पिंपरी चिंचवड

महापालिका रूग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचारी तीन महिन्यांपासून पगाराविना
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

महापालिका रूग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचारी तीन महिन्यांपासून पगाराविना

रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, ता. 26 : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जिजामाता, थेरगाव, सांगवी व यमुना नगर रूग्णालायातील कंत्राटी पद्धतीने नेमलेले वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स तसेच इतर पॅरीमेडीकल स्टाफ व कर्मचारी असे सुमारे 350 कर्मचारी मागील तीन महिन्यांपासून पगाराविना काम करत आहेत. ठेकेदार त्यांना वेळेवर पगार देत नसून फेब्रुवारीपासून त्यांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले असून आज जिजामाता रूग्णालयात या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून महापालिका प्रशासानाला जागे केले. दोन दिवसात वेतन देण्याचे ठेकेदाराने लेखी आश्वासन दिल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी काम सुरू केले. श्रीकृपा सर्व्हिसेस प्रा. लि. असे या ठेकेदाराचे नाव असून 1 ऑक्टोंबर 2021 पासून या ठेकेदाराला महापालिकेने वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स तसेच इतर पॅरीमेडीकल स्टाफ व कर्मचारी पुरविण्यासाठी नेमले आहे. त...
जमिनीच्या त्या व्यवहारात एक डिसीपी अन् एसीपी सदोष? | दोघांचा शासनाला डिफॉल्ट रिपोर्ट सादर
पिंपरी चिंचवड, विशेष लेख

जमिनीच्या त्या व्यवहारात एक डिसीपी अन् एसीपी सदोष? | दोघांचा शासनाला डिफॉल्ट रिपोर्ट सादर

रोहित आठवले पिंपरी चिंचवडची (Pimpri Chinchwad) उद्योगनगरी म्हणून ओळख निर्माण करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या (MIDC) एमआयडीसीच्या एका जागेच्या हस्तांतरण प्रक्रियेत शहरातली एक डिसीपी (DCP) आणि एसीपी (ACP) यांनी सदोष "उद्योग" केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. चौकशी समितीने केलेल्या सर्वसमावेशक पडताळणी नंतर याबाबतचा अहवाल शासनाला पाठविण्यात आल्याचे समजते. कोट्यवधींचा हा सर्व व्यवहार करताना शहरातील एक डिसीपी आणि एसीपी यांनी तीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मदतीने नको तेवढा सक्रीय सहभाग या प्रक्रियेत घेतल्याचे आता उघड झाले असून, शहरातील एका आयपीएस अधिकाऱ्याने (IPS Officer) याबाबतचा रीतसर अहवाल शासनाला पाठविल्याने शहरातील अनेक जमिनींचे व्यवहार रडारवर आले आहेत. या सगळ्या उद्योगात (व्यवहारात) केवळ पोलिसच नाही तर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) मधील एक माजी नगरसेवकाचा...
सामाजिक उपक्रमांनी कोमल सचिन काळे यांचा वाढदिवस साजरा
पिंपरी चिंचवड, सामाजिक

सामाजिक उपक्रमांनी कोमल सचिन काळे यांचा वाढदिवस साजरा

काळेवाडीत पाच पाणपोईचे लोकार्पण तर शाळेला वीस महापुरुषांच्या प्रतिमा भेट पिंपरी, ता. २३ : काळेवाडी येथील शिवशाही महिला बचत गटाच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या कोमल सचिन काळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोमल काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सचिन काळे सोशल फाउंडेशनच्या वतीने काळेवाडी प्रभागात पाच ठिकाणी सार्वजनिक मोफत पाणपोईचे उदघाट्न करण्यात आले. याप्रसंगी माजी विरोधी पक्षनेते तथा माजी नगरसेवक नाना काटे, माजी नगरसेवक विनोद नढे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष इमरान शेख, संगीता कोकणे, जयदीप जोगदंड यांच्यासह सचिन काळे सोशल फाउंडेशनचे सर्व सदस्य आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मावळ तालुक्यातील पांगळोली या अतिशय दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेला वीस महापुरुषांच्या प्र...
पठाणी वसुली करणारी ‘पे अँड पार्क’ योजना बंद करा ; अन्यथा आम आदमी पार्टीचा आंदोलनाचा इशारा
पिंपरी चिंचवड

