पुणे

Lockdown : पुण्यात लॉकडाउनमध्ये ३९ लाखांच्या सिगारेट जप्त; डीलरला अटक
पुणे

Lockdown : पुण्यात लॉकडाउनमध्ये ३९ लाखांच्या सिगारेट जप्त; डीलरला अटक

पुणे (लोकमराठी) : लॉकडाउनमध्ये सिगारेटचा पुरवठा कऱणाऱ्या डीलरविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी धाड टाकत ३९ लाखांच्या सिगारेट जप्त केल्या आहेत. पुण्याचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला सिगारेटचा एक डीलर शहरात सिगारेट तसंच इतर गोष्टी ज्यांचा जीवनाश्यक वस्तूंमध्ये समावेश होत नाही यांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर तात्काळ कारवाई करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेशकुमार महाडीक यांनी एका व्यक्तीला ग्राहक म्हणून त्याच्याकडे पाठवलं. यावेळी डीलरने सिगारेटचा बॉक्स देण्याची तयारी दर्शवली. यासाठी त्याने दुप्पट किंमत मागितली. लॉकडाउन सुरु असल्याने सिगारेट विक्रीवरही बंदी आली आहे. यामुळे सिगारेटचा एक बॉक्स दुप्पट किंमतीत म्हणजेच पाच हजार रुपयांना विकला जात आहे. बनावट ग्राहकाने डीलर शशिकांत याच्याकडून सिगारेटचा एक बॉक्स विकत घेतला. य...
ऑनलाइन वीजबिलासाठी मोबाइल नोंदणी
पुणे

ऑनलाइन वीजबिलासाठी मोबाइल नोंदणी

वीजबिलांची छपाई आणि वितरण बंद; मोबाइल क्रमांकाची नोंदणी पुणे (लोकमराठी) : करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात सध्या टाळेबंदी सुरू असल्याने २३ मार्चपासून महावितरणने वीजबिलांची छपाई आणि वितरण बंद केले असले, तरी ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यादृष्टीने ग्राहकाला एसएमएसच्या माध्यमातून वीजबिल मिळण्यासाठी महावितरणकडे मोबाइल क्रमांकाची नोंदणी आवश्यक आहे. पुणे परिमंडल अंतर्गत पुणे शहर, पिंपरी- चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीणमधील मुळशी, वेल्हे, मावळ, जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यांत कृषी, अकृषक वर्गवारीतील २७ लाख ८७ हजार २०४ (९०.४७ टक्के) वीजग्राहकांनी महावितरणकडे ग्राहक क्रमांकासोबत त्यांच्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी केली आहे. टाळेबंदीमध्ये या ग्राहकांना वीजबिलांची माहिती ‘एसएमएस’द्वारे देण्यात येत आहेत. पुणे शहरामधील कोथरूड, शिवाजीनगर, रास्तापेठ, नगररोड, पद्म...
धक्कादायक : पुण्यात दुधाच्या टेम्पोतून दारूची वाहतूक
पुणे

धक्कादायक : पुण्यात दुधाच्या टेम्पोतून दारूची वाहतूक

पुणे (लोकमराठी) : लॉकडाऊनमुळे संयम सुटलेल्या तळीरामांनी दारुसाठी बीअर बारची दुकाने फोडून दारुच्या बाटल्या पळवल्याच्या घटना ताज्या असतानाच पुण्यात चक्क दुधाच्या टेम्पोतून दारुची ने-आण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका पोलिसाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून टेम्पोच्या चालकाला जेरबंद करण्यात आलं आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच ठिकाणी नाकाबंदी सुरू आहे. पोलिसांच्या गस्तीही वाढवण्यात आल्या आहेत. पुण्यातील कात्रज घाटातही काल रात्रीपासून आज सकाळी ७ वाजेपर्यंत नाकाबंदी सुरू होती. काल रात्री साडे अकरा वाजता 10MH12 JF6988 या क्रमांकाचा एक टेम्पो घाटातून जाताना पोलिसांना दिसला. त्यामुळे पोलिसांनी या टेम्पो चालकाला थांबायला सांगितले आणि त्याच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी टेम्पोचालकाच्या बोलण्यावर पोलिसाला संशय आल्याने त्याला टेम्पो उघडून दाखविण्यास सा...
Covid-19 : पुण्यात काही तासांतच ४ करोनाग्रस्तांचा मृत्यू
पुणे

