तमाम शिवसैनिकांची माऊली माँसाहेब यांना शिवसैनिकांकडून अभिवादन
पिंपरी : तमाम शिवसैनिकांची माऊली, वात्सल्याची सावली माँसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. आकुर्डीतील सेनाभवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्याप्रसंगी शहर संपर्क प्रमुख वैशाली सुर्यवंशी, पुणे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हा संघटिका वैशाली मराठे, महिला आघाडीच्या शहर संघटीका उर्मिला काळभोर, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, अनिता तुतारे, कल्पना शेटे, उपशहर प्रमुख हरेश नखाते, विभाग प्रमुख गोरख पाटील, वैशाली कुलथे, शारदा वाघमोडे, रजनी वाघ, रुपाली आल्हाट, कामिनी मिश्रा, वैशाली काटकर, उषा आल्हाट, भाग्यश्री म्हस्के, कोमल जाधव, रोहिणी कोबल, योगिनी वाडकर, हर्षाली घरटे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी वैशाली सुर्यवंशी म्हणाल्या की, "हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने कामाची...










