pपोलिसांनी दिनेश पुकराज रेनवा, अक्षय प्रभाकर साबळे, आकाश गणेश पवार, देवेंद्र रामलाल बीडलानी, सॅमसन उर्फ सॅम सुलेमान अॅमेन्ट, मुकेश प्रल्हाद कांबळे या आरोपींना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता साने यांचे चिखली मधील साने चौक येथे जनसंपर्क कार्यालय आहे. 7 जून रोजी दुपारी सात जणांच्या टोळक्याने त्यांच्या कार्यालयावर सशस्त्र हल्ला केला. याप्रकरणी पूनम महाडिक यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा समांतर तपास ...
पाणी प्रश्नावरून भाजप नगरसेवक संतप्त, बोलू न दिल्याने फोडला माईक
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

पाणी प्रश्नावरून भाजप नगरसेवक संतप्त, बोलू न दिल्याने फोडला माईक

पिंपरी (लोकमराठी) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे शहरात पाण्याची कृत्रिम टंचाई जाणवत आहे. अपुरा आणि पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याने भाजप नगरसेवक संतप्त झाले. त्यावेळी महापाैरांनी बैठक आटोपती घेत असल्याचे सांगितले. मात्र, नगरसेवक चंद्रकांत नखाते ह्यांनी पाण्यासंर्दभात बोलू न दिल्याने हातातील माईक महापाैरांच्या दिशेने फेकून दिला. तसेच आम्हाला बोलू द्यायचे नव्हते. तर बोलविले कशाला, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला. पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी आज (मंगळवारी) बैठक आयोजित केली होती. महापौर राहुल जाधव यांच्या अध्यतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे सचिन चिखले, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्यासह पाणी...
पिंपरीसाठी तेजस्विनी कदम भाजपकडून इच्छूक
पिंपरी चिंचवड

पिंपरीसाठी तेजस्विनी कदम भाजपकडून इच्छूक

पिंपरी, ता.२५ (लोकमराठी) : पिंपरी मतदार संघातून उच्च शिक्षित युवती तेजस्विनी कदम यांनी भाजप कडून उमेदवारी मागितली आहे. यानिमित्ताने भाजपकडून आता आणखी एक फ्रेश चेहरा समोर आला आहे. त्या युवक व महिलांचा राजकारणातील टक्का वाढविण्याचे काम करणार असल्याने त्यासाठीच राजकारणात उडी घेतली. आमदारकीसाठी दावेदारी दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. पिंपरीकरांचा उत्स्फूर्त आणि मोठा प्रतिसादही तेजस्विनी यांना मिळतो आहे. पिंपरीतून राष्ट्रवादीसह भाजपकडूनही नवे व तरुण इच्छूक यावेळी अधिक आहे. सर्वच पक्ष भाकरी फिरवतील अशी चिन्हे आहेत. त्यामुळे शहरातील तीनपैकी सर्वात लहान असलेल्या या राखीव मतदारसंघातून लहान वयाचेच सर्वच उमेदवार असतील, अशी दाट शक्यता आहे. भाजपही आपल्या अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कट करून नव्यांना संधी देणार आहेत. त्यातूनच नव्या व तरुण चेहऱ्यांनी उमेदवारीसाठी पिंपरीत भाजपकडे गर्दी क...
गणेशमूर्ती परवानगीच्या भूई भाड्यात महापालिकेने केली सहापट वाढ
पिंपरी चिंचवड

गणेशमूर्ती परवानगीच्या भूई भाड्यात महापालिकेने केली सहापट वाढ

पिंपरी (लोकमराठी) : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आकारल्या जाणाऱ्या गणेशमूर्ती परवानगीच्या भूईभाड्यात वाढ करण्यात आली आहे. एक हजार रुपयांवरुन सहा हजार रुपये करण्यात आले आहेत. प्रदूषण निर्मूलन शुल्काचे कारण देत तब्बल पाच हजार रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे गणेश मूर्ती विक्रेत्यांवर संक्रांत ओढवली आहे. गणेशोत्सवात पाश्र्वभूमीवर गणेशमूर्ती विक्रीसाठी विक्रेत्यांकडून शहरात तात्पुरत्या स्वरुपात स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. शहरातील विविध भागात दरवर्षी शेकडो स्टॉल्स उभारले जातात. महापालिकेकडून स्टॉल्सला परवानगी देताना भूईभाडे आकारले जाते. गतवर्षी एक हजार रुपये भूईभाडे अधिक जीएसटी (वस्तू व सेवा कर) असे परवाना शुल्क महापालिकेने आकारले होते. त्यामुळे अधिकृतपणे परवाना घेऊन स्टॉल्स उभारणाऱ्यांची संख्या वाढली होती. मात्र, यंदा महापालिकेने सहापटीने भूईभाडे वाढविले आहे....
भोसरीतील शीतलबाग पादचारी पुलाच्या कामात मोठा गैरव्यवहार
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

भोसरीतील शीतलबाग पादचारी पुलाच्या कामात मोठा गैरव्यवहार

पुलाचा खर्च ७१ लाखावरून थेट ७.५ कोटीपर्यंत वाढलेल्या खर्चाची चौकशी करून दोषींवर कारवाईची अपना वतनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पिंपरी (लोकमराठी) : पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी येथील शीतलबाग पादचारी पुलाचा खर्च ७१ लाखांवरून थेट ७.५ कोटीच्या वर गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी अपना वतन संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अपना वतनचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांना पिंपरी चिंचवड महापालिकेकडून प्राप्त माहिती अधिकारातील कागदपत्रानुसार हा प्रकार निदर्शनास आला असून त्यामध्ये राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे व दाबामुळे तसेच प्रशासकीय अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, शीतलबाग पादचारी पुलाच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत भाजपचे शहराध्यक्ष व...
सायबर सेक्युरिटी विषयावर राजर्षी शाहू महाविद्यालयात राष्ट्रीय कार्यशाळा
पिंपरी चिंचवड

सायबर सेक्युरिटी विषयावर राजर्षी शाहू महाविद्यालयात राष्ट्रीय कार्यशाळा

ताथवडे (लोकमराठी) : कृत्रिम बुद्धिमत्ता व इंटरनेट ऑफ थिंग्समुळे पुढील पंधरा वर्षात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड बदल होणार आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात इंटरनेटचा शिरकाव होत आहे. त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ होणार आहे. त्यामुळे या विश्वात स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने सजग रहावे. सायबर धोक्यापासून वाचण्यासाठी शिक्षकांनी सायबर सुरक्षादूत (अँम्बेसेडर) व्हावे, असे आवाहन सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ञांकडून केले जाते. राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात, ताथवडे येथे सायबर सेक्युरिटी या विषयावर राष्ट्रीय पातळीवर एक आठवड्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळमध्ये विविध उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचे प्रात्यक्षिक द्वारे मार्गदर्शन लाभत आहे. प्रस्तुत कार्यक्रमाचे उद्घाटन सायबर सेल पिंपरी चिंचवड चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक माननीय विवेक मुगळीकर यांच्या हस...