Covid-19 : पुण्यात काही तासांतच ४ करोनाग्रस्तांचा मृत्यू

पुणे: (लोकमराठी) पुण्यात आज अवघ्या काही तासांमध्ये चार करोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यानं चिंतेत आणखीनच भर पडली आहे. हे सर्व ससून रुग्णालयात उपचार घेत होते. मृतांची संख्या आता ३८ झाली आहे. कोंढव्यातील ५० वर्षीय महिलेवर ससूनमध्ये उपचार सुरू होते. तिला रक्तदाबाचा त्रास होता. तिला करोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. तर पर्वती दर्शन येथील २७ वर्षीय तरुणाला करोनाची बाधा झाली होती. १२ एप्रिलला त्याला ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. तो मद्याचे अतिसेवन करत होता. यात त्याचे यकृत निकामी झाले होते. त्याचाही आज मृत्यू झाला. तसेच, घोरपडी येथील ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला २ एप्रिलला ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्याचा चाचणी अहवाल करोना पॉझिटिव्ह आला होता. रुग्णालयात उपचार सुरू असताना, आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना रक्तदाब आणि किडनीचा आजार होता. कोंढव्यातील एका ४० वर्षीय महिलेला ...
Covid-19 : पुण्यातील आणखी २२ भाग पूर्णपणे सील, पाहा ही यादी
पुणे

Covid-19 : पुण्यातील आणखी २२ भाग पूर्णपणे सील, पाहा ही यादी

पुणे (लोकमराठी) : करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे शहरातील आणखी २२ भाग पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही महापैरांनी केली. अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या सर्वांसाठी पुणे पोलिसांनी दिलेले पास १४ एप्रिलऐवजी आता ३० एप्रिलपर्यंत ग्राह्य धरले जाणार आहेत. शिवाय मुदत वाढवल्याची माहिती नागरिकांना मेसेजद्वारे प्राप्त होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. दाट वस्तीमधील करोनाबाधित आणि संशयित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन नव्याने २२ ठिकाणांमध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे. पाहूयात कोणते २२ भाग सील करण्यात आले आहेत. सील करण्यात येत असलेले भाग…१) पत्राचाळ, लेन नंबर १ ते ४८ आणि परिसर, प्रभाग क्रमांक २०२) संपूर्ण ताडीवाला रोड३) घोरपडी गाव, विकासनगर, बालाजीनगर, श्रावस्तीनगर, प्रभाग...
PUNE : पुण्यात व्हॉट्सप हॅक झाल्याच्या तक्रारींनंतर पोलिसांकडून अर्लट जारी
पुणे, मोठी बातमी

PUNE : पुण्यात व्हॉट्सप हॅक झाल्याच्या तक्रारींनंतर पोलिसांकडून अर्लट जारी

पुणे (लोकमराठी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यापासून आतापर्यंत पुणे पोलिसांकडे व्हॉटस अ‍ॅप हॅक झाल्याच्या पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी या संदर्भात अर्लट जारी केले आहे. विशेष म्हणजे या पाचही तक्रारी महिलांकडूनच दाखल करण्यात आलेल्या आहेत. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सायबर सेलचे उपायुक्त संभाजी कदम यांनी शनिवारी या संदर्भात अर्लट जारी केले. तसेच, नागरिकांनी आपली वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तीस देऊ नये तसेच व्हॉट्स अ‍ॅप किंवा अन्य सोशल मीडियावर आलेल्या एखाद्या संशयीत लिंकवर क्लिक देखील करू नये, असे आवाहनही केले आहे. लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यापासून आमच्याकडे व्हॉटस अ‍ॅप हॅक झाल्याच्या पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारी दाखल करणाऱ्यांमध्ये विद्यार्थीनी, गृहिणी आणि आयटी क्षेत्रातील काम करणाऱ्यांचा समावेश आह...
Coronavirus: पुण्यात दिवसभरात करोनामुळे २ रुग्णांचा मृत्यू; ३६ नवे रुग्ण आढळले
पुणे

