वेहेरगाव येथील श्री एकवीरा देवीच्या श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची निवडणूक शांततेत पार
लोणावळा, दि.२७ (लोकमराठी) - महाराष्ट्रातील जागृत देवस्थान व कोळी आगरी सीकेपी अशा विविध समाजातील नागरिकांची कुलस्वामिनी म्हणून ओळख असणार्या वेहेरगाव येथील श्री एकवीरा देवीच्या श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची निवडणूक २६ फेब्रुवारी रोजी शांततेत पार पडली.
२६ फेब्रुवारी रोजी चार जागांसाठी मतदान झाले आहे. वेहेरगाव गावातील त्वेष्ट भक्तनिवास याठिकाणी सकाळी ९ ते सायंकाळी ४ दरम्यान ही मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली.
यावेळच्या निवडणुकीसाठीही मोठी चढाओढ असल्याने पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.परंतु श्री एकविरा विश्वस्त मंडळाच्या उमेदवारांनी संयमाने घेत ही निवडणूक शांततेत पार पाडत नवा पायंडा पाडला.
यामध्ये सागर मोहन देवकर व विकास काशिनाथ पडवळ यांनी बाजी मारली आहे. सागर देवकर यास ३३०तर विकास पडवळ ला ३०९ मते मिळाली. गुरव देशमुख परिवारातील मारुती देशमुख या...