पिंपरी चिंचवड

महाराष्ट्र अंनिस करते शोषण मुक्तीचे काम : प्रधानसचिव संजय बनसोडे यांचे प्रतिपादन
पिंपरी चिंचवड

महाराष्ट्र अंनिस करते शोषण मुक्तीचे काम : प्रधानसचिव संजय बनसोडे यांचे प्रतिपादन

पिंपरी : देव, धर्म, श्रद्धा यांच्या नावाखाली लोकांची जी फसवणूक होते, शोषण होते, ते थांबविण्याचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधानसचिव संजय बनसोडे यांनी केले. महाराष्ट्र अंनिसच्या आकुर्डी पुणे शाखेने चिंचवड येथील अपंग रोजगार उद्योग व तांत्रिक प्रशिक्षण केंद्र येथे कार्यकर्ता कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी महाराष्ट्र अंनिसच्या कामाची पंचसूत्री याविषयावर संजय बनसोडे यांनी मांडणी केली. खगोलशास्त्र आणि विज्ञान या विषयावर अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे संपादक डॉ. नितीन शिंदे यांनी मांडणी केली. जोडीदाराची विवेकी निवड या विषयावर महाराष्ट्र अंनिसच्या विधी व्यवस्थापन विभागाच्या कार्यवाह अँड. मनीषा महाजन यांनी मांडणी केली. महाराष्ट्र अंनिस जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कट्यारे वमहाराष्ट्र अंनिस आकुर्डी शाखेच्या कार्...
पिंपरीत बहुजन समाज पार्टीचे ओबीसी बचाव आंदोलन
पिंपरी चिंचवड, राजकारण

पिंपरीत बहुजन समाज पार्टीचे ओबीसी बचाव आंदोलन

पिंपरी : राज्य शासनाच्या चुकीमुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली. या पाश्वभुमीवर ओबीसी आरक्षण बचावासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने गुरूवारी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बहुजन समाज पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश गायकवाड, पुणे जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष धम्मदीप लगाडे, पिंपरी चिंचवड प्रभारी विजय मुसळे, शहराध्यक्ष सुनिल गवळी, उपशहराध्यक्ष सुधाकर फुले, कोषाध्यक्ष राहुल मदने, महासचिव राजेंद्र पवार, सचिव राजेंद्र डावरे व विक्की पासोटे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष महेश कांबळे, मधुकर इंगळे, बाळासाहेब गायकवाड, दत्ता गायकवाड, अनिल ननवरे, सुभाष दळवी, सतीश काकडे, कल्याण ओव्हाळ, माऊली बोऱ्हाडे, लक्ष्मण पांचाळ, कार्यालयीन सचिव सुरज गायकवाड, श्रावण कोरी, सर्व हरा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बी....
मोफत महाआरोग्य शिबिराचा काळेवाडी-रहाटणीकरांनी घेतला लाभ ; शिवसेनेचे उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्या वाढदिवसानिमित्त केले होते आयोजन
पिंपरी चिंचवड

मोफत महाआरोग्य शिबिराचा काळेवाडी-रहाटणीकरांनी घेतला लाभ ; शिवसेनेचे उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्या वाढदिवसानिमित्त केले होते आयोजन

पिंपरी : शिवसेनेचे उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराचा काळेवाडी आणि रहाटणी प्रभागातील हजारो नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी नखाते यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. हरेश नखाते यांच्या काळेवाडी, ज्योतिबा नगर येथील जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी सकाळी 9:30 ते दुपारी 3 या वेळेत हे शिबीर संपन्न झाले. यावेळी शहर संपर्कप्रमुख वैभव थोरात, युवा नेते विश्वजीत बारणे, कामगार नेते इरफान सय्यद, उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहराध्यक्ष सचिन भोसले, माजी शहराध्यक्ष योगेश बाबर, राजेश वाबळे, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, सरपंच गोविंद वलेकर, अनंत कोऱ्हाळे, बशीर सुतार, दस्तगीर मनियार, नरेश खुळे, चंद्रकांत तापकीर, सचिन काळे, रमेश काळे, बाबासाहेब भोंडवे, दीपक जाधव, जेष्ठ नागरिक पद्माकर जांभळे, सुखदेव खेडकर, का...
महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयातर्फे आयोजित पलोगेथोन अभियानात 6.5 टन कचरा संकलन
पिंपरी चिंचवड

महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयातर्फे आयोजित पलोगेथोन अभियानात 6.5 टन कचरा संकलन

