YCM : वायसीएम रूग्णालयाचा कारभार न सुधारल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

YCM : वायसीएम रूग्णालयाचा कारभार न सुधारल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा 

पिंपरी : महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय (वायसीएम) प्रवेशद्वारावर अल्पसंख्यांक विकास महासंघ, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी व शहाजमात यांच्यातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले होते. याआंदोलनाची दखल गेत वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. संजय वाबळे यांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते.

यावेळी झालेल्या चर्चेत जनतेच्या तक्रारी बद्दल जास्त जोर देण्यात आला. त्यामध्ये बाहेरील औषध गोळ्या व डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल चर्चा करण्यात आली. (YCM Hospital) वायसीएम रूग्णालयाचा कारभार न सुधारल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी वायसीएम प्रशासनाला देण्यात आला.

यावेळी अल्पसंख्यांक विकास महासंघचे संस्थापक अध्यक्ष रफिक भाई कुरेशी, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष श्याम कुमार कसबे, युवा अध्यक्ष साजिद शेख, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सालार भाई शेख, उपाध्यक्ष खाजाभाई नदाफ व शहाजमातचे मोहसीन शहा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.