Coronavirus: पुण्यात दिवसभरात करोनामुळे २ रुग्णांचा मृत्यू; ३६ नवे रुग्ण आढळले

पुणे (लोकमराठी) : पुणे शहर आणि जिल्ह्यात करोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात ३६ नवे रुग्ण आढळले त्यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या २४५ वर गेली आहे. दरम्यान, आज (शुक्रवार) २ रुग्णांचा उपचारावेळी मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यात मृतांचा आकडा २६ वर पोहोचला आहे. वाढत्या मृतांची संख्या लक्षात घेता, पुणेकरांच्या दृष्टीने चिंतेची बाब झाली आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहर आणि जिल्ह्यात प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी डॉक्टरांची विशेष पथके नेमण्यात आली आहेत. त्यानुसार अनेक भागात नागरिकांकडून माहिती घेणे आणि तपासणी केली जात आहे. दरम्यान, शहरात २०७, पिंपरी-चिंचवडमध्ये २६ आणि ग्रामीण भागात १२ असे एकूण २४५ बाधित रुग्ण आढळले आहेत. आज दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे मृतांचा आकडा २६ वर पोहोचला आहे. दरम्यान...
पुणे रेल्वेकडून ३२ हजारांहून अधिक अन्न पाकिटांचे गरजूंना वाटप
पुणे

पुणे रेल्वेकडून ३२ हजारांहून अधिक अन्न पाकिटांचे गरजूंना वाटप

पुणे (लोकमराठी) : करोना विषाणू संसर्गामुळे लागू असलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत गरजवंतांना अन्नाची पाकिटे देण्यासाठी पुण रेल्वेकडून विविध पातळ्यांवर काम करण्यात येत आहे. आजवर पुणे शहरात ३२ हजारांहून अधिक अन्न पाकिटांचे वितरण करण्यात आले आहे. इंडियन रेल्वे केअटिरग अ‍ॅण्ड टुरिझम कार्पोरेशनसह (आयआरसीटीसी) अधिकारी आणि कर्मचारी व्यक्तिगत तापळीवरही यासाठी सहभाग देत आहेत. राज्यात टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर २२ मार्चपासून रेल्वेकडून अन्न वाटपाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी आरआरटीसीकडून पुढाकार घेण्यात आला आहे. स्वयंपाकासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यासह रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याने पुण्यातील विविध भागांमध्ये ३२ हजारांहून अधिक अन्न पाकिटांचे वाटप करण्यात आले आहे. त्याशिवाय शिवाजीनगर, हडपसर, देहूरोड, मिरज, कोल्हापूर, सातारा आदी स्थानके...
PUNE : पुण्यातील एकाच कुटुंबातील पाच कोरोनाबाधित रूग्ण झाले पूर्ण बरे
पुणे

PUNE : पुण्यातील एकाच कुटुंबातील पाच कोरोनाबाधित रूग्ण झाले पूर्ण बरे

पुणे (लोकमराठी) : राज्यात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच ताण हलका करणारी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील एकाच कुटुंबातील पाच करोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पुणे शहरात भीतीचं वातावरण आहे. मात्र, पाच रुग्ण बरे झाल्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पुण्यात एकाच कुटुंबात राहणाऱ्या ५ जणांना करोनाची लागण झाली होती. करोनाची लक्षण आढळून आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. करोना झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचाराचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर म्हणजे १४ दिवसांनंतर त्यांच्या पुन्हा टेस्ट करण्यात आल्या. दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या. त्यामुळे या पाचही जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज ...
Coronavirs: मुख्य बाजारासह खडकी, मोशी, उत्तमनगर येथील उपबाजारही राहणार बंद
पुणे

Coronavirs: मुख्य बाजारासह खडकी, मोशी, उत्तमनगर येथील उपबाजारही राहणार बंद

पुणे (लोकमराठी) :पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील मुख्य बाजारासह खडकी, मोशी, उत्तमनगर उपबाजार आजपासून बंद राहणार आहेत. या सर्व बाजारांमधील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विक्री आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. डॉ. म्हैसेकर म्हणाले, “पुण्यातील या सर्व मार्केटमधील विविध विभाग पुढील काळात बंद राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने फळं, भाजीपाला, कांदा-बटाटा याची विक्री पूर्णपणे बंद राहणार आहे. मात्र, भुसार आणि कडधान्य विभाग सुरु राहणार आहेत.” पुणे शहरात १५ नवे कोरोनाबाधित पुणे शहरात आणखी १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ११ जण डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात तर ४ जण ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामुळे पुणे शहरातील रुग्णांची संख्या आत...