पठाणी वसुली करणारी ‘पे अँड पार्क’ योजना बंद करा ; अन्यथा आम आदमी पार्टीचा आंदोलनाचा इशारा

पिंपरी : शहरामधील महानगरपालिकेची पे अँड पार्क योजना तातडीने बंद करण्यात यावी. असे निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त वाघ यांना आम आदमी पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष अनुप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टी सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष वहाब शेख, महिला अध्यक्ष स्मिता पवार, पिंपरी चिंचवड संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, प्रवक्ते प्रकाश हागवणे, डॉक्टर विंग अध्यक्ष अमर डोंगरे आदी उपस्थित होते. निवेदनात असे म्हटले आहे की, केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे नागरिक त्रस्त असताना पिंपरी चिंचवडचे महापौर, पालिका सत्ताधारी भाजपकडून शहरवासीयांच्या खिशाला कात्री लागणारी धोरणे राबविली गेली आहेत. भ्रष्टाचारी कारभारामुळे करदात्यांच्या करोडो रुपयांचा भाजपच्या नेतृत्वाखाली चुराडा केला आहे, तरी देखील शहर वाशियांकडून पैसे काढून आपली ति...
महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मानवता हिताय सोशल फाउंडेशनतर्फे अनोखा उपक्रम
पिंपरी चिंचवड, सामाजिक

महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मानवता हिताय सोशल फाउंडेशनतर्फे अनोखा उपक्रम

पिंपरी : गांधीनगर येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले हॉलमध्ये ज्ञानसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त मानवता हिताय सोशल फाउंडेशनचा वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला. जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा महापुरुषांना वाचून साजरी करण्यात यावी, ह्या उद्देश्याने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. ज्यामध्ये प्रामुख्याने परीक्षा पॅड, वही व पेनाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बाबासाहेबांच्या जीवनातील विविध पैलूवर वक्ते प्रदीप मस्के यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे समीर मसुळकर, सद्गुरू कदम, सोनाली तुषार हिंगे, माधवी शिंदे, अश्विनी महावीर कांबळे, सोनाली दळवी आदी मान्यवरांनी हजेरी लावली. त्यावेळी मानवता हिताय संस्थेचे अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, उपाध्यक्ष विशाल वाली, नवनाथ मित्र म...
वृक्षमित्र अरुण पवार यांचा ‘वृक्षमित्र आदर्श समाजसेवक पुरस्कारा’ने गौरव
पिंपरी चिंचवड

वृक्षमित्र अरुण पवार यांचा ‘वृक्षमित्र आदर्श समाजसेवक पुरस्कारा’ने गौरव

उन्हाळ्यात हजारो वृक्षांना मोफत पाणी दिल्याची समाजाने घेतली दखल पिंपरी, ता. 20 : समाजसेवेचा वसा हाती घेऊन दरवर्षी उन्हाळ्यात हजारो वृक्षांना मोफत पाणी देण्याचे काम करण्यात येत असल्याच्या कामाची दखल घेत पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांना नुकतेच वृक्षमित्र आदर्श समाजसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. श्री विठ्ठल-रुख्मिणी मूर्ती स्थापना व श्री रामनवमीचे औचित्य साधत सुतारवाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अरुण पवार यांना जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प. एकनाथ महाराज सदगीर, गिरीराज नागरी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आबासाहेब सुतार, समाजभूषण शांताराम महाराज निम्हण, मृदुंगाचार्य पांडुरंग दातार, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज अध्यक्ष मारुती ...
नऊ महिने बंद असलेले पथदिवे नऊ दिवसात सुरू
पिंपरी चिंचवड

