पिंपरी, दि.२ (लोकमराठी) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजीक न्याय राज्य मंत्री भारत सरकार खासदार. रामदासजी आठवले यांचे कट्टर समर्थक व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वाहतुक आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजिज शेख यांनी आषाढी एकादशी व बकरी ईद या दोन्ही दोन समाजाच्या वतीने महत्वाचे समजले जाणारे सण याचे महत्व लक्षात घेत आज बीड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार यांचा पि.चि.महानगर पालिकेतील पुर्वाश्रमिचा जनते प्रति घेतलेल्या निर्णयाचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले याच्या दौऱ्यानिमित्त अजित पवार यांचा हिंदु-मुस्लीम ऐक्याचे पाइक म्हनुन शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी विठ्ठल रुक्मिणीची मुर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानाला ऊत्तर देत अजित पवार बोलताना अजिज शेख हे मुस्लिम समाजाचे असुन ही मला पांडुरंगाचे प्रतिरुप विठ्ठल रखुमानी यांची मुर्ती देऊन हिंदुत्वाची निशानी भगवी शाल व पगडी देऊन माझा सन्मान सत्कार केला आणि तो ऐका मुस्लीम कार्यकर्त्या कडुन सन्मान होणे हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. या सन्मानामुळे मधील हिंदु मुस्लिम समाजामध्ये ऐक्याचा संदेश जाईल याची मला खात्री आहे असे भावनात्मक ऊदगार अजिज शेख यांच्या कार्याबद्ल केले.
या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वाहतुक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अजिज शेख महाराष्ट्र २४तास न्युज चॅनलचे मुख्यसंपादक संजय धुतडमल, प्रतिकार न्युजचे मुख्यसंपादक माणिक पौळ, खेड तालुकाध्यक्ष अभिमान डिसले, सय्यद मुमताज मँडम ( मुख्याध्यापिका), संध्याताई भोसले, (अंगनवाडी बीड जिल्हाध्यक्षा ) खान फिरदौस सर, रियाज सिध्दिकी, फाईम इनामदार पञकार,मिसाळ शिवाजी, मिसाळ सुधाकर व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.