पुणे

Hadapsar : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘उद्योजकता’ विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
पुणे

Hadapsar : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘उद्योजकता’ विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील इनोव्हेशन फाउंडेशन, एस. एम. जोशी कॉलेज हडपसर आणि उच्च शिक्षण विभाग, रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने 'उद्योजकता' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डायरेक्टर जनरल एस.टी.पी. पुणे येथील सीईओ राजेंद्र जगदाळे व मैत्री फाउंडर सेलचे प्रमुख कमलेश पांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, चेअरमन चंद्रकांत दळवी (IAS., Retd.) हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे, सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव (ऑडिट विभाग) प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कमलेश पांडे म्हणाले की, स्टार्टअप चालू करून त्यापासून उत्पन्नाचे साधन मिळवायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक महाविद्...
यशाचा कळस इच्छाशक्ती जिद्द व सराव या त्रिसूत्रीवर अवलंबून आहे – आयआरएस अधिकारी अभिजीत पाखरे
पुणे

यशाचा कळस इच्छाशक्ती जिद्द व सराव या त्रिसूत्रीवर अवलंबून आहे – आयआरएस अधिकारी अभिजीत पाखरे

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये मुलींसाठी निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन हडपसर, दि. ५ मे २०२५ | प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासाशिवाय दुसरा पर्याय नाही. जे विद्यार्थी सातत्यपूर्ण प्रयत्न करतात ते विद्यार्थी आयुष्यामध्ये यशस्वी होतात. विद्यार्थ्यांनी आपण अधिकारी होणारच असा आत्मविश्वास मनामध्ये बाळगणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता लक्षात घेऊन ध्येय ठरवल्यास आयुष्यामध्ये ते लवकर यशस्वी होतात. विद्यार्थ्याने दैनंदिन वाचनातून आणि अनुभवांमधून आपला विचारव्यूह तयार करायला पाहिजे. व्यवस्था बदलायची असेल तर विद्यार्थ्यांनी अगोदर व्यवस्थेमध्ये येणे आवश्यक आहे. यशाचा कळस इच्छाशक्ती जिद्द व सराव या त्रिसूत्रीवर अवलंबून असल्याचे मत अभिजीत पाखरे (IRS) यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र...
Pune Crime : पुणे जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात
पुणे, क्राईम

Pune Crime : पुणे जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात

पुणे, दि. १४ : जिल्हा परिषदेच्या (Pune ZP) बांधकाम विभागाकडील कामांची देयके मंजूर करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यावर बंडगार्डन पोलिस (Bandgarden Police Station) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. कार्यकारी अभियंता बाबूराव कृष्णा पवार (वय ५७), उपअभियंता दत्तात्रेय भगवानराव पठारे (वय ५५) आणि कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे अशी ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. पवार हे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात (दक्षिण) आणि अन्य दोघेजण दौंड शिरूर उपविभागात कार्यरत आहेत. ‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासकीय ठेकेदार आहेत. त्यांना दौंड तालुक्यातील खुटबाव रस्ता ते गलांडवाडी पाणंद शिव रस्ता आणि गलांडवाडी मंदिर ते ज्...
Dehu : वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू मारोती महाराज कुऱ्हेकर यांच्या कीर्तनाने रचला सोहळ्याचा पाया
पुणे

Dehu : वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू मारोती महाराज कुऱ्हेकर यांच्या कीर्तनाने रचला सोहळ्याचा पाया

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर महोत्सव पिंपरी, ता. ९ : जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात गुरुवर्य कुऱ्हेकर महाराजांच्या कीर्तनाने झाली. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनाला येत्या १६ मार्च रोजी अर्थात तुकाराम बीजेच्या दिवशी ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री क्षेत्र आळंदी (Alandi) येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्वर्यू हभप मारूतीबाबा कुऱ्हेकर महाराज आणि वारकरी रत्न हभप ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांच्य...
पत्रकारांनी बातमी करताना कोणाच्याही दबावाला बळी पडता कामा नये : अशोकराव वानखेडे
पुणे

पत्रकारांनी बातमी करताना कोणाच्याही दबावाला बळी पडता कामा नये : अशोकराव वानखेडे

न्यूज १८ चे पत्रकार गोविंद वाकडे यांची प्रदेशाध्यक्ष पदी निवड पुणे : पत्रकारांनी आपल्या बातमी ला न्याय देताना कधीही राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडता कामा नये. तसेच सुड बुद्धीने आपण पत्रकारिता करत नसेल तर तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. असे मत ऑल इंडिया जरनालिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार पदाधिकारी निवड करताना व्यक्त केले. न्यूज १८ चे पत्रकार गोविंद वाकडे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष आणि पदाधिकारी यांची निवड आणि सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला.त्यावेळी वानखेडे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक हेमंत जोशी उपस्थित होते . यावेळी हेमंत जोशी यांनी सर्वसामान्य जनतेला आपल्या पत्रकारितेचा फायदा झाला पाहिजे. तसेच ग्रामीण भागातील चित्र सर्वच माध्यमांनी पुढे आणले पाहिजे. सध्या नको त्या गोष्टी दाखवण्याची स्पर्ध...
मोठी बातमी : प्रतिज्ञापत्रासाठी आता स्टॅम्प पेपरची गरज नाही
पुणे

