पुणे

एस.एम. जोशी महाविद्यालयात ‘गुगल क्लासरूम-अ टूल फॉर टीचिंग अँड लर्निंग’ प्रशिक्षण संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस.एम. जोशी महाविद्यालयात ‘गुगल क्लासरूम-अ टूल फॉर टीचिंग अँड लर्निंग’ प्रशिक्षण संपन्न

हडपसर : दि. ९ डिसेंबर (प्रतिनिधी) : ‘गुगल क्लासरूम-अ टूल फॉर टीचिंग अँड लर्निंग’ या विषयावर एस.एम.जोशी महाविद्यालयात विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते. महाविद्यालयातील आय. क्यू. ए. सी. व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. https://youtu.be/yEcSL2C43x4 कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत आय. क्यू. ए. सी. चे समन्वयक प्राद्यापक डॉ. किशोर काकडे यांनी केले. या प्रसंगी अर्थशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ.एकनाथ मुंढे यांनी सहभागी प्राध्यापक व विद्यार्थी यांना गुगल क्लासरूमचा शैक्षणिक साधन म्हणून कसा वापर करावा याबाबतचे प्रशिक्षण दिले. तंत्रज्ञानाप्रमाणे आपणही आपल्यात बदल केला पाहिजे. तसेच नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत वापर केला पाहिजे. असे विचार डॉ. एकनाथ मुं...
शैला पाटील यांची राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य व सांस्कृतिक विभागाच्या जिल्हा संघटकपदी निवड
पुणे

शैला पाटील यांची राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य व सांस्कृतिक विभागाच्या जिल्हा संघटकपदी निवड

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट, साहित्य व सांस्कृतिक विभागाच्या पुणे जिल्हा संघटक पदी काळेवाडीतील शैला चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत नुकतेच निवडीचे पत्र विभागाच्या पुणे जिल्हा अध्यक्षा व अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या हस्ते पाटील यांना देण्यात आले. या संदर्भात लोकमराठीशी बोलताना शैला पाटील म्हणाल्या की, राष्ट्रवादी पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिली असून चित्रपट, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. कलाकारांचे अनेक प्रश्न प्रकाशात येत नाहीत, कोरोना महामारी काळात लॉकडाऊन असल्याने या क्षेत्रातील अनेकांवर उपासमारीची वेळ आली. याबाबत पक्षाच्या माध्यमातून उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करणार असून पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास व दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे....
कर्जत नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक | २२ उमेदवारांकडून अर्ज दाखल
पुणे, राजकारण

कर्जत नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक | २२ उमेदवारांकडून अर्ज दाखल

कर्जत, दि. ६ (प्रतिनिधी) : कर्जत नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रमाच्या आजच्या सहाव्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करताना २२ उमेदवारांकडून २९ अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी दिली. दि.६ डिसेंबर रोजी कर्जत नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याच्या सहाव्या दिवशी एकदम २९उमेदवारी अर्ज दाखल झालेआहे. गेले पाच दिवस अर्ज दाखल करण्याची मुदत असतानादेखील कोणीही अर्ज दाखल न केल्याने अर्ज माहिती निरंक राहिली दि. ७ रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने दि.६ रोजी अनेक इच्छुकांची भाऊगर्दी झाली. अनेक इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरताना, अनेक कागदपत्रे गोळा करताना दमछाक झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. प्रशासनाच्या वतीने सर्व मार्गदर्शक सूचनांची वेळोवेळी सूचना केली जात होती. आज दाखल झालेले अर्ज पैकी भारतीय जनता पार्ट...
एस. एम. जोशी महाविद्यालयातील सुशांत खवळे आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत द्वितीय
क्रीडा, पुणे

एस. एम. जोशी महाविद्यालयातील सुशांत खवळे आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत द्वितीय

हडपसर (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आयोजित आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये एस. एम. जोशी महाविद्यालयातील सुशांत खवळे या खेळाडूने ७४ किलो वजनी गटामधून द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच विभागीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साहेब यांनी त्याचे अभिनंदन करीत त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. त्याच्या या यशामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्यांबरोबरच शारीरिक शिक्षण संचालक प्रा. दत्ता वसावे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य डॉ. जडे, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. किशोर काकडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवक यांचे मोलाचे योगदान आहे....
पत्रकारास मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – सुरेशकुमार राऊत
पुणे

पत्रकारास मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – सुरेशकुमार राऊत

शिक्रापूर : एखाद्या बातमीचा राग मनात धरून पत्रकारांवर हल्ले करणे हि बाबत अतिशय चुकीची असून पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांची गय केली जाणार नसून सध्या पत्रकारास मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले. शिंदोडी ता. शिरुर येथील पत्रकार तेजस फडके यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या एका गुन्ह्या संदर्भात बातमी केलेली असताना त्या बातमीचा राग मनात धरून गावातील काही समाज कंटकांनी तेजस फडके यांच्यावर हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले होते. याबाबत तेजस फडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले असून घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत शिरूर तालुक्यातील पत्रकारांनी नुकतीच पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांची भेट घेत, आरोपींना तातडीने अटक...
एस. एम. जोशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले मासचे वाटप
पुणे, सामाजिक

