महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गर्भवती महिलांना तब्बल पाच महिन्यांपासून ‘आहार पुरवठा’ नाही
माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांची विभागीय आयुक्तांकडे तक्रार
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) रुग्णालयांमध्ये गर्भवती महिलांसाठी 'जननी सुरक्षा' योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या आहार पुरवठ्यासाठी नियुक्त असणाऱ्या ठेकेदाराची मुदत गेल्या फेब्रुवारी महिन्यात संपलेली आहे.त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून गर्भवती महिलांना करण्यात येणारा 'आहार पुरवठा' बंद असल्यामुळे शहरातील हजारो मातांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेऊन तात्काळ निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी तसेच हि योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.
याबाबत दिपक खैरनार (Dipak Khairnar) यांनी पुण्याचे विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये गोर-गरीब तसेच आर्थिक दुर्बल घटकातील महिला प्रसु...