मोठी बातमी : प्रतिज्ञापत्रासाठी आता स्टॅम्प पेपरची गरज नाही

पुणे : राज्य शासनाने नुकताच प्रतिज्ञापत्र, हक्कसोडपत्र अथवा अन्य प्रकाराचे डॉक्युमेंट शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरऐवजी पाचशे रुपयांचे स्टॅम्प वापरण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी महा ई-सेवा केंद्रातून नागरिकांकडून ५०० रुपयांचे प्रतिज्ञापत्र मागितले जात असल्याच्या तक्रारी नोंदणी विभागाकडे येत होत्या. या पार्श्वभूमीवर जात प्रमाणपत्र, उत्पन्नप्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपपत्र, आदी विविध दाखल्यांसाठी, तसेच शासकीय कामकाजासाठी लागणाऱ्या स्टॅम्पपेपरची माफी कायम ठेवण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण नोंदणी व मुद्रांक विभागाने दिले आहे. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडे याबाबत एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्यावर उच्च न्यायालयाने निर्णय दिला असून, त्यामध्ये विविध प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी, तसेच घोषणापत्रांसाठी स्टॅम्पपेपरची आवश्यकता नसल्याचे म्हटले आ...
तीन लाख लाडक्या ‘बहिणी’ राहिल्या वंचित
पुणे

तीन लाख लाडक्या ‘बहिणी’ राहिल्या वंचित

'लाडकी बहीण' योजनेसाठी पुणे शहर जिल्ह्यात १९ लाखांपेक्षा अधिक अर्ज पुणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी'साठी पुणे शहर (Pune City) जिल्ह्यातून सुमारे १९ लाख २९ हजारांपेक्षा अधिक अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी १७ लाख ७५ हजारपेक्षा अधिक अर्जाना मान्यता देण्यात आली असून, आधार क्रमांक बँकेशी संलग्न न केल्याने सुमारे तीन लाख २३ हजारपेक्षा अधिक लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही. लाडकी बहिणीसाठी (Ladaki Bahin) पुणे शहर जिल्ह्यातून जुन्या योजनादूत (YOJANA Doot) अ‍ॅपवरून नऊ लाख ७५ हजार सहा अर्ज दाखल करण्यात आले होते. नवीन पोर्टलवरून एकूण नऊ लाख ५४ हजार ४९७ इतके अर्ज दाखल केले होते. त्यामुळे शहर जिल्ह्यातून आजमितीला १९ लाख २९ हजार ५०३ इतके अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी १८ लाख ७८ हजार ६५१ इतक्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करून चार हजार ७६५ इत...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती साजरी 
पुणे

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती साजरी

हडपसर, 23 सप्टेंबर 2024 (प्रतिनिधी) - एस. एम. जोशी कॉलेज व साधना शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी व 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हडपसरचे लोकप्रिय आमदार व रयत शिक्षण संस्थेचे, पश्चिम विभागीय चेअरमन चेतन (दादा) तुपे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप (आबा) तुपे व महाविद्यालय विकास समिती सदस्य अमर (आबा) तुपे यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक विभागाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा, कर्मवीर संवादमाला, ...
छत्रपती संभाजी महाराज भारतीय राष्ट्रीय उत्कृष्ट समाज सेवा राज्यस्तरीय पुरस्कार शिवशाहीर विजय तनपुरे महाराज यांना जाहिर
पुणे, शैक्षणिक, सामाजिक, साहित्य

छत्रपती संभाजी महाराज भारतीय राष्ट्रीय उत्कृष्ट समाज सेवा राज्यस्तरीय पुरस्कार शिवशाहीर विजय तनपुरे महाराज यांना जाहिर

राहुरी, दि.२० (लोकमराठी) - छावा प्रतिष्ठान मुंबई महाराष्ट्र राज्य यांचा राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज भारतीय राष्ट्रीय उत्कृष्ट समाज सेवा पुरस्कार राहुरी येथील शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांना जाहीर करण्यात आला. छावा प्रतिष्ठान मुंबई महाराष्ट्र राज्य समितीचे कार्याध्यक्ष श्रीयुत वस्ताद अमित गुंडाकुश यांनी पत्राद्वारे कळविले आहे. हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्रातील फक्त दोनच व्यक्तींना दिला जातो. दि. २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा. वाजता मराठी साहित्नय संघ सभागृह नवी मुंबई येथे एका समारंभात निवृत्त ब्रिगेडियर मेजर सुधीर सावंत व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. शिवशाहीर डॉ विजय तनपुरे यांनी शाहिरीतून व कीर्तनातून शिवरायांचे कार्य महाराष्ट्रात देशात तसेच परदेशातही पोहोचवले आहे. तसेच सिन्नर येथे अंध अपंग निराधार इत्यादी समाजातील दुर्लक्षिलेल्या घट...
धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था तळेगाव दाभाडेच्या उपाध्यक्ष पदी जितेंद्र बोत्रे यांची बिनविरोध निवड
पुणे

धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था तळेगाव दाभाडेच्या उपाध्यक्ष पदी जितेंद्र बोत्रे यांची बिनविरोध निवड

तळेगाव, दि.१ (लोकमराठी) - धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था तळेगाव दाभाडेच्या उपाध्यक्ष पदी जितेंद्र बोत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी निखारे साहेब यांनी ही निवड केली. नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे…चेअरमन पदी विनोद टकले, सचिव पदी संजय शिंदे, खजिनदार पदी सुधीर खांबेटे या प्रसंगी धर्मवीर नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०२४ कॅलेंडरचे प्रकाशन भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या मावळ तालुका अध्यक्ष सायली बोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सायली बोत्रे यांची भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे संस्थापक खंडू टकले यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सर्व आजी माजी संचालक ,पतसंस्थेचे कर्मचारी, दैनंदि...

Actions

Selected media actions