एस. एम. जोशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले मासचे वाटप

हडपसर - २८ नोव्हेंबर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागामार्फत हडपसर परिसरातील गरजू लोकांना मासचे वाटप केले. सध्या कोव्हिडचा वाढता प्रभाव लक्षात घेता‌. रस्त्यावर राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या लोकांना मेडीकल मास्कचे वाटप करण्यात आले. यांमध्ये रस्त्यावर राहणारे लोक, झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी मास्कचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे साहेब यांनी मार्गदर्शन केले. तर या उपक्रमाचे संयोजन अर्थशास्त्र विभागप्रमुख डाॅ. एकनाथ मुंढे, प्रा.अशोक कांबळे, डाॅ.विश्वास देशमुख, प्रा.सय्यद इम्तियाज यांनी केले. या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील शुभंम शेंडे, रेणूका लोहार, शिवाणी देवकर, साक्षी चौधरी, वैष्णवी पवार, ऋषीकेश शिंदे या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभा...
एस.एम. जोशी महाविद्यालयात ऑनलाईन तंबाखू विरोधी दिन साजरा
पुणे, शैक्षणिक

एस.एम. जोशी महाविद्यालयात ऑनलाईन तंबाखू विरोधी दिन साजरा

हडपसर (प्रतिनिधी) : हडपसर येथील एस.एम. जोशी महाविद्यालयात अँटी रॅगिंग विद्यार्थी तक्रार निवारण माहिती अधिकार समिती, समुपदेशन केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने ऑनलाईन तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दंत व शल्यचिकित्सक औंध रुग्णालयातील डॉक्टर सुहासिनी घाणेकर उपस्थित होत्या. त्यांनी तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे यांनी आपल्या खास शैलीत घोषवाक्याद्वारे तंबाखूविरोधी जनजागृती करणाऱ्या घोषणा देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी तंबाखूविरोधी शपथ ग्रहण केली. उपप्राचार्य डॉ.संजय जगताप यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रमुख पाहुण्यांचे स्...
महाविकास आघाडी सरकारला महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्ष पदासाठी मुहूर्त मिळेना
मोठी बातमी, पुणे

महाविकास आघाडी सरकारला महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्ष पदासाठी मुहूर्त मिळेना

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्ष पदाच्या नेमणूक करण्याची अपना वतन संघटनेची मागणी पुणे : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्ष पदाच्या नेमणूक करण्याची मागणी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिक शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, अल्पसंख्यांक राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन दोन वर्ष झाली आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण लोकसंख्येच्या तुलनेत जवळजवळ २५ टक्के लोकसंख्या अल्पसंख्यांक समाजाची आहे. यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी, जैन यांचा समावेश होतो. भारतीय अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मागासलेपणा दूर करण्यासाठी भारतीय संविधानातील तरतुदीनुसार अल्पसंख्यांक आयोगा...
एस. एम. जोशी महाविद्यालयात ‘बालदिन’ साजरा
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी महाविद्यालयात ‘बालदिन’ साजरा

हडपसर - १४ नोव्हेंबर; प्रतिनिधी - डॉ. अतुल चौरे : हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम.जोशी महाविद्यालयात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्‍मदिवस 'बालदिन' म्हणून सांस्कृतिक विभागामार्फत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हडपसर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिगंबर शिंदे साहेब उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साहेब म्हणाले, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्‍मदिवस 'बालदिन' म्हणून साजरा केला जातो. कारण भारताचे पहिले पंडित पंतप्रधान जवाहरलाल नेहरू लहान मुलांमध्ये रमायचे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रेमळ स्वभावामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे. लहान वयात मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते देशाचे आदर्श नागरिक होतील. अशा विचाराने पंडि...
जोशी महाविद्यालयात थोर समाजवादी नेते एस. एम. जोशी यांची जयंती साजरी
पुणे, शैक्षणिक

जोशी महाविद्यालयात थोर समाजवादी नेते एस. एम. जोशी यांची जयंती साजरी

हडपसर - १२ नोव्हेंबर, प्रतिनिधी- डॉ. अतुल चौरे : हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम.जोशी महाविद्यालयात थोर स्वातंत्र्य सेनानी, समाजवादी नेते व कामगार नेते श्रीधर महादेव जोशी उर्फ एस. एम. जोशी यांची जयंती सांस्कृतिक विभाग व ग्रंथालय विभागामार्फत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साहेब म्हणाले, एस. एम. जोशी हे थोर स्वातंत्र्य सेनानी, समाजवादी नेते व कामगार नेते होते. आपल्या प्रामाणिक आणि सात्विक व्यक्तिमत्त्वाने त्यांनी त्या काळातील अनेकांना सामाजिक कामाची प्रेरणा दिली. विद्यार्थी दशेत असताना ते महात्मा गांधी यांच्या चळवळीने प्रभावित झाले. काही विशिष्ट ध्येय, जीवनमूल्ये आणि निष्ठा घेऊन त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. पुढे ते कामगार पुढारी 'एसेम' या नावाने लोकांमध्ये परिचित झाले. १ ९ ४...