पिंपरी, ता. 8 : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) 'क' क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने रविवारी (ता. 8) केएसबी चौक ते टाटा मोटर्स रस्त्यावर पलोगेथोन अभियान आयोजित करण्यात आले होते. या मोहमेअंतर्गत सुमारे 6.5 टन कचरा संकलन करण्यात आला. या अभियानात सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी. बी. कांबळे यांच्यासह टाटा मोटर्सचे अधिकारी व्ही. टी. पाटील आदी सहभागी झाले होते. रविवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत मुख्य आरोग्य निरीक्षक शांताराम माने, राजेंद्र उज्जैनवाल, आरोग्य निरीक्षक लक्ष्मण साळवे, वैभव कांचनगौडार, सचिन जाधव, शैलेश वाघमारे, विक्रम सौदाई, बिव्हीजी इंडिया व टाटा मोटर्सचे (Tata Motors) अधिकारी यांचेसह सुमारे दोनशे कर्मचारी सहभागी झाले होते....
भाजप आणि महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षणाचा फूटबॉल केला – आप
पिंपरी चिंचवड, राजकारण

भाजप आणि महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षणाचा फूटबॉल केला – आप

पिंपरी : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) दोघे ओबीसी आरक्षणासंदर्भात गंभीर नव्हते आणि फक्त एकमेकांवर चिखलफेक करत होते. भाजप आणि महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षणाचा फूटबॉल केला आहे. अशी टिका आम आदमी पार्टीचे (Aam Adami Party) शहर कार्याध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांनी केली आहे. चेतन बेंद्रे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेश हा नाकारता येणार नाही, पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे. ही आम आदमी पार्टीची मागणी पहिल्यापासून राहिली आहे आणि या पुढे ही राहील. बेंद्रे पुढे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूकीसंदर्भात आम आदमी पार्टी तयार आहे आणि सर्व जागा लढवविणार आहे. आप महानगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच लढवत असून लोकांना अरविंद केजरीवाल यांचे शिक्षण, आरोग्यावर आधारित दिल्ली मॉडेल मनात भरले आहे. संपूर्ण पिंपरी ...
ड्रेनेजच्या १२२ कोटींच्या कामातील भाजपचा लुटीचा डाव हाणून पडणार – संजोग वाघेरे‌ पाटील
पिंपरी चिंचवड

ड्रेनेजच्या १२२ कोटींच्या कामातील भाजपचा लुटीचा डाव हाणून पडणार – संजोग वाघेरे‌ पाटील

ड्रेनेज विभागातील चुकीच्या निविदाप्रक्रियेची होणार तपासणी वर्क ऑर्डर थांबविल्याने भ्रष्टाचारी भाजपच्या उधळपट्टी धोरणाला लागला ब्रेक पिंपरी : अमृत योजनेअंतर्गंत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मदतनिधीतून महानगरपालिकेने ड्रेनेज विभागातील सुधारणेसाठी १४८ कोटींचे काम काढले. गेल्या पाच वर्षाच्या काळात सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचारी आणि अपारदर्शी कारभारामुळे अमृत योजनेतील हे काम बारगळले. त्यामुळे पुन्हा याच कामासाठी आणखी १२२ कोटी रुपयांची निविदा काढून भाजपने सत्तेतून पायउतार होताना ते मंजूर केले. राष्ट्रवादी काँग्रेसने या कामातील त्रृटी निदर्शनास आणून दिल्यामुळे भाजपचा हा कोट्यवधीचा लुटीचा डाव हाणून पडणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर तथा ज्येष्ठ नेते संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे. या संदर्भात संजोग वाघेरे पाटील यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे...
माजी विद्यार्थी हा महाविद्यालयाचा अविभाज्य भाग आहे – प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

माजी विद्यार्थी हा महाविद्यालयाचा अविभाज्य भाग आहे – प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड

माजी महापौर संजोग वाघेरे पाटील पिंपरी : “महाविद्यालयाच्या नावलौकिकाच्या दृष्टीने अनेक घटक कार्यरत असतात. जसे की महाविद्यालयाचे शिक्षण, ते देणारा गुणवंत प्राध्यापक वर्ग, इमारत, विद्यार्थी संख्या इत्यादी. त्यापैकीच एक म्हणजे माजी विद्यार्थी. हा माजी विद्यार्थी महाविद्यालयाचा एक अविभाज्य भाग आहे. कारण येथून शिक्षण घेऊन गेलेला माजी विद्यार्थी बाहेरच्या जगात आपापल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित असतो. व त्यामुळे महाविद्यालयाच्या लौकिकात भर पडत असते.” असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी येथे केले. जालिंदर काकडे , माजी विद्यार्थी संजय गायके, प्रहार संघटना माजी विद्यार्थी महात्मा फुले महाविद्यालयाचा ‘माजी विद्यार्थी मेळावा’ नुकताच या ठिकाणी संपन्न झाला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड...
रहाटणीत ‘कराटे कुमिट चॅम्पियनशिप २०२२’ स्पर्धा उत्साहात
पिंपरी चिंचवड, क्रीडा

