पिंपरी विधानसभेत भापसेच्या दीपक ताटे यांना वाढता जनादेश
पिंपरी (लोकमराठी) : पिंपरी विधानसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला असून कोजागिरी पौर्णिमा व पावसाने दिलेली उघडीप यामुळे पदयात्रा, रॅली, घरभेटीने मतदारसंघ ढवळून निघाला आहे. सर्वाधिक उमेदवार असलेला राखीव मतदारसंघ सध्या इतर मतदार संघापेक्षा अधिक चर्चिला जात आहे. त्या इथल्या आजी-माजी सदस्यांच्या कुस्तीमुळे. मात्र नेहमी दुरंगी लढतीचे चित्र सध्या या मतदार संघात धुसर होत असून भापसे पार्टीचे दीपक ताटे यांनी सर्वसामान्य कष्टकरी मध्यमवर्गीय लोकांच्या जनआधारावर ही लढाई सोपी ठेवलेली नसल्याचे चित्र सध्या मतदारसंघात पहावयास मिळत आहे.
ताटे यांच्या वाढत्या जन आधारामुळे दुरंगी
होणारी लढत आता तिरंगी होऊन भापसे पार्टी या मतदार संघाचे चित्र बदलेल अशी भावना
सर्वसामान्य कष्टकरी मध्यमवर्गीयांमधून बोलले जात आहे. बहुभाषिक व विविध
प्रांतातून आलेल्या कष्टकरी व्यापारी, उद्योजक एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून...