सडलेला मेंदू आणि विकृत मानसिकता असलेल्या प्रवृत्तीला ठेचून काढा – कविता अल्हाट
भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधात राष्ट्रवादीची तीव्र निदर्शने
बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क
पिंपरी : महाराष्ट्र ही संतांची भूमी असण्यासोबतच सुसंस्कृत असे पुरोगामी राज्य आहे. मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून जाणिवपूर्वक सातत्याने राज्यातील महापुरूषांचा अपमान केला जात आहे. आता तर विरोधी पक्षातील नेत्यांचाही अपमान भाजपचे आमदार करत आहेत. महागाई, बेरोजगारी या ज्वलंत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठीच आक्षेपार्ह आणि वाद्ग्रस्त विधाने करण्याचा भाजप नेत्यांचा डाव आहे. आमच्या नेत्यांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला.
शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबद्दल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी आक्षेपार्ह असे विधान केले होते. याच्...