शासकीय व नियमानुसार नोकरीत स्थानिकांना प्राधान्य मिळावे – संजोग वाघेरे पाटील
बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क
पिंपरी, ता. २३ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नव्याने भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मात्र, त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने १९८४/८५ पासून नोकर भरतीत सुमारे ८५ टक्के स्थानिकांना प्राधान्य द्यावे. असे आदेश निर्गमित केलेले आहेत. असे शासन निर्णयातील आदेशात स्पष्ट सूचना देऊनही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शासन निर्णयाकडे हेतू परस्पर व जाणीवपूर्वक दुर्लक्ष कलेले आहे. ही बाब स्थानिकांच्या हक्कास व हितास बाधा आणणारी असून अतिशय गंभीर अशी आहे. यापूर्वी १९८२/८५ दरम्यान हरनामसिंह हे प्रशासक असताना या नियमांना नजरेसमोर ठेवून महापालिकेत भरती प्रक्रिया राबविण्यात आलेल्या आहेत. आपण त्या दस्तऐवज पाहण्यास हरकत नाही.
पिंपरी चिंचवड शहरात राहणारे व इथेच शिक्षण (प्राथमिक) घेतलेले असावेत. त्यांचे रेशनकार्ड, आधारकार्ड, वाहनचालक परवाना हे अर्जाच्या तार...