नऊ महिने बंद असलेले पथदिवे नऊ दिवसात सुरू

सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर यांच्या पाठपुराव्याला यश पिंपरी, ता. 18 : काळेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक (एम एम चौक) ते एम्पायर इस्टेट पुल दरम्यानचे अनेक पथदिवे व हायमस्ट दिवे सुमारे नऊ महिने बंद होते. मात्र, काळेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर यांच्या नऊ दिवसांच्या पाठपुराव्यानंतर हे पथदिवे सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रकाशाने रस्ते उजाळले आहेत. काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता हा 45 मीटर रूंदीचा बिआरटी मार्ग दळवळणाच्या दष्टीने अत्यंत महात्वाचा मार्ग बनला असून भोसरी, मोशी, चिखली, आळंदी, चाकण, मोरवाडी तसेच काळेवाडी, रहाटणी, वाकड, हिंजवडी, माण, थेरगाव, चिंचवडगाव आदी भागाला जोरणारा प्रमुख्य रस्त्यांपैकी एक रस्ता आहे. मात्र, या रस्त्यावरील एम एम कॅालेज चौक ते पवना नदीवरील पुलादरम्यान अनेक पथदिवे व हायमस्ट दिवे सुमारे नऊ महिने बंद होते. त्यामुळे या रस्त्यावर अंध...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त संविधानाच्या 100 प्रस्ताविकाचे वाटप
पिंपरी चिंचवड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त संविधानाच्या 100 प्रस्ताविकाचे वाटप

रहाटणी : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले फाउंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त लिनियर अर्बन गार्डन पिंपळे सौदागर या ठिकाणी चैतन्य हास्य क्लब व ज्येष्ठ नागरिक संघ पिंपळे सौदागरच्या सर्व सदस्यांना प्रस्ताविकाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रस्ताविकाचे पठण व वाचन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, चैतन्य हास्य क्लबचे अध्यक्ष भागवत झोपे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष राम साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते राहुल भातकुले, पुरुषोत्तम गाणार, बाळासाहेब शेंडगे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिलांप्रती योगदान या विषयावर व्याख्यान झाले. ज्येष्ठ नागरिक संघाच्या व चैतन्य हास्य क्लब यांच्या सर्व सभासदांना प्रास्ताविकाचे वाटप करून पठण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मारावार यांनी के...
नाच गाण्याऐवजी वाचनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यात घेणे गरजेचे
पिंपरी चिंचवड

नाच गाण्याऐवजी वाचनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यात घेणे गरजेचे

चिंचवड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचं संविधान अभ्यासपूर्ण लिहिले म्हणून देश सुरक्षित आहे व पुढेही राहणार आहे. त्यामुळे आपण लिहिणे, वाचणे गरजेचे असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्याला पुस्तक रूपाने बघणं आवश्यक आहे. नाच गाण्यांच्या माध्यमातून जनजागृती होणार नाही म्हणून बाबासाहेबांना डोक्यात घेणे गरजेचे आहे. अशा आशयांचे मनोगत विविध मान्यवरांनी चिंचवडगाव येथे भिम महोत्सवात व्यक्त केले. प्रबुद्ध संघाच्या वतीने चिंचवडगाव भिम महोत्सव २०२२ उत्साहात साजरा करण्यात आला. गाडगेबाबा चौक केशवनगर येथे सकाळी ८ वाजता प्रबुद्ध संघाचे अध्यक्ष किशोर सोनवणे व प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते पंचशील झेंडा रोहन करण्यात आला. यानंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रमोद साळवी, चंद्रकांत लोंढे, अल्पना गोडबोले, अर्चना गावडे, निशांत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम ...
पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी व अवैध धंद्यांना आळा घाला ; आम आदमी पार्टीची मागणी
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी व अवैध धंद्यांना आळा घाला ; आम आदमी पार्टीची मागणी

पिंपरी, ता. 13 : पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी व अवैध धंद्यांना आळा घाला. अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत आपच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय येथे अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये असे म्हटले आहे की आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष यशवंत कांबळे यांच्यावरती तीन गुन्हेगारांनी गांजाची नशा करून कोयत्याने खुनी हल्ला केला. अशी अनेक प्रकरणे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये घडत आहेत, व्यसनाधीन होऊन जनतेच्या गाड्या अडवून त्यांना कोयत्याने मारहाण केली जाती व लुटले जाते असे प्रकार मोठ्या प्रमाणावर ती पिंपरी-चिंचवड शहरात होत आहे. त्यावरती पोलीस प्रशासनाने लक्ष घालणं गरजेचे आहे. अशा गुन्हेगारांवर ती आळा घालणं गरजेचे आहे, शहरांमध्ये अनेक ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत, ते त्वरित बंद करावे...