रहाटणीत ‘कराटे कुमिट चॅम्पियनशिप २०२२’ स्पर्धा उत्साहात

युनिव्हर्सल शोतोकन कराटे दो असोसिएशन व अरुण चाबुकस्वार स्पोर्ट फाउंडेशनतर्फे केले होते आयोजन रहाटणी : युनिव्हर्सल शोतोकन कराटे दो असोसिएशन व अरुण चाबुकस्वार स्पोर्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कराटे कुमिट चॅम्पियनशिप २०२२ स्पर्धा विमल गार्डन रहाटणी येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धचे उद्घाटन संजय पवार (7th ब्लॅक बेल्ट उस्का), राजेश सोळंके (4th डॅन ब्लॅक बेल्ट उस्का), अंकुश तिकोने (4th डॅन ब्लॅक बेल्ट उस्का) व न्यू सिटी प्राईड स्कूलचे संस्थापक व अध्यक्ष अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रहाटणी, पिंपळे सौदागर येथील राॅयल इम्पिरीअो, रॉयल रहाटगी, पार्क रॉयल, ऑरेंज काउंटी, फ्लोरा सोसायटी, हरीत शिल्प, दोरका साई हेरिटेज, वर्धमान अंगण, ऐरोना 29 अशा विविध सोसायट्यातील १८ वर्षाखालील वयोगट चार ते सात, सात ते बारा, बारा ते सोळा, सोळा ते अठरा या वयोगटातील ५५० म...
पिंपळे सौदागर येथील क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाऊंडेशनची चमकदार कामगिरी
क्रीडा, पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागर येथील क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाऊंडेशनची चमकदार कामगिरी

उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसेंकडून संघाचे कौतुक पिंपरी : डे-नाईट क्रिकेट स्पर्धेतील रोमहर्षक सामन्यात महिलांच्या राधाईनगरी क्रिकेट संघाने अजिंक्यपद तर, अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाऊंडेशनने विरोधी संघावर विजय मिळवीत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. यशाबद्दल संघाचे उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे यांनी कौतुक केले. माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे सौदागर येथे हाफ पीच टेनिस बॉल डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेस सौदागरमधील क्रिकेट रसिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास माजी नगरसेवक शत्रुघ्न उर्फ बाप्पू काटे, उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे, सामाजिक कार्यकर्ते संजय आबा भिसे, माजी नगरसेविका निर्मला कुटे, चंदा भिसे, विकास काटे, भुषण काटे, शशी काटे, रमेश काटे व सम...
महेश प्रोफेशनल फोरम पीसीएमसीचा पदग्रहण समारंभ उत्साहात ; अध्यक्षपदी प्रसन्ना राठी यांची निवड
पिंपरी चिंचवड

महेश प्रोफेशनल फोरम पीसीएमसीचा पदग्रहण समारंभ उत्साहात ; अध्यक्षपदी प्रसन्ना राठी यांची निवड

पिंपरी : महेश प्रोफेशनल फोरम पीसीएमसीचा पदग्रहण समारंभ सांगवी येथील निळू फुले सभागृह येथे मोठ्या उत्साहात नुकतीच संपन्न झाला. अध्यक्षपदी प्रसन्ना राठी व पुढील वर्षासाठी विकास राठी यांची निवड करण्यात आली, तसेच मागील वर्षाचे अध्यक्ष सीए मनोज मालपाणी यांनी मागील वर्षात झालेल्या कार्यक्रमाचे विश्लेषण केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा टावरी व डॉ. संदीप बाहेती यांनी केले. या कार्यक्रमात अन्य संचालकांनी त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी, पालकांच्या आशिर्वादासह, पदभार देखील सांभाळला. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संजय मालपाणी (संचालक मालपाणी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज) उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन पर उपदेश देताना श्रीमद्भगवद्गीतेचे आयुष्यातील प्रॅक्टिकल महत्त्व समजून सांगितले व यशाचे सूत्र येणाऱ्या नव्या संचालक मंडळाला समजून सांगितले. या कार्यक्रमास MFCTची गार्डियन ट्रस्टी...