राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘खानावळ’ आंदोलन
महापालिका आयुक्तांच्या निषेधार्थ प्रवेशद्वारावर नगरसेवकांचा भोजन समारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भोजनाची पालिकेत केली होती व्यवस्था
पिंपरी (लोकमराठी ) : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भोजनाची व्यवस्था गेल्या आठवड्यात महापालिका भवनात केली होती. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसने गुरुवारी (ता. ५) दुपारी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर 'आयुक्तांची खानावळ' आंदोलन केले.
शहरातील प्रस्तावित व प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री गेल्या आठवड्यात महापालिकेत आले होते. त्या वेळी त्यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यापूर्वी आयुक्तांच्या दालनात भोजन केले. त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी विरोध केला व आयुक्तांच्या निषेधार्थ गुरुवारी दुपारी एक वाजता महापालिका प्रवेशद्वारावर 'खानावळ' आंदोलन केले. बिर्याणी व आमटी असा बेत ह...